आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
धुळे - ओएलएक्स / क्विकर या प्रसिध्द वेबसाईटवर जुने व नवीन सर्व प्रकारच्या गाडया, ए. सी., फ्रिज, कुलर, स्मार्ट टी.व्ही., महागडे मोबाईल, फर्निचर, भाडे तत्वावरील घर अशा विविध प्रकारच्या वस्तुंची खरेदी विक्रीचे व्यवहार दररोज होत असतात. ओएलएक्स वरुन जुने व नवीन माल स्वस्तात खरेदी - विक्री करण्याचे आमिष दाखवून सायबर हॅकर्स हे नागरीकांची फसवणुक करीत आहे. सुरुवातीस ओएलएक्स वर नविन येणा-या लोकांना सायबर हॅकर्स हे डमी ग्राहक बनून त्यांचा माल ते खरेदी - विक्री करण्यास उत्सुक आहे असे भासवितात. त्यानंतर ते त्यांना पैसे पाठविण्याच्या बहाण्याने क्यू आर कोड स्कॅन करण्यास सांगून त्याव्दारे त्यांची फसवणूक करतात. सायबर सेल कडे अशा प्रकारच्या कित्येक तक्रारी आल्या असून या सायबर हॅकर्सनी देशात कोटयावधी रुपयांची आर्थिक फसवणूक देखील केली आहे. युपीआयडी किंवा बँक खाते तपशील हे कधीही कोणालाही शेअर करु नका, शक्य असल्यास तुम्ही ओएलएक्स किंवा इतर साईटवर काही विकत असाल तर तुम्ही रोखीने व्यवहार करा, तुम्हाला रक्कम मिळत असल्यास कधीही क्युआर कोड स्कॅन करु, पैसे पाठवतांनाचा क्युआर कोड स्कॅनरने दाखविलेले तपशील नेहमी क्रॉस चेक करा, नका, क्युआर कोड जर स्टीकर सारखा दिसत असल्यास स्कॅन करणे टाळा, ओटीपी कधीही कुणाशीही शेअर करु नका, तुम्हीही काहीही खरेदी विक्री करीत असाल तर संबंधित व्यक्तींशी ओळख नेहमी पडताळून पहा, तुमचा मोबाईल नंबर जर गरज नसेल तर शेअर करु नका, तसेच नागरीकांनी कुठलेही ऑनलाईन व्यवहार करतांना जास्तीत जास्त सुरक्षितता बाळगावी, आपले बँक डिटेल्स आवश्यक असेल तरच शेअर करावे तसेच नागरीकांनी ओएलएक्सवरुन व्यवहार करताना काळजी घ्यावी, सायबर गुन्हेगार तुम्हाला भारतीय सैनिक किंवा पोलिस अधिकारी असल्याचे भासवतात म्हणून कुठलाही ऑनलाईन व्यवहार करतांना पक्की खात्री केल्याशिवाय व्यवहार करु नका. आपली फसवणूक होत असल्याचे वाटताच तात्काळ सायबर पोलिसांच्या १९३० या हेल्पलाईनवर संपर्क साधावा किंवा सायबर तज्ञांचा सल्ला घ्यावा असे आवाहन सायबर तज्ञ अॅड. चैतन्य भंडारी यांनी केले आहे.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र* मुंबई, दिनांक १३: छत्रपती...
भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरमुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व...
भारतीय वार्ता : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राजघराण्यातील वर्तमानातील युवराज्ञी संयोगिता राजे संभाजी...