*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
Reg No. MH-36-0010493
=====================
(आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन विशेष ०९ डिसेंबर २०२२)
देशात असा एकही दिवस जात नाही, जेव्हा भ्रष्टाचाराच्या गंभीर घटना पाहायला, वाचायला किंवा ऐकायला मिळत नाहीत. प्रत्येक क्षेत्रात आणि प्रत्येक विभागात काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना देखील माहित असते की अन्यायकारक लाचलुचपत प्रथा कुठे फोफावतात. भ्रष्टाचाराबाबत सर्व काही माहीत असूनही बहुतांश जनता देखील मूक दर्शकाची भूमिका बजावते. अनेक विभागांमध्ये भ्रष्ट अधिकाऱ्यांकडून प्रत्येक कामाचे ठरलेले दर सांगून सर्रास उघडपणे नियमांचे उल्लंघन केली जातात. आपल्याकडे प्रत्येक समस्येचे पर्याय शोधले जातात, तसेच लाचखोरीसाठी नवनवीन पद्धतीही आजमावल्या जातात. देशात भ्रष्टाचार इतका पसरला आहे की येणाऱ्या अनेक पिढ्यांना त्याची कठोर शिक्षा भोगावी लागणार आहे. एखाद्या सार्वजनिक संवेदनशील फाईलवर भ्रष्ट अधिकाऱ्याची अयोग्य परवानगी अनेक निष्पापांच्या जीवावर बेतू शकते आणि अनेकदा भ्रष्टाचाराला बळी पडणारे अनेक भयानक दुःखद अपघात घडतांना दिसून येतात. सार्वजनिक क्षेत्रात तसेच खाजगी क्षेत्रात देखील शिफारशी आणि राजकीय दबाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो.
उदाहरणार्थ, समजा महाराष्ट्र राज्यातील सरकारी अनुदानित महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पात्र उच्चशिक्षित प्रामाणिक आणि सक्षम उमेदवाराचे हक्क मारून इतर उमेदवार स्वत:साठी ५० - ५५ लाख रुपये देऊन नोकरी मिळवतो, मग तो भ्रष्ट प्राध्यापक आपल्या पदावर बसून शिक्षकासारख्या पवित्र पेशाला न्याय कसा देणार, समाजात आदर्श कसा प्रस्थापित करणार आणि देशातील सुसंस्कृत, कर्तबगार विद्यार्थी आणि सुजाण नागरिकांची नवी पिढीचा शिल्पकार कसा म्हणून घेणार? आयुष्यभर, असे शिक्षक येणाऱ्या अनेक पिढ्या बरबाद करण्यास जबाबदार असतील. अशा शिक्षकाद्वारे शिकलेली पिढी समाजाच्या विविध क्षेत्रात काम करेल, तेव्हा त्याचे वाईट परिणाम सर्वत्र दिसून येतील. एक पिढी बरबाद झाली की त्याचा फटका संपूर्ण देशाला, समाजाला सहन करावा लागतो. उच्चशिक्षित पात्र प्रामाणिक उमेदवार नोकरीसाठी धडपडत असताना अनेक दशके उलटून जातात, पण त्यांना योग्य काम मिळत नाही आणि त्यांच्या आयुष्यातील मेहनत भ्रष्टाचाराची भेट चढते. ही फक्त एका क्षेत्रातील एका विभागाची बाब आहे, जर देशातील प्रत्येक क्षेत्रात अशाच भ्रष्टाचार होत असेल तर देशाची स्थिती किती वाईट होईल याचा आपण अंदाज सुद्धा लावू शकणार नाही. भ्रष्टाचारामुळे ज्याला फायदा होतो तो आनंदी होतो, त्याचामुळे कितीही लोकांचे नुकसान झाले तरी त्याला फरक पडत नाही. सर्वत्र समस्यांचा ढीग असतो, गुन्हेगारी वाढ, असंस्कृत वागणूक, आर्थिक विषमता, गरिबी, उपासमार, बेरोजगारी हे सर्व भ्रष्ट व्यवस्थेमुळे आहे.
हा भ्रष्टाचार निष्पापांकडून त्यांचा निरागस विश्वास, तरुणांकडून आशा, भविष्यातील स्वप्ने आणि जबाबदार वर्गापासून त्यांचा आधार हिसकावून घेतो. भ्रष्टाचार कोणाची नोकरी हिसकावून घेतो, कोणाचे शिक्षण, कोणाचे उपजीविकेचे साधन, कोणाचे कष्ट, कोणाची संपत्ती, कोणाचा न्याय तर कोणाचा अनमोल जीव सुद्धा हा भ्रष्टाचार हिरावून घेतो. भ्रष्टाचारामुळे समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी जे कर आणि दर निश्चित करण्यात आले आहेत ते देखील वाया जातात. सर्वात कमी दरडोई उत्पन्न असलेल्या देशांमध्ये भ्रष्टाचाराच्या समस्या अधिक आहेत आणि भारत त्यापैकी एक आहे. खासगी क्षेत्रातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी विशिष्ट कायदा नाही. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या करप्शन परसेप्शन इंडेक्स, २०२१ मध्ये भारत १८० देशांपैकी ८५ व्या क्रमांकावर आहे. जागतिक स्तरावर, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने दरवर्षी अंदाजे २.६ ट्रिलियन यू एस डॉलर इतका भ्रष्टाचाराचा अंदाज लावला आहे.
