Home / महाराष्ट्र / पश्चिम-महाराष्ट्र / बोगस विद्यापीठवाल्याने...

महाराष्ट्र    |    पश्चिम-महाराष्ट्र

बोगस विद्यापीठवाल्याने राज्यपालांना दिले बोगस पीएचडी वाटप कार्यक्रमाचे आमंत्रण

बोगस विद्यापीठवाल्याने राज्यपालांना दिले बोगस पीएचडी वाटप कार्यक्रमाचे आमंत्रण

भारतीय वार्ता :

 

स्प्राऊट्स Exclusive

 

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राजभवनात चक्क बोगस विद्यापीठाच्या संस्थापकाचा सत्कार केला. त्याच्याशी निवांत चर्चा केली, इतकेच नव्हे त्याच्याकडून या विद्यापीठाच्यावतीने दिल्ली येथील होणाऱ्या बोगस पीएचडी पदव्या वाटपाच्या कार्यक्रमाचे निमंत्रणही स्वीकारले, अशी धक्कादायक माहिती 'स्प्राऊट्स'च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमच्या हाती आलेली आहे.

 

इंटरनॅशनल इंटर्नशिप युनिव्हर्सिटी - International Internship University (IIU) हे संपूर्णतः बोगस विद्यापीठ आहे. या विद्यापीठाची जगातील कोणत्याही देशात नोंदणी नाही. पियुष पंडित (Peeyush Pandit ) हा भामटा या बोगस विद्यापीठाचा संस्थापक आहे. या भामट्याने आतापर्यंत शेकडो जणांना बोगस पीएचडी विकल्या आहेत. यातून त्याने कोट्यवधी रुपयांची काळी माया गोळा केली आहे. या भामट्याला महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचा तोतया सचिव उल्हास मुणगेकर याची साथ आहे, अशी  खळबळजनक माहिती 'स्प्राऊट्स'च्या 'एसआयटी'च्या हाती आलेली आहे.

 

पीयूष पंडित हा देशविदेशातील भारतीय लोकांना आपल्या जाळ्यात ओढतो. त्यांना दिल्ली येथे बोलावून मोठ्या हॉटेलमधील कार्यक्रमात बोगस पीएचडी पदव्या विकतो. ही बोगस पीएचडी अधिकृत वाटावी, यासाठी हा भामटा कार्यक्रमाला पोलीस, वकील आणि सरकारी कार्यालयातील काही प्रतिष्ठित व्यक्तींना बोलावतो व त्यांच्या हस्ते बोगस पीएचडी देतो, असे आढळून आलेले आहे.

 

दिल्ली येथील पोलीस ऑफिसर किरण सेठी यांना या भामट्याने एका कार्यक्रमात आमंत्रित केले होते. त्यांच्या हस्ते काही जणांना बोगस पीएचडी वाटण्यात आल्या.

 

पंडित नावाच्या भामट्याने राज्यपाल कोश्यारी यांना चक्क त्याच्या फेक विद्यापीठाचे ब्रोशर व इतर भेटवस्तूही दिलेल्या आहेत, सोबत त्याने आमंत्रण पत्रिकाही दिली. 'स्प्राऊट्स'च्या वाचकांसाठी हा exclusive फोटो आम्ही प्रकाशित करीत आहोत.  

 

या बोगस आभासी विद्यापीठाच्या बोर्डावर मुंबईतील Panbai International School च्या मुख्याध्यापिका प्रतिभा मिश्रा, भानू प्रताप सिंह, के. एल. गांजू, टी. एन. शिरीष कुमार, संदीप मारवाह, प्रकाश जोशी, संजीव सेहगल, एन. डी. माथूर, श्याम सुंदर पाठक  यांचा समावेश आहे.

 

भगत सिंह कोश्यारी हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. याशिवाय ते महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांचे कुलपती आहेत. मात्र त्यांच्या कारकिर्दीत शिक्षणाचा दर्जा मोठ्या प्रमाणात खालावला आहे. याशिवाय भ्रष्टाचारही प्रचंड बोकाळलेला आहे. 'स्प्राऊट्स'ने या भ्रष्टाचाराविरोधात रान उठवले. राज्यपालांशी लेखी पत्रव्यवहार केला, प्रसंगी त्यांना प्रत्यक्ष भेटून त्यासंबंधीत कागदपत्रांच्या फाईल्सही दिल्या. मात्र राज्यपालांना केवळ सत्कार समारंभाचे कार्यक्रम करण्यातच रस आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे, तरीही राज्यपाल बेफिकीर आहेत.  

 

राज्यपालांचे सचिव उल्हास मुणगेकर हे नियमबाह्य पद्धतीने बसलेले आहेत. राजभवनात बोगस पीएचडी पदव्या  वाटण्याचा कार्यक्रम करण्यात आला. बोगस पीएचडी देणाऱ्या संस्थेनेही राज्यपाल कोश्यारी यांचे हस्ते या सर्वांचा सत्कार केला. इतकेच नव्हे तर आतापर्यंत असंख्य बोगस विद्यापीठांना जन्म देणारा मधू क्रिशन याचाही राज्यपालांनी सत्कार केला, त्याच्याबरोबर ब्रेकफास्ट केला.

 

यातून ही बोगस विद्यापीठे अधिकृत असल्याचा संदेश जाईल याची व्यवस्था केली. या सर्व गैरकृत्यांचा मास्टरमाइंड हा मुणगेकर आहे.

 

मुणगेकर या भामट्याची कारकीर्द अत्यंत भ्रष्ट आहे. राजभवनातून हा भामटा बोगस पीएचडीचे रॅकेट चालवत आहे. याबाबत 'स्प्राऊट्स'ने वारंवार तक्रारी करूनही राज्यपाल कोश्यारी व राजभवन प्रशासन त्याला पाठीशी घालत आहे, मात्र यामुळे राज्यातील शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार अधिकाधिक बोकाळत चाललेला आहे व विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे.

 

जगदीश का. काशिकर,

कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

 

सहकार्य:*उन्मेष गुजराथी*

*स्प्राऊट्स ब्रँड स्टोरी*

ताज्या बातम्या

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

पश्चिम-महाराष्ट्रतील बातम्या

*राज्यात १९ फेब्रुवारीला शिवजयंती उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात साजरी होणार*

*सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र* मुंबई, दिनांक १३: छत्रपती...

*सुप्रसिद्ध मेडीसन पीआर मिडीया एजन्सी बाबत जगदिश काशिकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतरांना नोकरी वाचविण्याबाबत निवेदन व स्मरणपत्र* *कामगार आयुकत यांच्या पर्यत आपली समस्या पोहचवण्यासाठी व न्यायासाठी सुप्रसिद्ध समाजसेवक, वकील व वोचडोग फाऊंडेशन चे ट्रस्टी श्री गोडफ्रे पिमेंटा यांची घेतली कायदेशिर मदत* *दिल्ली कामगार मंत्री कार्यालयातुन या प्रकरणाबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आदेश महाराष्ट्र कामगार आयुकत यांना देण्यात आले आहेत*

भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरमुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व...

ब्राह्मण पुरोहिताची जागा बहुजन पुरोहितांना द्या! मराठा सेवा संघ संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर

भारतीय वार्ता : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राजघराण्यातील वर्तमानातील युवराज्ञी संयोगिता राजे संभाजी...