मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
...
Reg No. MH-36-0010493
✍???? *नवनाथ दत्तात्रय रेपे*
१. संविधानाच्या पडद्याआड संघोट्यांचा लिंबू
२. भट बोकड मोठा
३. डोळ्यात माणसांच्या फेकून धूळ गेला !
या पुस्तकाचे लेखक
repe9nat@gmail.com
*"देव दाखवी असा कोण गुरू ! जेथे तेथे दगड शेंदरू !*
*दगडाचा बोलेल तो कैंसा ! कोणे काळी वाचा फुटे त्यासी !*
*देव देव करिती शिणले माझे मन ! पाणी आणि पाषाण जेथे तेथे !"*
असे म्हणत ज्या संत नामदेव महाराजांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला त्यात बुवाबाजी कर्मकांड थोतांडाला मुळीच थारा नाही. त्याच वारकरी संप्रदायाचा कळस असलेले जगद्गुरु तुकोबाराय यांनी पण आपल्या गाथेच्या माध्यमातून अनिष्ट चालीरिती कर्मकांड यांना नेस्तनाबूत करण्यासाठी अभंगांची रचना करून समाजाला प्रबोधीत केलं. पण आज जो वारकरी संप्रदाय आहे तो संत नामदेव महाराजांपासून ते संत गाडगेबाबा यांच्यापर्यंत एकाही संताने कर्मकांड थोतांडाला खतपाणी घातले नाही. परंतू त्याच संतांचे नाव घेऊन आज काही जंत समाजात दुही माजवून लोकांना कर्मकांडाच्या कर्दमात ढकलून स्वतःचा धंदा जोरात चालवत आहेत. देव आणि धर्मावर तार्किक प्रश्न करणे मुळीच गुन्हा नाही असा आदेश औरंगाबादच्या खंडपीठाने यापुर्वीच दिला आहे. पण ज्या काल्पनिक कथांच्या आधारावर निर्मिलेल्या गोष्टींवर ज्यांची दुकानदारी चालते त्यांना थोडीच औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय मान्य होणार आहे. आंबेडकरवादी चळवळीतील सुषमा अंधारेंनी २००९ साली एका कार्यक्रमात संत ज्ञानेश्वर व त्यांनी रेड्यामुखी बोललेले वेद यावर काही तार्किक प्रश्न विचारले असतील तर काय चुकीचे आहे ? आपल्या घरचं लहान लेकरू देखील त्याला जी गोष्ट समजत नाही ती समजून घेण्यासाठी प्रतिप्रश्न करून उत्तराची अपेक्षा करते, तेव्हा त्यांची आई त्यांच्या मुस्काटातच मारते का ? तर मुळीच नाही. मग सुषमा अंधारे यांनी जे प्रश्न विचारले त्याची उत्तरे तथाकथित, बाजारू, पोटभरू, जाॅकेट घालून पाकीट मारणारे व स्वतःला राष्ट्रीय किर्तनकार म्हणून घेणारे हे भामटे का देत नाहीत ? म्हणजेच अंधारेंच्या प्रश्नांची उत्तरे देण्याची पात्रता एकाही तथाकथित स्वयंघोषीत राष्ट्रीय किर्तनकाराकडे नाही हेच स्पष्ट होत. म्हणून तर अंधारेंचा आवाज दाबण्याचा प्रयत्न इथल्या ख-या वारकरी संप्रदायात घुसलेल्या घुसखोरांकडून होताना दिसत आहे. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सरळ एका वाक्यात देण्याऐवजी ते सुषमा अंधारेंच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत असतील तर या बाजारू पोटभरूंची किती नीच मानसिकता आहे हे स्पष्ट होत.
