Home / महाराष्ट्र / मराठवाडा / कोरोना षंढयत्र आणि...

महाराष्ट्र    |    मराठवाडा

कोरोना षंढयत्र आणि भारतीय मिडीयाच्या भूमिकेवर लिहिलेला लेख *"छम्मक छल्लो मिडीया"*

कोरोना षंढयत्र आणि भारतीय मिडीयाच्या भूमिकेवर लिहिलेला लेख      *

 

 

 

✍???? नवनाथ दत्तात्रय रेपे

*'डोळ्यात माणसांच्या फेकून धूळ गेला !'*

या पुस्तकाचे लेखक

मो. ९७६२६३६६६२

 

 

कोरोना एक आंतरराष्ट्रीय षंढयत्र आहे हे त्यांनाच समजत ज्यांना थोडीशी बुद्धी आहे. ज्यांना बुद्धीच नाही त्या येड्यांनी तर लाईनमध्ये गर्दी करत नाकात नळकांड आणि दंडात लस घेऊन सर्व विश्व जिंकल्याच सुख अनुभवल पण त्यांनी तो मिळवलेला क्षणभंगुर आनंद म्हणजे पाण्यात सोडलेला पाद अन् त्यातून निघालेल्या बुडबुडीसारख अल्प आहे, हे त्यांना आता आता समजलं. कारण जेव्हा केंद्र सरकारने सुप्रिम कोर्टात प्रतिज्ञापत्र देऊन म्हटले की, "लस घेऊन मृत्यू झाल्यास त्याला सरकारला जिम्मेदार धरता येणार नाही." (लोकमत ३० नोव्हें. २०२२) मग प्रश्न पडतो की, जे दलाल घरोघरी जाऊन कोरोनाचे धोके आणि लसीचे फायदे सांगत होते, त्या हेमल्यांना धरून जर आता लोकांनी पायतानाचे फटके द्यायला सुरुवात केली तर त्यात त्या लोकांचा दोष तो काय ? कारण हीच पिलावळ घरोघरी जाऊन लोकांना लस घ्या, लस घ्या म्हणत बळजबरीने टेस्टींग करत होती ही मानवताद्रोही पिलावळ सुप्रिम कोर्टात सरकारने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावर मुक का गिळून आहे ? पण जेव्हा रंगा बिल्ला हे यहूद्यांच्या मस्तकातून निघालेल हे कोरोनाचे षंढयत्र राबवून लोकांना टाळ्या थाळ्या बडवून घंटानाद करायला सांगत होते, तेव्हा दुसरीकडे डाॅ. विश्वरुप राय चौधरी, डाॅ. तरुण कोठारी, डाॅ. कपील बजाज, औरंगाबादचे डॉ. जगदाळे व सोशल हेल्थ मुव्हमेंटच्या माध्यमातून पत्रकार हर्षद रुपवते, निसर्गोपचार तज्ज्ञ विजय सोनवणे व त्यांची टिम लोकांना कोरोना हा रोगच नसल्याचे असंख्य पुरावे देऊन यहुद्यांच्या ह्या बनावट कोरोनापासून लोकांना भयमुक्त करत होते. त्यामुळेच तर मी माझे सारखे असंख्य लोक आजही विना वॅक्सीनचे ठणठणीत आहोत. आजपर्यंत ना कोरोना आम्हा लोकांना काही करू शकला, ना कोणता लम्पी, झंपी, ओमीक्राॅन. तसेच सत्तेतील असलेल्या माकडांनी आणलेला माकडताप आमचं काही वाकडं करू शकला ?. पण स्वतःला उच्च शिक्षित समजणारे काही भित्र्या प्रवृर्तीचे आपल्या कुटुंबियांना भिती घालून  आणल्या सुखी संसाराची होळी करण्यासाठी आनंदी आनंद साजरा करत त्या टेस्टींग वॅक्सिनच्या मायाजालात फसत होते ही खुप मोठी शोकांतिका आहे. लस घेतल्याचे दुष्परिणाम निदर्शनास येत होते, कारण की, 'मुलींच्या अकाली पौंगडावस्थेमुळे पालक चिंतेत' आहेत अशी बातमी आली होती. त्यात म्हटले की, अलीकडे अगदी सहा ते नऊ या वयामध्ये मुलींना मासिक पाळी येत आहे.' (लोकसत्ता २२ जूलै २०२२) तर 'सायन्स अॅडव्हान्सेस जर्नल' या नियतकालिकात म्हटले आहे की, '४२ टक्के महीलांना लसीचे दोन डोस घेतल्यानंतर मासिक पाळीत अधिक रक्तस्त्राव होत आहे तर ४४ टक्के महीलांना पाळी अनियमित येत आहे. व ज्यांची मासिक पाळी बंद झाली होती त्यांना पाळी येत आहे.' (पुण्यनगरी २२ जूलै २०२२)

