मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
...
Reg No. MH-36-0010493
देवणी नगरपंचायत च्या वतीने डॉ. विनायकराव पाटील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉक्टरांचा सत्कार...
✍️उत्तम माने
मो.नंः 8484878818
लातूर : - देवणी तालुक्यात नवीन उभारण्यात आलेल्या डॉ.विनायकराव पाटील हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या सज्ज डॉक्टरांचा सत्कार देवणी नगरपंचायत च्या वतीने करण्यात आला.गेल्या आठवड्यात डॉ.अमित पाटील,डॉ.सौ.देवश्री पाटील,डॉ.सौ.श्वेता पाटील व डॉ.आशिष पाटील यांच्या अथक प्रयत्नाने कर्करोगाचे चार शस्त्रक्रिया यशस्वीपणे केले असून सतत बारा तास चालेल्या शस्त्रक्रियेसाठी डॉ.अमित पाटील व डॉ.सौ.देवश्री पाटील यांनी लातूर जिल्ह्यातील पहिली कर्करोगाची शस्त्रक्रिया जे की मोठ्या शहारासारख्या ठिकाणी होते ती शस्त्रक्रिया देवणीत करून कर्करोगाच्या रुग्णांना जीवनदान दिले आहेत.व तसेच रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीतून निधी मिळवून दिले आहेत.व तसेच हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेसाठी आमदार निधी,मुख्यमंत्री निधी,सिद्धिविनायक ट्रस्ट.एस.बी.आय जनरल एनशोरन्स आदी योजनेतून शस्त्रक्रिया करून रुग्णाकडून पैसे न घेता या योजनेचा लाभ करुन देत आहेत.तसेच अनेक ट्रस्टस व मंदिर चॅरीटी निधी मिळण्यास या हॉस्पिटलला पात्र घोषित करण्यात आली आहेत.
त्यामुळे कॅन्सर व इतर गंभीर आजारा साठी या पुढे पेशंटच्या ऑपरेशन्स व खर्चिक उपचारासाठी खर्चाचा मोठा वाटा शासन व ट्रस्ट उचलणार आहेत. त्यात कॅन्सर ग्रस्त जीभ काढून त्या ठिकाणी त्याच रुग्णाच्या शरीराचे भाग वापरून नवीन जीभ तयार करून जुन्या जीभेच्या ठिकाणी रोपन यशस्वी रित्या करण्यात आले. अशा दोन सर्जरीज झाल्या आहेत.तसेच दुस-या ऐका रुग्णाच्या तोंडातील दोन कॅन्सरचे जबडे काढून त्या ठिकाणी त्याच व्यक्तिचे कमी महत्वाचे हाड वापरून नवीन जबडे तयार करून त्याचेही यशस्वी रित्या रोपन करण्यात आले आहे. अशा प्रकारच्या सर्जरीज मुंबई, पुणे सारख्या मोठ्या शहरात होतात.परंतु प्रथमच देवणी येथील डॉ विनायकराव पाटील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये आता होऊ लागल्या आहेत.
तसेच सोनोग्राफीची तपासणी जी रु ९७५ देऊन केली जाते ती या हॉस्पिटल मध्ये गर्भवती महिला साठी देवणीच्या शासकीय हॉस्पिटल मध्ये नोंदणी करून आल्यास ती या हॉस्पिटल मध्ये मोफत केली जाते. सदर तपासणी फी शासन या हॉस्पिटला देते.अश्या या त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल नगरपंचायत चे उपनगाराध्यक्ष अमित मानकरी यांच्या हस्ते डॉ.अमित पाटील यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी भगवानराव पाटील,डॉ.आशिष पाटील,डॉ.सौ श्वेता पाटील,डॉ.सौ.देवश्री पाटील ,रुग्णालयातील कर्मचारी आदी व नगरपंचायत येथील नगरसेवक महादेव मळभगे,बंटी सूर्यवंशी,देविदास पतंगे,पत्रकार रमेश कोतवाल,रेवन मळभगे आदींची उपस्थिती होती.
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...
वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...
वणी:- परभणी येथे १० डिसेंबर रोजी एका समाजकंटकाने भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली. या देशद्रोही कृत्याचा...
बीड :दि 19/09/2024 रोजी बीड येथे महाराष्ट्रातील धनगर जमातीसाठी असलेल्या अनुसूचित जमातीच्या( ST) आरक्षणाची अंमलबजावणी शिंदे...
निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला. भारतीय वार्ताजिल्हा...
*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* शहरात विजांचा कडकडाटाचा ✍️उत्तम माने लातूर लातूर:- शहरासह ग्रामीण...