भ्रष्टाचारविरोधी उपक्रमात आपण माहितीच्या अधिकाराचा जाणीवपूर्वक वापर करून त्याचबरोबर लोकसेवा हक्क कायदा, भ्रष्टाचारविरोधी कायदा, भ्रष्टाचारविरोधी कार्यरत पोलीस आणि न्यायालये, भ्रष्टाचारविरोधी संघटना आणि निवडणूक मतदानाच्या माध्यमातून आपण या गंभीर समस्येशी लढू शकतो. सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्ट व्यवहार आणि धोके उघड करून त्यांना प्रामाणिक, पारदर्शक आणि उत्तरदायी बनवावे लागतील. एखादी व्यक्ती जितक्या उच्च पदावर विराजमान असेल तितकाच तो लोकांचा सेवक होऊन त्यांच्यासाठी जबाबदार असतो. सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी सार्वजनिक हितासाठी काम करणे हे सर्वोपरि आहे. आपले आयुष्य लहान आहे, कष्ट करून, परोपकार जोपासून सुख-समाधानाने, सुसंस्कृत जीवन जगणे हे प्रत्येकाचे ध्येय असले पाहिजे. माणुसकी, स्वाभिमान, कर्तव्यपरायणता, सामाजिक बांधिलकी यांसारख्या शब्दांना लोकांमध्ये काही अर्थ उरला नाही, असे दिसते, जेव्हाकी लोकहित हेच परम धर्म, सचोटी, सत्यता, साधेपणा, सकारात्मकता, विश्वासार्ह, निष्पक्ष, सभ्य, न्याय्य, प्रामाणिकपणा असे गुण प्रत्येकामध्ये असले पाहिजेत आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीवर महत्त्वाची जबाबदारी येते तेव्हा आपल्या पदाची प्रतिष्ठा राखून त्या पदाशी एकनिष्ठ राहून योग्य न्याय देणे हे प्रत्येक कर्मचाऱ्याचे ध्येय असले पाहिजे.
एकीकडे देशाचे शूर जवान आपल्या कर्तव्यासाठी, मातीसाठी, देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देत अमर होऊन लोकांच्या हृदयात सदैव जिवंत राहतात आणि दुसरीकडे लाचखोरीच्या चिखलात गुंडाळलेला भ्रष्ट कर्मचारी आपल्या मातीशी गद्दारी करून देशाचा विश्वासघात करत समस्यांना वाढविण्यासाठी काम करतो. आज आपल्या समाजात असे अनेक भ्रष्ट लोक आहेत, ज्यांनी देशाची फसवणूक करून, विकासात अडथळे निर्माण करून, लाचेच्या पैशातून आपल्या भावी सात पिढ्यांसाठी भरपूर संपत्ती जमा केली आहे, पण देशाचा शत्रू हा मानवतेचा, समाजाचा शत्रू आहे, अशा देशद्रोही भ्रष्टाला कधीच माफ करता येणार नाही. भ्रष्टाचाराच्या माध्यमातून जनतेवर अत्याचार करून, शोषितांचे हक्क हिरावून देशद्रोह्याचे आयुष्य जगण्यापेक्षा प्रामाणिकपणे जनतेच्या मनात स्वतःबद्दल आदर निर्माण करून सन्मानाने जगणे चांगले.
भारत सरकारचा केंद्रीय दक्षता आयोग हे सार्वजनिक प्रशासनातील भ्रष्ट आणि अनैतिक प्रथा दूर करण्यासाठी आणि प्रशासनाकडून नागरिकांच्या आकांक्षा नुसार पारदर्शकता, निष्पक्षता, वस्तुनिष्ठता आणि उत्तरदायित्व आणण्यासाठी प्रभावी दृष्टीकोन सुनिश्चित करण्यासाठी कार्य करते. टोल फ्री: १८००११०१८०, १९६४ या क्रमांकावर या विभागाशी संपर्क साधता येईल. यासोबतच राज्य सरकारचा लाचलुचपत प्रतिबंधक विभागही या समस्येशी लढण्यासाठी सदैव तत्पर आहे, महाराष्ट्र राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधण्यासाठी +९१ २२-२४९-२१२१२, टोल फ्री क्रमांक १०६४, व्हाट्सएप क्रमांक ९९३०९९७७००, ईमेल आयडी acbwebmail@mahapolice.gov.in वापरू शकता. भ्रष्टाचार हा पदाचा, समाजाचा, देशाचा सर्वात मोठा विश्वासघात आणि देशद्रोह आहे. सदैव जागरूक आणि जबाबदार राहून देशाच्या विकासात सहकार्य करावे.
डॉ. प्रितम भी. गेडाम
मोबाइल नं. ०८२३७४ १७०४१
prit00786@gmail.
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...
रत्नागिरी:महिलांनी शैक्षणिक क्षेत्रात येऊन आपल्या कुटुंबाची प्रगती करावी असे प्रतिपादन प्रवीण काकडे अध्यक्ष अहिल्यादेवी...
भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरकायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र....
भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरकायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र....