 

काल परवा चीन मध्ये कोरोनाचा पुन्हा एकदा हाहाकार म्हणत इथली रखेल व रंगेल मिडीया भांडवलदारांच्या बेडरूममध्ये पालथे पडून भारतीय जनतेला भयभीत करताना दिसत होती. पण भांडवलदारांच्या अंथरूणात स्वतः ओलेचिंब करून घेणारे पत्रकारही 'आला रे आला कोरोना आला' म्हणत लोकांना भिती घालत होते.  पण भारतात जी चीनची परिस्थिती दाखवली जातेय ती साफ साफ खोटी आहे. हे जेव्हा चीनमध्ये राहणा-या एका भारतीय नागरिकाने सांगितले. तेव्हा ह्या रंगेल आणि रखेल पत्रकारांना चीनमधील त्या भारतीय नागरीकांचे मत सांगून भेदरलेल्या भारतीयांना भयमुक्त करायला काय भांडवलदारांचा तोंडात घेतलेल्या लाॅलीपाॅप मुळे जमले नसेल का ? कारण प्रसारमाध्यमांनी हे तिस-या डोळ्यांचे काम करायचे असते मात्र हे लोकांच्या बेडरूम मधून पत्रकारिता करणारे तथाकथित बाजारू पत्रकार भांडवलदारांच्या इशा-यावर 'छम्मक छल्लो' करून आपल्या पोटा पाण्याचा प्रश्न मार्गी लावत आहेत पण इतरांच्या पोटावर या नालायक पत्रकारांमुळे बिबवा पडतोय त्याचे काय ? ही रंगेल मिडीया कशी आहे याच वास्तव दै. लोकाशा मध्ये आलेली क्राॅसलाईन "मिडीयाने माणसे मारली" अशी होती त्यात म्हटले की, "मिडीया स्वतःच शास्त्रज्ञ असल्यासारखे कोरोनाचे आकार उकार परिणाम सांगून मोकळे होतात, एका शहाण्या पत्रकाराने तर जिवंत कोरोना म्हणून त्याचा फोटोच दाखवला, 'आजही कोरोना कीस पेड का नाम आहे माहीत नाही.'  मात्र बातमी सांगताना अशा विश्वासाने सांगतात की दर्शकाला फिलिंग स्मशान आली पाहीजे. मिडीयाने नेमके असे का केले, केवळ भिती दाखवून कोरोनाशी लढण्याची पद्धत मिडीयाने कुणाच्या इशा-यावर केली. मास्क आणि कोरोणाचा संदर्भ आणि संबंध अद्याप स्पष्ट नाही, तेव्हा अवघे सरकार कोरोनाची लढाई मास्कची ढाल करून लढत होते." (दै. लोकाशा क्राॅसलाईन)

 

