मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
Reg No. MH-36-0010493
'भारतीय वार्ता
स्प्राऊट्स Exclusive
नवी मुंबई: महाराष्ट्रातील नवी मुंबईत 'डी. वाय. पाटील' या विद्यापीठाचे 'स्कूल ऑफ आयुर्वेद' नावाचे महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाच्या 'डीन' या प्रमुखपदावर महेशकुमार हरित हा भामटा अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. विशेष म्हणजे या भामट्याची 'डॉक्टर'ची पदवी बोगस आहे. अशी खळबळजनक माहिती स्प्राऊटसच्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमच्या (एसआयटी) हाती आलेली आहे.
महेशकुमार हरित Mahesh Kumar Harit हा तोतया डॉक्टर आहे. या तोतयाची इयत्ता १० वी पासूनची सर्वच कागदपत्रे बनावट व नकली आहेत, याचा भांडाफोड करणाऱ्या बातम्या 'स्प्राऊट्स'ने याआधीही सर्वप्रथम दिल्या होत्या.
'स्प्राऊट्स'च्या या बातम्यांची युनिव्हर्सिटी ग्रॅन्ड कमिशनने तातडीने (UGC ) दखलही घेतली व विद्यापीठ प्रशासनाला कारवाई करण्याचे आदेश दिले. मात्र विद्यापीठाने 'यूजीसी'च्या या आदेशाला चक्क केराची टोपली दाखवलेली आहे.
सब गोलमाल है!
महेशकुमार या तोतयाने १० वी व १२वीची प्रमाणपत्रे हातानेच लिहिलेली आहेत. त्यावर वडिलांचे नाव सीताराम वैद्य असे लिहिले आहे. तसेच दोन्ही मार्कशीट्स डुप्लिकेट स्वरूपात मिळवलेल्या आहेत. इतकेच नव्हे तर याने १० वी १९८५ मध्ये व पुढच्याच वर्षी म्हणजेच १९८६ मध्ये १२ वी ची परीक्षा उत्तीर्ण केल्याची कागदपत्रे जोडलेली आहेत.
केवळ १० वी व १२ वी च नव्हे तर 'बीएएमएस' व त्यानंतर लागणारे अनुभव प्रमाणपत्रे, जॉइनिंग लेटर्स ही सर्वच कागदपत्रे बनावट आहेत, ही सर्व कागदपत्रे 'स्प्राऊट्स'ला माहिती अधिकारातून प्राप्त झालेली आहेत.
विशेष म्हणजे या तोतया डॉक्टरची सर्व कागदपत्रे बनावट आहेत, तरीही Maharashtra Council of Indian Medicine (एमसीआयएम) या संघटनेचे महाभ्रष्ट रजिस्टर डॉ. दिलीप वांगे यांनी या तोतया डॉक्टरच्या पदवीचे रजिस्ट्रेशन केले व वारंवार नूतनीकरण केले असल्याचे आढळून येते. याबाबत असंख्य तक्रारी होवूनही वांगे यांनी या तक्रारींची कोणतीही दखल घेतलेली नाही.
डॉ. दिलीप वांगे हे 'एमसीआयएम' मध्ये मागील १५ वर्षांपासून एकाच पदावर कार्यरत आहेत. त्यांनी या संस्थेत असंख्य महाघोटाळे केलेले आहेत व त्यातून कोट्यवधी रुपयांची काळी माया गोळा केलेली आहे.
जगदीश का. काशिकर
कायदा (लॉ) / सुरक्षा / सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
सहकार्य:*उन्मेष गुजराथी*
*स्प्राऊट्स ब्रँड स्टोरी*
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...
*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी...
*मणिपूर महिला अत्याचार प्रकरणातील दोषींवर कडक कायदेशीर कारवाई बाबत फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनॅलिस्ट असोसिएशनचे (फिरा)...
*बिटको महाविद्यालयातील प्रा डॉ सुदेश घोडेराव यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अभ्यासमंडळाच्या...
*खून झालेल्या महिलेची बुवाबाजी तसेच जादूटोणाविरोधी कायदा संदर्भाने अधिक चौकशी करून कारवाई करणे बाबत महाराष्ट्र...