Home / महाराष्ट्र / पश्चिम-महाराष्ट्र / मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

महाराष्ट्र    |    पश्चिम-महाराष्ट्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रत्नागिरी जिल्ह्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नियोजित इमारतीचा भूमिपूजन सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या हस्ते रत्नागिरी जिल्ह्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नियोजित इमारतीचा भूमिपूजन सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न

 

 

जगदीश का. काशिकर,

कायदा (लॉ) / सुरक्षा /  सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

 

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नियोजित इमारतीचा भूमिपूजन सोहळा आज (शुक्रवार) मा. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी या  महाविद्यालयात शिकणाऱ्या विदयार्थ्यांसोबत त्यांनी संवाद साधला.

 

यासमयी उपस्थित विद्यार्थी आणि रत्नागिरीकर नागरिकांना संबोधित करताना कोकणात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कोकणातच उच्च शिक्षणाची संधी मिळायला हवी या भावनेतूनच रत्नागिरीमध्ये शासकीय तंत्रनिकेतन सुरू करण्यात आले असल्याचे सांगत या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माध्यमातून अनेक नवीन तंत्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू होत असल्याचा विशेष आनंद होत असल्याचे नमूद केले.

 

मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हातात घेतल्यावर सगळ्यात आधी त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेऊन अवघ्या ८ दिवसात त्यासाठी ५२२ कोटींच्या निधीला परवानगी दिली.

 

सध्या राज्यात अनेक उद्योग मोठी गुंतवणूक करत असून त्या माध्यमातून भविष्यात अनेक रोजगाराच्या संधी येथील तरुणांना मिळणार आहेत. इथे शिकलेल्या विद्यार्थ्याला इथेच रोजगार उपलब्ध करून देण्याचा आपला प्रयत्न असल्याचे याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. तरुणांनी भविष्यातील या संधी ओळखून प्रस्तावित रिफायनरीचे देखील समर्थन करावे असे आवाहन देखील त्यांनी यासमयी केले.

 

त्यासोबत 'श्रीमान हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगणां' चे लोकार्पण देखील यावेळी करण्यात आले. या तारांगणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अंतराळातील वैज्ञानिक माहिती पाहण्याची, अनुभवण्याची संधी मिळणार आहे.

 

याप्रसंगी राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार भरतशेठ गोगावले, आमदार योगेश कदम, रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी देवेंदर सिंह, रत्नागिरी नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकुमार पुजार आणि शासकीय तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ.अभय वाघ आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी, शिक्षक तसेच रत्नागिरीकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

पश्चिम-महाराष्ट्रतील बातम्या

*राज्यात १९ फेब्रुवारीला शिवजयंती उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात साजरी होणार*

*सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र* मुंबई, दिनांक १३: छत्रपती...

*सुप्रसिद्ध मेडीसन पीआर मिडीया एजन्सी बाबत जगदिश काशिकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतरांना नोकरी वाचविण्याबाबत निवेदन व स्मरणपत्र* *कामगार आयुकत यांच्या पर्यत आपली समस्या पोहचवण्यासाठी व न्यायासाठी सुप्रसिद्ध समाजसेवक, वकील व वोचडोग फाऊंडेशन चे ट्रस्टी श्री गोडफ्रे पिमेंटा यांची घेतली कायदेशिर मदत* *दिल्ली कामगार मंत्री कार्यालयातुन या प्रकरणाबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आदेश महाराष्ट्र कामगार आयुकत यांना देण्यात आले आहेत*

भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरमुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व...

ब्राह्मण पुरोहिताची जागा बहुजन पुरोहितांना द्या! मराठा सेवा संघ संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर

भारतीय वार्ता : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राजघराण्यातील वर्तमानातील युवराज्ञी संयोगिता राजे संभाजी...