भांडवलदारांच्या इशा-यावर छम्मक छल्लो करत बालगंधर्वांची भुमिका बजावणारी आजची बहुतांशी प्रसारमाध्यमे आहेत. कारण जी वर्तमानपत्रे आपण आपली म्हणतो ती पण विरोधकांची कामे जोमात करून या बहुजन समाजाला कोमात घालण्याच काम करत आहेत. त्यामुळे आज घडीला परक आणि आपलं कोण हे ओळखण फार कठीण आहे, त्यामुळे आपली सद्सदविवेक जागृत ठेवा. एकदा का तुमच्या मन आणि मेंदूवर ब्राम्हणी विचारांच्या ढेकणाने दंश केला की तुमच्या सद्सदविवेक बुद्धीला लकवा बसलाच म्हणून समजा. मग बुद्धीनेच लकवा मारला तर आयुष्याचा चकवा बसण्यास वेळ लागणारच नाही. मागील वर्षी राज्यात कोरोना षंढयत्र राबवून लोकांना टेस्टींग व वॅक्शीनच्या टोप्या घालणारे आरोग्यमंत्री लोकांनी पार डोक्यावर घेतले होते. मग एकदा का डोक्यावर घेतलं की त्याने सोडलेल्या पाटाचे पाणी झुळझूळ ओठांपर्यंत येत, पण हे पाणी उपयोगाचं नाही हे त्यानांच समजत ज्यांना थोडीशी बुद्धी आहे. मागचे आरोग्यमंत्री भलेही गुवाहाटी गोवा फिरले नसतील मात्र त्यांनी जो बहुजन समाजाला गुवाहाटी रुपी वॅक्शीनचा माल ठासला तो हानिकारकच आहे. म्हणून तर आपण ज्याला आपले म्हणतो तो खरच आपला आहे का याचाही विचार करा. कोरोना येत आहे असं सांगून लोकांना भयभित करणा-या व करंगळीने धरणे भरणा-या नेत्यांना सांगावं वाटतं, आरोग्यमंत्री सावंत ते बघा कारण ते म्हणतात की, राज्यातील नागरिकांची रोग प्रतिकारक क्षमता चांगली आहे. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. कोरोनाचा सामना करण्यासाठी आपली आरोग्य यंत्रणा सक्षम आहे. त्यामुळे नागरिकांनी येणाऱ्या नव वर्षांचा आनंद घ्यावा. प्रत्येक सण आणि सुट्यां जल्लोषात साजरे करा. (हिंदस्थान टाईम्स २५ डिसें. २०२२)

 

चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक म्हणून जे चित्र इथली भारतीय मिडीया दाखवत आहे त्यात कोणतीही वास्तविकता नसून ते बनावट आहे. कारण चीनमध्ये असलेले भारतीय रहिवासी डॉ. अचल श्रीखंडे यांनी एबीपी माझा या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना म्हटले की, जगभरात दाखवलं जातंय तशी परिस्थिती चीनमध्ये अजिबात नाही, चीनमधील क्वारंटाईन सेंटर्स बंद करण्यात आली आहेत. येथिल लोक रस्त्यावर मोकळे फिरत असून ते माॅलमध्येही जात आहेत. इथे कुठेही काहीही बंद करण्यात आलेल नाही. ना शाळा बंद आहेत, ना सरकारी कार्यालये बंद आहेत, ना बाजार बंद आहे. चीनमध्ये मृत्यूचे थैमान सुरू आहे अशा आशयाच्या बातम्या चुकीच्या आहेत. भारतीयांनी त्याची काळजी करण्याची गरज नाही.(दै. देशोन्नती २५ डिसें. २०२२) त्यामुळे आमच्या लोकांनी जी प्रसारमाध्यमे आऊ चा बाऊ करून सांगतात त्यांना पाहणं आधी बंद केलं पाहीजे. कारण चीनमध्ये सर्व सुरूळीत असताना चुकीचे चित्र दाखवून भारतीय जनतेला भिती दाखवून ही दलाल मिडिया व त्यांचे भडवे पत्रकार भांडवलदारांचे पाय चाटण्यातच धन्यता मानत आहेत. त्यामुळे नागरिकांनी न भिता न टेस्टींग करता एकदम बिनधास्त राहुन कोरोना षंढयत्र समजून घेतलं पाहीजे. तेव्हाच या चाटुकारांना प्रतिप्रश्न करून यांना व त्यांच्या कोरोनाला पायदळी तुडवता येईल अन्यथा भित्रा क्या न करता अस होईल.

 

देश विदेशात लसीकरणाला विरोध होत होता हे तिथली प्रसारमाध्यमे दाखवत होती, मात्र भारतीय मिडीया तेव्हा भांडवलदारांच्या कुशीत उब घेत असल्यामुळे तीला ते दाखवायला वेळ होता तरी कुठे ? आमच्याकडे लसीकरण म्हटलं की लोक दंडच काय टिर्रीईई उघड्या करून लस घेतील त्यात ते नवल काय ? विदेशात लसीकरणाला विरोध होतो म्हणण्यापेक्षा आपले शत्रूराष्ट्र व मोदींना बिर्याणी ? खाऊ घालणारे त्यांचे मित्रराष्ट्र 'पाकीस्तान उत्तर पश्चिम मध्ये ६५ लाख मुलांना पोलिओची लस  देण्यासाठी पाच दिवसांचा लसीकरण कार्यक्रम सुरू होता. मात्र या लसीकरणाला इस्लामिक लोकांचा विरोध होता त्यामुळे त्या पथकावर एका व्यक्तीने गोळीबार केला होता.' (दै. देशोन्नती १३ डिसेंबर २०२१) मग प्रश्न पडतो की, पाकीस्तानी जर येवढे जागरूक असतील तर आपण भारतीय येवढे निद्रीस्त अवस्थेत का आहोत ? उद्या यदा कदाचीत कोरोनाची लस देण्यासाठी गावोगाव फिरणा-या पथकावर जर भारतीय नागरीकांनी असाच प्रकारचा हल्ला करून लसीकरण उधळून लावले तर त्यांचा तो दोष  काय ? कारण लस म्हणजेच विष आहे. त्यामुळे तर ब्राझील मध्ये दोन नवजात बालकांना कोरोनाची लस देताच त्याची तब्येत बिघडली होती. (दै. देशोन्नती ८ डिसें. २०२२)

