Home / महाराष्ट्र / मराठवाडा / माजीमंत्री आ. संभाजी...

महाराष्ट्र    |    मराठवाडा

माजीमंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्याकडुन एस.टी. अपघातातील जखमींची चौकशी !!

माजीमंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्याकडुन एस.टी. अपघातातील जखमींची चौकशी !!

माजीमंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्याकडुन एस.टी. अपघातातील जखमींची चौकशी !!

 

     उत्तम माने

 लातूर जिल्हा प्रतिनिधी

मो.नंः 8484878818

 

 

लातूर:-निलंगा आगाराच्या निलंगा-पुणे या एस.टी.ला आज सकाळी मुरूड येथे अपघात झालेला आहे. या अपघाताचे वृत्त कळताच माजीमंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी तात्काळ अपघाताच्या घटनेची माहिती घेतली. त्याच बरोबर अपघातातील जखमींवर उपचार सुरू असलेया विलासराव देशमुख शासकीय वैदयकीय महाविदयालयाच्या सर्वोउपचार रुग्णालयात जावून त्या जखमींची भेट घेवून त्यांची आस्थावाईकपणे चौकशी केली. या जखमींसोबत चर्चा करून प्रकृतीची विचारपूस केली. अपघातातील जखमींवर योग्य उपचार देणेबाबत वैदयकीय अधिक्षक डॉ. संतोषकुमार डोपे यांना आ. निलंगेकर यांनी विशेष सूचना दिल्या.

निलंगा आगाराची निलंगा-पुणे या एस.टी. बसला आज सकाळी मुरूड येथे अपघात झालेला आहे. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र २२ प्रवासी जखमी झालेले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच माजीमंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी तात्काळ संबंधीत यंत्रणेशी संपर्क साधून याबाबत माहिती घेतली. अपघातात जखमीं झालेल्या रुग्णांवर तात्काळ उपचार करण्याबाबत सूचना देवून आवश् यक असल्यास जखमींना लातूर येथील सर्वोउपचार रूग्णालयात दाखल करण्याबाबत सांगितले. या अपघातात जखमी झालेल्या २२ प्रवाशांवर मुरूड येथे प्रथम उपचार करून त्या सर्वांना लातूर येथील वैदयकीय महाविदयालयाच्या सर्वोउपचार रूग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केलेले आहे. माजीमंत्री आ. निलंगेकर यांनी वैदयकीय महाविदयालयाच्या सर्वोउपचार रूणालयात जावून जखमींची भेट घेत त्यांची आस्थावाईकपणे चौकशी केली. या जखमींवर योग्य उपचार होत असल्याची माहिती घेवून या जखमी रुग्णांना लवकरच स्थिरता लाभेल अश्या सदिच्छा व्यक्ती केल्या. जखमी रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकासोबत माजीमंत्री आ. निलंगेकर यांनी चर्चा करून उपचारात कोणतीही हयगय होणार नाही असा विश्वासू देवून या जखमींना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी आपण पाठपुरावा करू अशी ग्वाही माजीमंत्री आ. निलंगेकर यांनी दिली. त्याच बरोबर जखमींना योग्य उपचार देणेबाबत वैदयकीय अधिक्षक डॉ. संतोषकुमार डोपे यांना सूचना देवून आवश्यक असणा-या रुग्णांना पुढील उपचारासाठी इतरत्र हलविण्याची गरज पडल्यास त्याबाबतही यंत्रणा सतर्क ठेवावी अशी सूचना दिली. यावेळी वैदयकीय अधिकारी यांच्यासह जिल्हा संघटन सरचिटणीस संजय दोरवे, दगडु सोळंके, जिल्हा उपाध्यक्ष शेषेराव ममाळे, भाजप युवा मोर्चचे जिल्हा सरचिटणीस तानाजी बिरादार आदी उपस्थित होते.

शासकीय वैदयकीय महाविदयालयाची तपासणी चालु असल्याने वैदयकीय अधिष्ठता डॉ. समीर जोशी त्या कामात मग्न असल्याची माहिती माजीमंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांना मिळाली. सदर माहिती मिळताच वैदयकीय अधिष्ठ यांची झडती घेत रुग्णालयात रूग्ण सेवेला प्राधान्य गरजेचे असल्याचे सांगून अपघात झाला असुन यामध्ये अनेकजण जखमी झालेले आहेत. मात्र याबाबत कोणतीही दखल न घेता वैदयकीय अधिष्ठता डॉ. जोशी तपासणीमध्ये कसे काय अस प्रश्न उपस्थित करून आधी उपचार करा मग तपासणीच्या सहया करा अशी झडती घेतली. वैदयकीय क्षेत्रात काम करत असताना रुग्ण सेवा अतिशय महत्वाची असते. याकडे दुर्लक्ष होणे योग्य नसल्याचे सांगून पुढील काळात यासारखे प्रकार होवू नयेत याची दक्षता घेण्यात यावी अशी अपेक्षा माजीमंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी यावेळी व्यक्त केली.

ताज्या बातम्या

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक. 19 December, 2024

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक.

वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना  न्याय. 18 December, 2024

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना न्याय.

वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* 16 December, 2024

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...

परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची  विटंबना करणाऱ्यां समाज कंठकावर कारवाई करा, भारतीय बौध्द महासभा,समता सैनिक दल व वंचित बहुजन आघाडी यांची मागणी. 16 December, 2024

परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यां समाज कंठकावर कारवाई करा, भारतीय बौध्द महासभा,समता सैनिक दल व वंचित बहुजन आघाडी यांची मागणी.

वणी:- परभणी येथे १० डिसेंबर रोजी एका समाजकंटकाने भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली. या देशद्रोही कृत्याचा...

मराठवाडातील बातम्या

धनगर समाजाच्या मुलांच्या हातामध्ये एसटीचे प्रमाणपत्र द्या ,अन्यथा धनगर समाज हा राज्य सरकारच्या विरोधात विधानसभा निवडणुकीला गेल्याशिवाय राहणार नाय

बीड :दि 19/09/2024 रोजी बीड येथे महाराष्ट्रातील धनगर जमातीसाठी असलेल्या अनुसूचित जमातीच्या( ST) आरक्षणाची अंमलबजावणी शिंदे...

निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला.

निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला. भारतीय वार्ताजिल्हा...

*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* *शहरात विजांचा कडकडाटाचा*

*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* शहरात विजांचा कडकडाटाचा ✍️उत्तम माने लातूर लातूर:- शहरासह ग्रामीण...