Home / महाराष्ट्र / पश्चिम-महाराष्ट्र / बेकायदेशीर औषध कंपनीच्या...

महाराष्ट्र    |    पश्चिम-महाराष्ट्र

बेकायदेशीर औषध कंपनीच्या माफियांना FDA चा आशीर्वाद*

बेकायदेशीर औषध कंपनीच्या माफियांना FDA चा आशीर्वाद*

*

 

स्प्राऊट्स Exclusive

 

पुण्यातील औषध कंपनीने अन्न व प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांशी 'आर्थिक' हितसंबंध जोपासले व बेकायदेशीरपणे औषधे निर्माण करुन कोट्यवधी रुपयांची काळी माया गोळा केलेली आहे. याबाबत वारंवार तक्रारी करुनही अन्न व औषध प्रशासनातील अधिकारी कोणतीही कारवाई केलेले नाही, याऊलट या कंपनीला कायदेशीर संरक्षण देण्याचे काम चालू केलेले आहे, अशी माहिती 'स्प्राऊट्स'च्या स्पेशल इन्व्हेसिगेशन टीमला आढळून आलेले आहे.

 

पुणे तालुक्यातील वाकड येथे या कंपनीचा कारखाना आहे. या कारखान्यात विनापरवाना औषधे बनविण्यात येतात, त्यामुळे लाखो रुग्णाच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे, अशा असंख्य तक्रारी येथील रहिवाशांनी अन्न व प्रशासन विभागाकडे केला. मात्र या विभागाने या तक्रारींकडे कानाडोळा केला. अखेर तक्रारदारांच्या मागणीमुळे 'स्प्राऊट्स'ने हे प्रकरण उघडकीस आणले.  स्प्राऊट्सच्या टीमने त्याचा सरकार दरबारी पाठपुरावा केला.

 

अखेर अन्न व प्रशासन विभागाने (Food and Drugs Administration) या कारखान्यावर छापा टाकला. या छाप्यात अधिकाऱ्यांना अप्रमाणित औषधांचा साठा आढळून आला. मात्र हे प्रकरण त्वरित 'मॅनेज' करण्यात आले, व त्याच्या मालक व संबंधितांवर अद्याप कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. यासंबंधी वारंवार तक्रारीही करण्यात आल्या, मात्र तरीही या विभागातील अधिकाऱ्यांनी कंपनीचे मालक प्रवीण अग्रवाल व पवनकुमार गोयल यांच्याशी 'अर्थ'पूर्ण संबंध चालूच ठेवले. त्यांच्या कृपेमुळे आजही हा कारखाना चालूच आहे व तेथे बेकायदेशीर औषधे बनवणेही चालूच आहे.

 

*आरोपी मोकाटच*

 

प्रवीण अग्रवाल व पवनकुमार गोयल हे Ace Remidies या कंपनीचे मालक आहे. हे बनावट औषधे तयार करतात व त्याची विक्रीही करतात. या दोघांवर भारतीय दंड संहिता कलम २७४, २७६, ४१९ व ४२० नुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यायला हवा. तसेच द कंपनी ऍक्ट २०१३ मधील कलम ११९, १७२, ४१९ व इतर विहित तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई होणे आवश्यक होते, मात्र ही चौकशी या अधिकाऱ्यांकडून 'मॅनेज' करण्यात आली. त्यामुळेच हे अवैधरित्या औषधे विकणारे आरोपी मोकाट फिरत आहेत व खुलेआम अवैधरित्या औषधांची विक्रीही करीत आहेत.

 

*'इंडियामार्ट' मध्ये अवैध औषधांची विक्री*

 

विनापरवाना निर्माण केलेल्या या औषधांची आजही www.indiamart.com या वेबपोर्टलवर विक्रीही चालू आहे. याबाबत 'स्प्राऊट्स'ने वाचाही फोडली होती. त्यानंतर India Mart ने 'स्प्राऊट्स'ला पत्रही पाठवले होते. मात्र त्यानंतरही या बेकायदेशीररीत्या केलेल्या औषधांची विक्री चालूच आहे.    

 

बुडवला सरकारचा कोट्यवधी रुपयांचा महसूल अवैधरित्या औषध बनविणाऱ्या कंपन्यांच्या खरेदी- विक्री यांच्यामध्ये ताळमेळ नसल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाला आढळून आले आहे, यामुळे सरकारचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे, अशी धक्कादायक माहिती 'स्प्राऊट्स'च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमच्या हाती लागलेली आहे.

 

जगदीश का. काशिकर,

कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

 

सहकार्य:*उन्मेष गुजराथी*

*स्प्राऊट्स ब्रँड स्टोरी*

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

पश्चिम-महाराष्ट्रतील बातम्या

*राज्यात १९ फेब्रुवारीला शिवजयंती उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात साजरी होणार*

*सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र* मुंबई, दिनांक १३: छत्रपती...

*सुप्रसिद्ध मेडीसन पीआर मिडीया एजन्सी बाबत जगदिश काशिकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतरांना नोकरी वाचविण्याबाबत निवेदन व स्मरणपत्र* *कामगार आयुकत यांच्या पर्यत आपली समस्या पोहचवण्यासाठी व न्यायासाठी सुप्रसिद्ध समाजसेवक, वकील व वोचडोग फाऊंडेशन चे ट्रस्टी श्री गोडफ्रे पिमेंटा यांची घेतली कायदेशिर मदत* *दिल्ली कामगार मंत्री कार्यालयातुन या प्रकरणाबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आदेश महाराष्ट्र कामगार आयुकत यांना देण्यात आले आहेत*

भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरमुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व...

ब्राह्मण पुरोहिताची जागा बहुजन पुरोहितांना द्या! मराठा सेवा संघ संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर

भारतीय वार्ता : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राजघराण्यातील वर्तमानातील युवराज्ञी संयोगिता राजे संभाजी...