वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
Reg No. MH-36-0010493
अधिष्ठाता डॉ मीनाक्षी गजभिये यांची हकालपट्टी करा - - उमेश इंगळे
अकोला ;- शासकीय सर्वोपचार रुग्णालयातील अधिष्ठाता डॉ मिनाक्षी गजभिये यांची हकालपट्टी करा अशी मागणी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य महासचिव उमेश सुरेशराव इंगळे यांनी मा. संचालक वैद्यकिय शिक्षण व संशोधन संचालनालय, मुंबई यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे
शासकिय वैद्यकिय महाविद्यालय चे अधिष्ठाता डॉ मीनाक्षी गजभिये मॅडम यांचा भोंगळ कारभार दिवसां न दिवस वाढत असून रुग्णांचे व इंनटर्न डॉक्टर चे हाल सुरू आहेत. आज १० दिवस झाले वार्डामध्ये डॉक्टरच्या हॉस्टेल मध्ये पाणी नाही, सर्वोउपचार रुग्णालयात पाहीजे तसा औषधी चा साठा उपलब्ध नाही रुग्णांना बाहेरून औषधी आणावी लागते, रुग्णांच्या रक्ततपासणी करिता खासगी लॅब वाले बोलाऊन पैसे घेतले जातात तरी संबंधित डॉक्टर वर कोणत्याच प्रकारची कारवाई नाही, सौ मनिषा उमेश चव्हाण या महिलेचे कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया अपयशी करणाऱ्या व रुग्णांशी उद्धटपणे वागणाऱ्या डॉ श्यामकुमार सिरसाम सारख्या बोगस डॉक्टर यांना पाठीशी घालण्याचे काम होत आहे त्याला कारणीभूत अधिष्ठाता गजभिये आहेत.
ओपीडी मधील डॉक्टर 9 ची वेळ असून सुद्धा 11 ते 12 च्या दरम्यान येतात. त्याचे कारण असे की सगळ्या डॉक्टर चे खाजगी हॉस्पिटल असल्या मुळे त्यांना त्यांचे पेशंट काढून सरकारी हॉस्पिटल उशिरा आले तरी चालेल, कारण आपल्याला बोलणारे अधिष्ठाता गजभिये यांना म्यानेज केले असे दिसून येत आहेत कीवां त्यांचं लक्ष नाही असा अर्थ काढू शकतो.
तसेच अधिष्ठाता मॅडम हे वॉर्ड मध्ये राऊंड घेत नाही, वार्डात जागोजागी घाण साचलेली आहे.तसेच हॉस्पिटल परिसरात फेरफटका मारत नाही, ए.सी च्या गाडीने येतात व ए.सी. च्या ऑफिस मध्ये डॉक्टरला बोलून आपलं काम करतात.त्यांना रुग्णासंबधित वॉट्स अप वर मॅसेज केले तरी त्यांचा काहीच रिप्लाय देत नाही त्या मुळे महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना च्या वतीने आपल्याला विनंती करण्यात येते की डॉ मीनाक्षी गजभिये मॅडम यांची तत्काळ हकालपट्टी करण्यात यावी अन्यथा महाराष्ट्र भर तीव्र आंदोलन, धरणे, उपोषण करण्यात येईल यांची गंभीर दखल सरकारनी घेण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य महासचिव उमेश सुरेशराव इंगळे यांनी प्रा संजय खडसे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ता ॲड रोशन तायडे, विशाल भोसले, चंद्रविर तेलगोटे, पिडित महिलेचे पती उमेश चव्हाण उपस्थित होते
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...
वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...
बीड :दि 19/09/2024 रोजी बीड येथे महाराष्ट्रातील धनगर जमातीसाठी असलेल्या अनुसूचित जमातीच्या( ST) आरक्षणाची अंमलबजावणी शिंदे...
निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला. भारतीय वार्ताजिल्हा...
*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* शहरात विजांचा कडकडाटाचा ✍️उत्तम माने लातूर लातूर:- शहरासह ग्रामीण...