Home / महाराष्ट्र / मराठवाडा / पंढरपुरात कोट्यवधी...

महाराष्ट्र    |    मराठवाडा

पंढरपुरात कोट्यवधी रुपयांचा महाभ्रष्टाचार

पंढरपुरात कोट्यवधी रुपयांचा महाभ्रष्टाचार

पंढरपुरात कोट्यवधी रुपयांचा महाभ्रष्टाचार

 

✍️जगदीश काशीकर

     पंढरपूर

 

पंढरपूर:--महाराष्ट्रातील पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात पोते भरून खोटे सोने सापडले आहे,

अशी माहिती मंदिर व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. मात्र अधिकाऱ्यांची ही माहिती संशयास्पद आहे. याच्या पूर्वीच्या अधिकाऱ्यांनी याआधीही कोट्यवधी रुपयांचे गैरव्यवहार केलेले आहेत. या प्रकरणातही नव्या अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांचा महाभ्रष्टाचार केलेला आहे, इतकेच नव्हे तर हा भ्रष्टाचार लपविण्यासाठी त्यांनी भोळ्या भाबड्या वारकऱ्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केलेले आहे, अशी खळबळजनक माहिती 'स्प्राऊट्स'च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमला मिळालेली आहे.

श्रीक्षेत्र पंढरपूर येथील मंदिरात काही भाविक मुद्दामहून बनावट दागिने टाकत आहेत, अशी चक्क खोटी व वारकऱ्यांची दिशाभूल करणारी माहिती मंदिर प्रशासनाने दिलेली आहे. या प्रकरणातून स्वतःचे हात झटकण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. वास्तविक मंदिरातीलच कोणीतरी खरे दागिने लंपास केलेले आहेत व त्याजागी खोटे दागिने ठेवून दागिन्यांचा अपहार केलेला आहे, अशी शक्यता आहे.

मंदिर प्रशासनाने केलेले गैरव्यवहार:

* दानपेटीत जमा होणारे पैसे रोजच्या रोज बँकेत जमा न करता दोन-दोन महिने पोत्यात भरून ठेवणे.

* हिशेबाच्या वह्या आणि पावती पुस्तके यांच्या वापराच्या नोंदी न ठेवणे.

* प्रतिवर्षी लाखो रुपयांचा खर्च गोधनाच्या खाद्यासाठी करणे; मात्र दुग्धोत्पादनातून मिळणारे उत्पन्न न दाखवणे.

* मंदिरातील गोधन कसायांना विकणे.

* 48 लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च लेखापरीक्षकांकडून तपासून न घेणे.

* महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची इमारत भाडे करारावर घेणे; मात्र या इमारतीचा अपेक्षित असा वापर न झाल्याने वर्ष 2000 ते 2010 या कालावधीत मंदिराला 47 लाख 97 हजार 716 रुपयांचा तोटा होणे

पंढरपूर येथे विठ्ठलाचे मंदिर सुप्रसिद्ध आहे. या मंदिरामुळे पंढरपूरला 'दक्षिणेची काशी' म्हणून मानले गेले आहे. दरवर्षी जवळपास लाखो वारकरी आणि वैष्णवजन  विठोबा माउलीचे दर्शन घेण्यासाठी येथील विठ्ठल मंदिराला भेट देतात. यातील कित्येक वारकरी दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने शेकडो किलोमीटर पायी वारी करतात. या वारकऱ्यांवर मंदिर व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी केलेले आरोप अत्यंत संतापजनक आहेत. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केलेली आहे.

वारकऱ्यांनी भक्तिभावाने विठ्ठल माऊलींना अर्पण करण्यासाठी आणलेले दागिने प्रशासनाने काउंटरवर जमा करावेत. या दागिन्यांच्या सोने पडताळणीसाठी पूर्ण वेळ valuer नेमण्यात यावा. त्यामुळे सोन्याची पडताळणी त्वरित करणे शक्य होईल. त्यानंतर त्याची रीतसर पावती देण्यात यावी. त्यामुळे भाविकांची फसवणूक टळेल व मंदिरातील भ्रष्टाचाराला आळा बसेल

ताज्या बातम्या

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक. 19 December, 2024

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक.

वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना  न्याय. 18 December, 2024

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना न्याय.

वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* 16 December, 2024

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...

परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची  विटंबना करणाऱ्यां समाज कंठकावर कारवाई करा, भारतीय बौध्द महासभा,समता सैनिक दल व वंचित बहुजन आघाडी यांची मागणी. 16 December, 2024

परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यां समाज कंठकावर कारवाई करा, भारतीय बौध्द महासभा,समता सैनिक दल व वंचित बहुजन आघाडी यांची मागणी.

वणी:- परभणी येथे १० डिसेंबर रोजी एका समाजकंटकाने भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली. या देशद्रोही कृत्याचा...

मराठवाडातील बातम्या

धनगर समाजाच्या मुलांच्या हातामध्ये एसटीचे प्रमाणपत्र द्या ,अन्यथा धनगर समाज हा राज्य सरकारच्या विरोधात विधानसभा निवडणुकीला गेल्याशिवाय राहणार नाय

बीड :दि 19/09/2024 रोजी बीड येथे महाराष्ट्रातील धनगर जमातीसाठी असलेल्या अनुसूचित जमातीच्या( ST) आरक्षणाची अंमलबजावणी शिंदे...

निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला.

निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला. भारतीय वार्ताजिल्हा...

*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* *शहरात विजांचा कडकडाटाचा*

*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* शहरात विजांचा कडकडाटाचा ✍️उत्तम माने लातूर लातूर:- शहरासह ग्रामीण...