सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
Reg No. MH-36-0010493
जगदीश का. काशिकर
कायदा (लॉ) / सुरक्षा सलाहगार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
*प्रश्न :* एखाद्या व्यक्तीने नोंदणीकृत खरेदी दस्ताची प्रत तलाठी यांच्याकडे हजर केल्यास कोणत्या प्रकारची कार्यवाही करावी? तसेच काय खबरदारी घ्यावी?
*उत्तर:* कोणताही हक्क धारण केल्याची माहिती कायदेशीरपणे प्राप्त झाल्यावर तलाठी यांनी त्याची नोंद गाव नमुना सहामध्ये नोंदविणे आवश्यक आहे.
★तलाठी यांनी खरेदी घेणार किंवा खरेदी देणार यांनी समक्ष हजर केलेली दस्ताची प्नत साक्षांकित असावी याची खात्री करावी.
कोणताही हक्क संपादन झाल्यावर तलाठ्यांना लेखी अथवा तोंडी कळविले जाते याला 'वर्दी' म्हणतात. अशा वर्दीची पोहोच नमुना सात मध्ये द्यायचे असते.
सदर व्यवहाराची नोंद गाव नमुना ६मध्ये (हक्काचे पत्रक किंवा फेरफार रजिस्टरष) करावी. (म.ज.म.अ. १९६६,
कलम 150(१)
★ गाव नमुना सहामध्ये नोंद घेतल्यावर गाव नमुना सहाची एक प्नत सर्व हितसंबंधितांच्या माहितीसाठी गाव चावडीच्या नोटीस बोर्डवर लावणे आवश्यक आहे.
नोंदणीकृत दस्त/अ पत्रक/इंडेक्स-२ मध्ये तसेच खरेदी देणार याच्या ७/१२ उ उताऱ्यावर नमूद हितसंबंधीतांना नमुना १ मध्ये, १५ दिवसाच्या मुदतीत समक्ष हजर राहण्याची सूचना देणारी नोटीस बजवावी.
या नोटीसीची एक प्रत तलाठी कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिध्द करावी. [म.ज.म.अ.१९६६, कलम १५0
★ नोटीसीनुसार सर्व हितसंबंधीत हजर राहिल्यास त्या सर्वांची संमतीदर्शन स्वाक्षरी नोटीस पुस्तकावर घ्यावी. जमीन शेतीची आणि शेती क्षेत्रात असल्यास, खरेदी घेणार हे शेतकरी असल्याची पुराव्यासह खात्री करावी.
फेरफार नोंदीबाबत कोणी लेखी अथवा तोंडी आक्षेप/हरकत घेतल्यास त्यास दयावयाची पोहोच नमुना १० मध्ये दयावी. [म.ज.म.अ. १९६६ कलम १५० (३)) आणि हरकतीची नोंद विवादग्रस्त प्रकरणांची नोंदवहीत (गाव नमुना सहा-अ मध्ये) करावी.
★ विवादास्पद नोंदीवर निर्णय घेण्याचे अधिकार अव्वल कारकुनाच्या हृदद्यापेक्षा कमी नाही अशा महसुली किंवा भूमापन अधिकाऱ्यांना आहेत. म.ज.म.अ. १९६६ कलम १५० (६)
कोणत्याही फेरफार नोंदीवर घेतल्या गेलेल्या हरकतीची माहिती मंडलअधिकारी/प्रमाणन अधिकारी यांना दयावी.
★ कोणत्याही फेरफार नोंदीवर निर्णय घेण्यासाठी प्रमाणन अधिकान्याच्या भेटीची सूचना नमुना ११ मध्ये तलाठ्यास प्राप्त होते.
फेरफार नोंदीबाबत निर्णय घेण्यासाठी मंडलअधिकारी/प्रमाणन अधिकारी यांच्या भेटीची सूचना नमुना ११मध्ये प्राप्त झाल्यानंतर, तलाठ्याने त्या नोंदीशी संबंधीत सर्व हितसंबंधीतांना सुनावणीसाठी हजर राहण्याची नोटीस नमुना १२ मध्ये बजवायची असते..
प्रमाणन अधिकान्यांनी विवादास्पद प्रकरणे शक्यतो एका वर्षाच्या आत निकालात काढावी.
म.ज.म.अ. १९६६ कलम १२५० (४))
★ गाव नमुना सहा मधील कोणतीही फेरफार नोंद सक्षम अधिकान्याने प्रमाणीत केल्याशिवाय त्याची नोंद अधिकार अभिलेखात नोंदविता येत नाही.
लेखक - डॉ. संजय कुंडेटकर, (उपजिल्हाधिकारी, महाराष्ट्र शासन)
शब्दांकन व प्रसारण:- श्री. अमरनाथ स. शेणेकर (रिअल इस्टेट कन्सलटन्सट), कोल्हापूर.
मोबाईल: 7350201000, 8459348218.