*"पाषाणाचा देव बोलेचि ना कधी ! हरि भवव्याधि केंचि धडे !*
*दगडाची मूर्ति मानिला ईश्वर ! परि तो साचार देव भिन्न !*
*दगडाचा देव इच्छा पुरवित ! तरि का भंगत आघाताने !*
*पाषाण देवाची करिती जे भक्ती ! सर्वस्वी मुकती मूढपणे !*
*पाषाणाचा देव बोलत भक्तांते ! सांगत ऐकते मूर्ख दोघे !"*
असं संत नामदेव महाराज म्हणाले आहेत. त्यामुळे सुषमा अंधारेंनी मारलेला तीर योग्य ठिकाणी लागला आहे म्हणून तर या पोटभरूचा तिळपापड होत आहे, म्हणून तर तथाकथित हभप पुरुषोत्तम पाटील म्हणतात की, *"आता तुझा कार्यक्रम लावणार म्हणजे लावणार, जेवढे का बावळट जन्माला घातले तेवढे फक्त माझ्या हिंदू धर्मातच का घातले ? संविधानाने मला स्वतंत्र विचार मांडण्याचा अधिकार दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर राज्यपाल बोलले तर सर्वपक्षीय नेते एकत्रित झाले, मग वारकरी संप्रदायाच्या विरोधात सुषमा अंधारे बोलली तरी अजून वारकरी संप्रदायातील मंडळी एकत्रित झाली नाही. जेव्हा संविधान नव्हतं तेव्हा ज्ञानेश्वरी होती, आजकालचे शेंबडे लोक तुम्ही अन् आम्हाला पुरोगामी सांगता."* असं म्हणाले. स्वतःच्या नावापुढे हभप उपाधी लावून फिरणा-या पुरूषोत्तम पाटील यांना महीलेशी कोणत्या भाषेत बोलावे हेच समजत नसेल तर यांनाच तुकोबा समजलेत का असा प्रश्न पडतो. अंधारेंचा कार्यक्रम लावण्याची भाषा करणा-या हभपनी आधी आंधारेंनी विचालेल्या प्रश्नांची तार्किक उत्तरे द्यावीत अन्यथा जेवढे बावळट जन्मले त्यात पुरूषोत्तम पाटील यांचा समावेश नाही असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही का ? शिवद्रोही राज्यपाल विरोधात प्रचंड रान पेटले तेव्हा सर्वपक्षीय लोक एकत्र झाले पण त्यात पुरूषोत्तम पाटील कुठेच का दिसले नाहीत ? का हो पाटील तुम्ही काय सज्जनगडावर जाऊन रामदासाच्या लंगोटीची मापे घेत होते का ? इतरांना शेंबडे म्हणणारे पुरूषोत्तम पाटील जेव्हा तुकोबांची बदनामी होते तेव्हा तुम्ही कुठल्या मठात गांजा खेचत बसलेले असतात ?
बिग बाॅस रिटर्न शिवलीला पाटिल यांनाही अंधारेंचे शब्द खुपच झोंबलेले दिसतात म्हणून तर त्या म्हणतात की, माकड पुल बांधतात हे माकडीणीला कस कळेल ? आम्ही तुकोबांना व वारकरी संप्रदायाला माननारी माणसं आहोत. दोन चार माकडांमुळे काहीच होणार नाही. सत्तेसाठी नावासाठी काहीही करावं का ? हाय इतभर पण दाखवतय हातभर अशी अवस्था आहे यांची. समोरील भक्तांना मी माझं निम्म पाकीट देऊ का ? जसं संबळ वाजवल्याशिवाय लोक गोळा होत नाहीत अशीच यांचा अवस्था आहे. कोणीही वारकरी संप्रदायाला हालक्यात घ्यायच नाही. ज्ञानदेवे रचिला पाया तुकीया झाला से कळस ! येड्यागबाळ्यांचा आणि भामट्यांचा परमार्थ नाही." इतरांना उपदेश देऊन स्वतः च्या वर्तनात थोडाही बदल न करणा-या याच त्या शिवलीला पाटील. माकडांनी बांधलेला पुल माकडांनाच तर दिसतो हे पटण्यासारखे आहे. तुम्ही जरी स्वतःला वारकरी संप्रदायातील म्हणून घेत असला तरी यावर विश्वास ठेवणे सहजपणे शक्य नाही. कारण तुम्ही स्वतःच्या फायद्यासाठी जसे बिग बॉस मध्ये गेलात तसेच तर वारकरी संप्रदायात आला नसाल कशावरून ? इतभर आणि हातभर चा सिध्दांत भरपुर अनुभवलेला दिसत आहे ? अहो ज्ञानदेव नाही तर नामदेवे रचिला पाया असं म्हणा शिवलीलाजी कारण जे ज्ञानेश्वर संत नामदेव यांच्याकडे मला शिकवा मला सांगा म्हणून हात जोडत होते त्यांनी कसा काय वारकरी सांप्रदायाचा पाया रचला असेल ? पण तरीही तुमच्यासारखे तथाकथित बाजारू किर्तनकार वारकरी संप्रदायाचा पाया रचनारे संत ज्ञानेश्वरच म्हणत असतील तर तुम्हाला मनोविकार तज्ञांकडे न्यायची वेळ आली आहे असं म्हटलं तरी चालेल. कारण संत ज्ञानदेव व संत नामदेव यांच्यातील संवादाचा एक अभंग आहे तो असा की,
