मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
...
Reg No. MH-36-0010493
मेहकर परिसरातील २५ हजार एकर शेत जमीन सिंचनाखाली येणार : आ.ईश्वर खंड्रे
✍️ उत्तम माने
मो.नः8484878818
लातूर : - मेहकर : मेहकरसह परिसरातील शेतकन्यांची सोय व्हावी, म्हणून ७६२ कोटींची मेहकर लिफ्ट इरिगेशन सिंचाई योजना मंजूर करून आणली. या योजनेमुळे परिसरातील २५ हजार एकर सिंचनाखाली येणार असून, या भागात हरितक्रांती निर्माण होण्यास वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन आ. ईश्वर खंड्रे यांनी केले.
भालकी तालुक्यातील आळवाई येथे ७ जानेवारी रोजी भव्य सत्कार समारंभात
ते बोलत होते. मंचावर हनुमंत चव्हाण, शिवराज हसनकर, प्रवीण नमशट्टे, अशोकराव तलवार सिंग, अनिरुद्ध पाटील, गुणवंत आप्पा गंदगे, विलास गंदगे, विद्येवान मंगणे, दिलीप पाटील, हंसराज पाटील, विलास मोरे, जाफर पटेल, विलास माशट्टे, चंद्रशेखर पाटील, अंबादास कोहरे, अकबर पटेलांनी, बंशीलाल बोरोळे, बाबुराव डॉक्टरों, विठ्ठल पाटील, लक्ष्मण वाळके, प्रकाश माशट्टे, मारुती मगर, मगबुल पटेल, गुंडप्पा गंदगी, अण्णाराव पाटील, चंद्रप्पा वाचे, शरद मंदगे गोपाळ सूर्यवंशी, खालेद पटेल आदी उपस्थित होते.
मेहकर लिफ्ट इरिगेशन सिंचाई योजनेसाठी ७६२ कोटी रुपये अनुदान मंजूर करून आणल्याबद्दल भालकीचे आमदार ईश्वर खंड्रे यांचा शाल, पुष्पहार फेटा व महात्मा बसवेश्वरांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. आमदार ईश्वर खंड्रे म्हणाले, कर्नाटक राज्यांमध्ये काँग्रेसची सरकार असताना २०१९ २०२० मध्ये मेहकर सिंचन लिफ्ट इरिगेशन सिंचाई योजनेचे अंदाजपत्रक तयार करून सरकारला दाखल केलो होतो. माझ्या या सततच्या प्रयत्नाने ही सिंचन योजना अमलात आली आहे. या योजने अंतर्गत मेहकर व सायगाव परिसरातील सर्व गावातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. सरकारकडून कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. २५ हजार एकर जमीन ओलिताखाली येणार आहे, असे सांगून आमदार ईश्वर खंड्रे यानी सिंचाई योजनेसाठी अनुदान मंजूर करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे आभार मानल. सूत्रसंचालन कमलाकर निडवचे यांनी केले. आभार दिलीप रामचिरे यांनी मानले. यावेळी गाव परिसरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
मेहकर लिफ्ट इरिगेशन सिंचन योजना विजयी यात्रा
आ. ईश्वर खंड्रे यांनी ७६२ कोटींची मेहकर लिफ्ट इरिगेशन सिंचन योजना मंजूर करुन आणल्याबद्दल मेहकर ते आळवाई या मार्गावर मोटरसायकलची विजयी यात्रा काढण्यात आली. रॅलीमध्ये सायगाव सर्कलमधील केशर जवळगा पांढरी, हलशी, इंचुर, सांगाव, मेहकर बसवनवाडी, नारदा संगम, बोळेगाव, अटरगा, गुंजरगा, माणकेश्वर, श्रीमाळी, तुगाव, वांजरखेडा, कॉगळि, हरेवाडी, यलमवाडी येथील युवा कांग्रेस कार्यकत्यांचा समावेश होता. ढोल ताशाच्या गाजत हजारोच्या संख्येने युवकांनी मेहकर ते आळवाई रस्त्याने मोटरसायकल रॅली आमदार ईश्वर खंड्रे यांच्या नेतृत्वात काढण्यात आली.
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...
वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...
वणी:- परभणी येथे १० डिसेंबर रोजी एका समाजकंटकाने भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली. या देशद्रोही कृत्याचा...
बीड :दि 19/09/2024 रोजी बीड येथे महाराष्ट्रातील धनगर जमातीसाठी असलेल्या अनुसूचित जमातीच्या( ST) आरक्षणाची अंमलबजावणी शिंदे...
निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला. भारतीय वार्ताजिल्हा...
*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* शहरात विजांचा कडकडाटाचा ✍️उत्तम माने लातूर लातूर:- शहरासह ग्रामीण...