महसूली कामकाज, शेतकऱ्यांसाठी तसेच मिळकत धारकांसाठी उपयुक्त अनेक विषयी माहिती आपणास येथून पुढील लेखात मिळेल त्याचा व्यवस्थीत अभ्यास करून विषय अध्यायन करावेत, सूचना;- आपण जमा केलेले पुरावे, उत्तरे, दस्तऐवज, कागदपत्रे, इत्यादी निष्णात वकिलांस दाखवून त्यांचा सल्ला घ्या.
सहकारी संस्थेचा सहकार कायदा (सोसायटी) व ओनरशिप कायदा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी श्री जगदीश काशीकर यांनी “जेकेके विकली न्युज बुलेटीन” (https://www.facebook.com/groups/485736278978687/) / (http://www.facebook.com/JKK-Weekly-News-Bulletin-111420427059697/) हा फेसबुक ग्रुप/पेज त्यांनी जनतेच्या माहीतीसाठी बनविला आहे व ताे आपण कुपया सर्वानी बघावा ही मनापासुन विनंती करत आहेत.
ऊपनिबंधक श्री नितीन दहिभाते यांनी गेली तीन ते चार वर्ष तनावात असलेल्या मुंबईतील अंधेरी - पश्चिम येथील काेमल रहिवाशी साेसायटीवर वर्षभरापुर्वि प्रशासक (अेडवाेकेट श्री सुनिल खोचरे व श्री विठ्ठल ऊंदे) नेमुन सोसायटी आपल्या ताब्यात घेतली होती व येणारया काही दिवसात श्री जगदिश काशीकर यांना याेग्य न्याय मिळुन गैरव्यवहार करणारया आजी/माजी साेसायटी अध्यक्श, सचिव व अन्य कमीटी सदस्यांवर/सभासदांवर तसेच ज्यांनीं गेर व्यवहार करुन आपल्या सदनिका विकत घेतल्या किंवा विकल्या व आपल्या सदनिकेचे नुतनिकरण करताना संरचनेत बदल केला आहे किंवा ईतर गेरव्यवहार केला आहे त्या आजि व माजि राजकिय पाठिंबा व आर्थिक सुबत्ता असलेले सुशिक्क्षित गुंड प्रवृत्तिच्या गुन्हेगार सभासदांवर याेग्य ती कारवाई करून सोसायटी पुन्हा भविष्यात कोमल रहिवाशी सोसायटी
व्यवस्थीत चालणार आहे का? हे दिसणार आहे तसेच या विभागातील सर्व राजकिय पक्षाचे नेते, कार्यकर्ते तसेच ईतर सामाजिक कार्यकर्ते रहिवाशी सोसायटीला कोणताहि आपला स्वार्थ्य न साधता कसे सहकार्य सोसायटीतील योग्य रहिवाश्यांना ही गंभीर समस्या सोडविण्यास मदत करणार आहेत हे मुबंई महानगर पालिकेच्या येणारया निवडणूका निमित्ताने सर्व विभागातील जनतेला/नागरिकांना दिसणार आहे व मुंबईकर जनतेने या घटनेवर योग्य पध्दति ने लक्ष ठेऊन येणारया सर्व निवडणूका मध्ये योग्य ऊमेदवारांना कोणताहि राजकिय पक्ष न बघता निवडुन देणे जनसामान्यांच्या हितासाठि तसेच या देशातील भारतीय जनतेसाठी फार महत्त्वाचे आहे.
अश्या परिस्थीतीत श्री जगदीश काशिकर जनतेला खालील प्रमाणे आवााहन करत आहेत की त्यांनी स्वताच्या व ईतरांच्या बचावासाठी व त्यांच्या न्याय हक्कासाठी नामवंत वकीलांची टीम तयार केली आहे व सर्व जनतेने जी हया कारणानी पीडीत आहे त्यांनी अन्याया विरूध्द आवाज ऊठवावा व मदत मागावी.
या गंभीर विषयावर कोणालाही कायदेशिर मदत पाहीजे असल्यास त्यांनी श्री जगदीश काशीकर यांच्या व्हाॅट्सअप क्रमांकावर मदती साथी संपर्क करावा :- व्हाटसअप नंबर 9768425757.
सर्वाना सगळया कायदेशीर प्रकरणात माेफत कायदेशिर सल्ला देण्यात येईल व जिथे याेग्य कागदपत्र बनवण्याची गरज आहे तीथे अल्प दरात कागदपत्र बनवुन देण्यात येतील तरी कुपया गरजवंतानी या सेवेचा फायदा घ्यावा ही विनंती व ही सेवा फक्त मुबंई व ठाणे जिल्हयापुरती मयॉदीत असुन आता ती सेवा संपुर्ण देशभर देण्याचा त्यांचा विचार आहे याची सर्व पीडीत जनतेने नाेंद घ्यावी ही विनंती व कुपया या सेवेची माहीती सर्व गरजवंताना दयावी ही विनंती.
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
*सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र* मुंबई, दिनांक १३: छत्रपती...
भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरमुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व...
भारतीय वार्ता : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राजघराण्यातील वर्तमानातील युवराज्ञी संयोगिता राजे संभाजी...