*ज्ञानदेव म्हणे परियेसी नामया ! अद्वैत आत्मया प्रेम मूर्ति !*
*भक्तिभावें तुवां जोडिले अविनाश ! सांग पा कैसा सुमार्ग त्याचा !*
*कैसा तो साधावा सांग भजन विधि ! कैसी बुद्धि सत्वशीळ !*
*कैसा निर्विकार ध्यानाचा प्रकार ! हा सर्व विचार सांग मज !*
रेडा आणि संत ज्ञानेश्वर यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर तथाकथित पोटभरू लोक पिसाळल्यागत वर्तन करत आहेत. सुषमा अंधारे यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन मोकळे होण्यापेक्षा त्यांची मापे काढण्यात जर तथाकथित हभपना मोठेपणा वाटत आहे असं वाटतं. कारण तथाकथित प्रवचनकार रुपाली सवने म्हणतात की, ज्ञानोबांनी रेड्याच्या मुखातून वेद वदवले हे कित्येक रेड्यांना पटत नाही. पण आमच्यासारखे लाखो रेडे बोलवले ही काय कमी क्रांती आहे. आतापर्यंत रेडेच बोलत होते आता तर म्हशाडीपण बोलत आहेत. तुमचं तोंड सुद्धा पहावत नाही लोकांना, नको त्या संघटनेचे लोक सनातन हिंदु परंपरेच्या विरोधात वक्तव्य करत आहेत. जी बाई नव-यासोबत नांदत नाही ती जगाला काय ज्ञान देणार आहे. संतांचा अवमान करून आमच्या आंतकरणाला ठेच पोहोचणार असाल तर आम्हाला झेंड्याची दांडी ही काढता येते. देवाची ओळख आम्हाला साधू संतांनी करून दिली आहे. जीला नवरा कळाला नाही तीला राम काय कळणार आहे ? राजकारणामध्ये पागल झाली बाई तू ! तुम्हाला नव-याचा धाक नाही ना बापाचा धाक अशा पेक्षा वेश्या ब-या. या बाईविरोधात सर्व हिंदूनी सनातन धर्मियांनी एकत्रित येण्याची गरज आहे." लोकांना रेडे बोललेल्या तथाकथित हभप सवने यांना सांगावं वाटत की, ज्ञानोबांनी रेड्यामुखी वेद वदवले हे काही रेड्यांना पटत नसले तर तथाकथित येड्यांना पटते तो दोष कोणाचा ? तर्कवाद असला तर त्याला क्रांती म्हणतात अन् डोळेझाक केल्यास त्याला अधोगती म्हणतात. रेडा अन् वेदांचा विषय काढताच तथाकथित बाजारू लोक येडे का होत आहेत ? नको त्या संघटना म्हणजे कोणत्या संघटना आहेत ? अंधारे ही बाई नव-या सोबत राहत नसेल म्हणून तीला बोलण्याचा अधिकार नसेल तर बायकोला सोडून देणा-या नरेंद्र मोदींना मन की बात करण्याचा काय अधिकार आहे ? कोणत्या संघटनेचे लोक सनातन हिंदु परंपरेच्या विरोधात वक्तव्य करत आहेत ? संत तुकोबांचा जेव्हा अवमान होतो तेव्हा तुमचे आंतकरण आनंदाच्या उकाळ्या मारते का ? दगडातील देवाची नव्हे तर माणसातील देवाची ओळख संतांनी करून दिली आहे. राम कळण्यासाठी पेरियार रामास्वामी लिखित रामायणातील सत्य हे पुस्तक वाचावं लागलं पण ते वाचण्याची तेवढी पात्रता आजच्या किर्तनकारात आहे का ? इतरांना वेश्या म्हणणारे तथाकथित बाजारू लोक कंबरा बांधून लोकांचे किस्से कापतात त्याचे काय ? अंधारे विरोधात ब्रम्हा विष्णू महेश यांनाही सोबतीला घेऊन एक व्हा पण एकदा त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मात्र नक्की द्या, कारण अंधारेंच्या प्रश्नांची उत्तरे महाराष्ट्रातील जनतेला पण हवी आहेत. कारण संत नामदेव महाराज म्हणाले आहेत की,
*"तोंड धरून मेंढा मारा ! म्हणति सोमयाग करा !*
*शेंदूर माखूनिया धोंडा ! त्यासि भजती पोरेरांडा !"*
भुमाफिया हभप गणेश शेटे, तथाकथित हभप मडके महाराज, प्रवचनकार रुपाली सवने, बीग बाॅस रिटर्न तथाकथित किर्तनकार शिवलीला पाटिल व हभप पुरुषोत्तम पाटील ही मंडळी किर्तनातून लोकांना काय ज्ञान देत असतील, कारण यांच्याकडेच ज्ञानाची कमतरता आहे ? अशा अपु-या ज्ञानामुळेच तर