 

चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा एकदा हाहाकार अशा बातम्या भारतीय मिडीयाने देऊन पत्रकारीता नव्हे तर चाटूकारीता केली आहे. या चाटूकारांनी केलेल्या चाटुकारीतेमुळेच तर सारा समाजाचा आणि या व्यवस्थेचा बट्ट्याबोळ झाला आहे. ह्या चाट्यांनी आता कितीही कोरोनाचा पाढा वाचला तरी लोक त्याला भिक घालणारच नाहीत. कारण आता सोशल हेल्थ मुव्हमेंट व अव्हेकन इंडिया या संघटनांनी केलेल्या कार्यामुळे लोकांमध्ये जागृती झाली आहे. लोकांना कोरोना फोरोनाची मुळीच भिती नाही, यांना भिती वाटते ती फक्त उद्योगधंदे ठप्प होण्याची कारण या उद्योगावर अनेकांच्या संसाराचा गाडा चालत असतो. त्या सर्वांना सांगावं वाटतं की, कोरोना हे एक खुप मोठ ठरलेलं षंढयत्र आहे, त्याला तुम्ही लवकरात लवकर समजून घेऊन त्याला विरोध करा अन्यथा हे विकृत बुद्धीचे लोक पुन्हा एकदा टेस्टींग, वॅक्शीन व लाॅकडाऊन लावून तुम्हा आम्हाला भिकारी बनवण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे आता तरी ह्या चाट्यांची खेळी समजून घ्या अन्यथा या भांडवलदारांचे पाये चाटण्याची वेळ तुम्हावर आल्याशिवाय राहणार नाही.

 

प्रकाशित -

https://sangharshnayak.com/?p=26691

 

नवनाथ दत्तात्रय रेपे लिखित *"डोळ्यात माणसांच्या फेकून धूळ गेला!"* हे पुस्तक घरपोहोच मिळेल.

संपर्क - रुक्माई प्रकाशन बीड

मो. 9762636662

ताज्या बातम्या

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक. 19 December, 2024

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक.

वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना  न्याय. 18 December, 2024

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना न्याय.

वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* 16 December, 2024

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...

परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची  विटंबना करणाऱ्यां समाज कंठकावर कारवाई करा, भारतीय बौध्द महासभा,समता सैनिक दल व वंचित बहुजन आघाडी यांची मागणी. 16 December, 2024

परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यां समाज कंठकावर कारवाई करा, भारतीय बौध्द महासभा,समता सैनिक दल व वंचित बहुजन आघाडी यांची मागणी.

वणी:- परभणी येथे १० डिसेंबर रोजी एका समाजकंटकाने भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली. या देशद्रोही कृत्याचा...

मराठवाडातील बातम्या

धनगर समाजाच्या मुलांच्या हातामध्ये एसटीचे प्रमाणपत्र द्या ,अन्यथा धनगर समाज हा राज्य सरकारच्या विरोधात विधानसभा निवडणुकीला गेल्याशिवाय राहणार नाय

बीड :दि 19/09/2024 रोजी बीड येथे महाराष्ट्रातील धनगर जमातीसाठी असलेल्या अनुसूचित जमातीच्या( ST) आरक्षणाची अंमलबजावणी शिंदे...

निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला.

निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला. भारतीय वार्ताजिल्हा...

*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* *शहरात विजांचा कडकडाटाचा*

*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* शहरात विजांचा कडकडाटाचा ✍️उत्तम माने लातूर लातूर:- शहरासह ग्रामीण...