Home / महाराष्ट्र / खानदेश / मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

महाराष्ट्र    |    खानदेश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त उपस्थित राहून त्यांच्या स्मारकाला विनम्रपणे अभिवादन केले !!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त उपस्थित राहून त्यांच्या स्मारकाला विनम्रपणे अभिवादन केले !!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त उपस्थित राहून त्यांच्या स्मारकाला विनम्रपणे अभिवादन केले !!

 

✍️जगदीश का. काशिकर

९७६८४२५७५७

 

सातारा: सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिति व त्यांच्या स्मारकाला विनम्रपणे अभिवादन केले.

महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी समाजातील शोषित, वंचित घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी आपले आयुष्य वेचले. स्त्रियांना परंपरांच्या जोखडातून बाहेर काढत त्यांना शिक्षणाची कवाडे खुली करून दिली. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांचे उपकार मानावे तेवढे कमीच असल्याची भावना याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना व्यक्त केली.

राज्यात २८०० नवीन बचत गट तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी शासन लागेल ते सर्व सहकार्य करेल असे स्पष्ट केले. राज्यातील ४ कोटी माता-भगिनींची आरोग्य तपासणी करण्यात आली. प्रत्येक जिल्ह्याला विकासकामांसाठी २ कोटींचा निधी देण्यात आला. अनाथ बालकांसाठी, मिशन वात्सल्य योजना सुरू करण्यात येत आहे. यामागे प्रेरणा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासमयी बोलताना सांगितले.

नायगाव ते मांढरादेवी रस्त्याचे काम लवकरच हाती घेण्यात येईल. हा रस्ता लाखो भक्तांसाठी महत्वाचा असल्याने तो नक्की सोडवू, तसेच चौदा गावांचा  पाणी प्रश्न सोडविण्यासाठी कॅनलचा प्रश्नही मार्गी लावण्यात येईल असेही याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

यासमयी राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सहकार मंत्री अतुल सावे, आमदार छगन भुजबळ, मकरंद पाटील, कोल्हापूर परिक्षेत्राचे आय.जी. सुनील फुलारी, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख आणि सरपंच साधना नेवसे हेदेखील उपस्थित होते.

ताज्या बातम्या

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* 26 December, 2024

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी. 26 December, 2024

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी.

वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा*    *पीडित कुटुंबीयांनी केली मागणी* 26 December, 2024

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी केली मागणी*

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* 26 December, 2024

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

खानदेशतील बातम्या

*मणिपूर महिला अत्याचार प्रकरणातील दोषींवर कडक कायदेशीर कारवाई बाबत फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनॅलिस्ट असोसिएशनचे (फिरा) राष्ट्रपतींना निवेदन...*

*मणिपूर महिला अत्याचार प्रकरणातील दोषींवर कडक कायदेशीर कारवाई बाबत फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनॅलिस्ट असोसिएशनचे (फिरा)...

*बिटको महाविद्यालयातील प्रा डॉ सुदेश घोडेराव यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अभ्यासमंडळाच्या सदस्यपदी निवड*

*बिटको महाविद्यालयातील प्रा डॉ सुदेश घोडेराव यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अभ्यासमंडळाच्या...