स्वतःला स्वंयघोषित किर्तनकार म्हणून घेणारे लोक संत तुकाराम महाराज गरूडावर बसून सदेह वैकुंठाला गेले असं म्हणतात. पण वारकरी संप्रदायाचा पाया रचनारे संत नामदेव महाराजांचे वैकुंठाविषयी काय मत होते हे आजच्या तथाकथित हभपना माहीत आहे का ? ज्या नामदेवांनी वैकुंठ नाकारला त्या वैकुंठाला संत तुकाराम महाराज जातीलच कशाला ? म्हणजेच या तथाकथित बाजारूनी आम्हाला आजपर्यंत येड्यातच काढलं अस म्हटलं तर काय चुकीचे आहे ? कारण वारकरी संप्रदायाचा विचार हा संत नामदेवांनी दिला. त्याच विचारांचा जागर करण्याच काम संत तुकोबांनी केलं तर मग तुकोबांनी देखिल वैकुंठ नाकारलाच असेल ना ? कारण संत नामदेव महाराज वैकुंठाबद्दल म्हणतात की,
*वैकुंठासी आम्हा नको धाडू हरी ! वास दे पंढरी सर्वकाळ !*
*वैकुंठ कोपट जुनाट झोपडी ! नको अडा आडी घालू आम्हा !*
*वैकुंठी जाऊनि काय बा करावे ! उगेचि बैसावे मौनरूप !*
*नामा म्हणे मज येथेच हो ठेवी ! सदा वास देई चरणांजवळी !*
जे वारकरी संप्रदायात असल्याचा आव आणतात त्यांना वारकरी संप्रदायाचे विचार तरी मान्य आहेत का ? बर ते जाऊद्या ह्यांना केवळ नामदेव तुकोबा हे केवळ जाॅकीट घालून समाजाचं पाकीट मारण्यासाठी वापरतात. पण ही पिलावळ ज्या हिंदुत्वादाचे देव्हारे आपल्या मस्तकी घेऊन ह्या गावातून त्या गावात जाॅकेट घालून हुंदडत असतात त्यांना सावरकर तरी मान्य आहेत का ? कारण सुषमा अंधारे यांनी जे प्रश्न आपल्या कार्यक्रमातून उपस्थित केले. तसेच प्रश्न हिंदूत्वाचे गोडवे गाणा-या विनायक सावरकरांनी ज्ञानेश्वर यांच्यावर प्रश्न उपस्थित करत शंका घेतली आहे. ते म्हणतात की, *"ज्ञानेश्वरांच्यापुढे ॠद्धिसिद्धी हात जोडून उभ्या असता ते रेड्याच्या मुखे वेद बोलवू शकले, पण 'रामदेवराजा, अल्लाउद्दीन तुझ्यावर चालून येतो आहे बघ' म्हणून टपालवाल्यालाही जी सूचना देता आली असती ती मात्र ज्ञानेश्वरांना रेड्याच्या तोंडून वा स्वत:च्या तोंडून रामदेवरावास देता आली नाही. ज्ञानदेव निर्जिव भिंत चालवू शकले, पण सजीव माणसे आपल्या मंत्रबळे चालवून विध्यांद्रीच्या खिंडीत अल्लाउद्दीनाचा मार्ग रोखण्यासाठी उभी करू शकले नाहीत."* (सावरकर साहित्य भाग पहीला) मग प्रश्न पडतो की, तथाकथित शेटे झाट्ये, आंधळे पांगळे, लुळे खुळे कधी सावरकरांची प्रेतयात्रा काढणार आहेत ? म्हणून तर शेवटी थेट वीर उत्तमराव मोहीते यांच्याच शब्दांत सांगावं वाटतं की, *"बाळ टिळक कोण होता ? अरे, कोठे तो पोत्याचा टिळक बाळ ! अन् कोठे तो विनू भावे, तो तर रात्रीचे चोरून लाडू खातो ! आणि ज्ञानोबाची ज्ञानेश्वरी ? त्या संन्याशाच्या मेंदूला तर परमा रोग झाला होता !"*
*सदरील लेख बामसेफचे मुखपृष्ठ दैनिक मुलनिवासी नायक मध्ये प्रकाशित झालेला आहे*
नवनाथ दत्तात्रय रेपे लिखित
*१. संविधानाच्या पडद्याआड संघोट्यांचा लिंबू*
*२. भट बोकड मोठा*
*३. डोळ्यात माणसांच्या फेकून धूळ गेला!*
ही पुस्तके घरपोच मिळतील
संपर्क - रुक्माई प्रकाशन, अंजनडोह (बीड)
मो. 9764408794 , 9762636662
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...
वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...
वणी:- परभणी येथे १० डिसेंबर रोजी एका समाजकंटकाने भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली. या देशद्रोही कृत्याचा...
बीड :दि 19/09/2024 रोजी बीड येथे महाराष्ट्रातील धनगर जमातीसाठी असलेल्या अनुसूचित जमातीच्या( ST) आरक्षणाची अंमलबजावणी शिंदे...
निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला. भारतीय वार्ताजिल्हा...
*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* शहरात विजांचा कडकडाटाचा ✍️उत्तम माने लातूर लातूर:- शहरासह ग्रामीण...