Home / महाराष्ट्र / पश्चिम-महाराष्ट्र / सिम स्वॅप फॉडपासून...

महाराष्ट्र    |    पश्चिम-महाराष्ट्र

सिम स्वॅप फॉडपासून सावधान - ॲड. चैतन्य भंडारी

सिम स्वॅप फॉडपासून सावधान - ॲड. चैतन्य भंडारी

 

 

जगदीश का. काशिकर,

कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

 

धुळे - सायबर गुन्हेगारांनी नागरीकांची आर्थिक फसवणूक करण्याचा एक नविन प्रकार शोधला आहे तो म्हणजे सिम स्वॅप. आता हे सिम स्वॅप म्हणजे काय आहे ? सिम स्वॅप फ्रॉड सिम कार्डला बदलणे किंवा त्याच नंबरावर दुसरे सिम कार्ड घेणे. सिम स्वॅपिंग मधील तुमच्या मोबाईल नंबराव्दारे व नावाव्दारे एक नविन सिमचे रजिस्टेशन केले जाते त्यानंतर सायबर गुन्हेगार तुमच्या मोबाईलचे नेटवर्क गायब करतो व तुमचा मोबाईल नंबर त्याच्याकडे चालू करुन घेतो याचाच सायबर गुन्हेगार गैरफायदा घेवून तुमच्या नंबरवर येणारे ओटीपी त्याच्या नंबरवर मागवतो व त्याव्दारे तुमच्या बँक खात्यातले पैसे गायब केले जातात. सायबर गुन्हेगार फिशिंग किंवा वायरस व्दारे तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल आणि बँक खात्याची माहिती मिळवतात त्यानंतर सर्व्हिस प्रोवायडरला योग्य ग्राहकाची ओळख सांगून संपर्क करतात आणि कस्टमर व्हेरिफिकेशन नंतर सर्व्हिस प्रोवायडर हा ग्राहकाकडील जुन्या सिम कार्डला डिअॅक्टीव्हेट करतात आणि सायबर गुन्हेगार नविन सिम कार्ड अॅक्टीव्ह करुन घेतो. म्हणून नागरीकांनी सिम स्वॅप फ्रॉडपासून सतर्क रहावे आणि आपले फोनचे नेटवर्क, कनेक्टीव्हीटी स्टेटस संबंधी माहिती ठेवावी जर कुणाला आपल्या फोनवर कॉल, एसएमएस येत नसेल तर सर्व्हिस प्रोवायडरशी संपर्क साधवा. तुमच्या फोनवर लागोपाठ अज्ञात नंबरने कॉल किंवा ब्लॅक कॉल येत असेल तर आपले फोन स्वीच ऑफ करु नका व सदरील अज्ञात नंबरांना प्रतिसाद देवू नका. आपल्या फोन मध्ये अॅन्टी वायरस अपडेट ठेवा. टु फॅक्टर ऑथन्टीकेशन आपल्या फोनमध्ये सुरु ठेवा किंवा ऑन ठेवा. आपले एसएमएस व आपल्याला येणारे ईमेल आपण नेहमी बघत रहावे. आपल्या बँकेला दिलेला मोबाईल क्रमांक व ईमेल आयडी हा कुणालाही शेअर करु नका. पब्लीक वायफायचे वापर टाळा. आपल्या आर्थिक व्यवहाराची बँकेकडे एक मर्यादा ठेवून आपल्या बँक खात्याचे एक ट्रॉन्सक्शन लिमीट ठेवावे आणि आपले आंतरराष्ट्रीय बँकींग ट्रॉन्सक्शन बंद ठेवावे आणि जेव्हा गरज असेल तेव्हा आपण ते सुरु करावे असे आवाहन सायबर अॅवरनेस फौंडेशनचे अध्यक्ष व ख्यातनाम सायबर तज्ञ अॅड. चैतन्य एम. भंडारी यांनी तमाम नागरीकांना व जनतेला केले आहे.

ताज्या बातम्या

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

पश्चिम-महाराष्ट्रतील बातम्या

*राज्यात १९ फेब्रुवारीला शिवजयंती उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात साजरी होणार*

*सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र* मुंबई, दिनांक १३: छत्रपती...

*सुप्रसिद्ध मेडीसन पीआर मिडीया एजन्सी बाबत जगदिश काशिकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतरांना नोकरी वाचविण्याबाबत निवेदन व स्मरणपत्र* *कामगार आयुकत यांच्या पर्यत आपली समस्या पोहचवण्यासाठी व न्यायासाठी सुप्रसिद्ध समाजसेवक, वकील व वोचडोग फाऊंडेशन चे ट्रस्टी श्री गोडफ्रे पिमेंटा यांची घेतली कायदेशिर मदत* *दिल्ली कामगार मंत्री कार्यालयातुन या प्रकरणाबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आदेश महाराष्ट्र कामगार आयुकत यांना देण्यात आले आहेत*

भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरमुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व...

ब्राह्मण पुरोहिताची जागा बहुजन पुरोहितांना द्या! मराठा सेवा संघ संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर

भारतीय वार्ता : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राजघराण्यातील वर्तमानातील युवराज्ञी संयोगिता राजे संभाजी...