वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता
स्प्राऊट्स Exclusive
मध्यप्रदेशसारख्या पुढारलेल्या राज्यातून एसपी, डीआयजी, एडीजी, आयजीपी यांसारख्या मोठ्या पदांवर काम करणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याचे नावापुढे ‘डॉक्टर’ ही उपाधी लावण्याचे स्वप्न होते. या स्वप्नाचा फायदा घेत बोगस पीएचडी विकणाऱ्यांनी या आयपीएस अधिकाऱ्याला चक्क बोगस पीएचडी विकली, अशी धक्कादायक माहिती ‘स्प्राऊट्स’च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमच्या (एसआयटी ) हाती लागलेली आहे.
वरुण कपूर (Varun Kapoor) हे १९९१ च्या बॅचचे सिनिअर आयपीएस ऑफिसर आहेत. मध्यप्रदेशमध्ये त्यांनी अनेक मोठ्या पदांवर काम केले आहे. हे काम करीत असताना आपल्या कार्याची दखल घेतली जावी व नावापुढे ‘डॉक्टर’ ही उपाधी लागावी, अशी त्यांची सुप्त इच्छा होती. याच संधीचा फायदा घेत बोगस पीएचडी विकणाऱ्या एजण्ट्सनी त्यांना गाठले.
दिनांक १७ जुलै २०२२ रोजी नवी दिल्ली येथील India Habitat Center येथे जाहीर कार्यक्रम झाला. तेथे कपूर यांना पीएचडी विकणाऱ्या टोळक्यांनी बोगस पीएचडी प्रदान केली. Theophany University या बोगस विद्यापीठाची ही ऑनररी पीएचडी आहे.
अशा पद्धतीने बोगस पीएचडी देण्यासाठी अभिषेक पांडे (Abhishek Pandey) हा भामटा नामांकन शुल्क (nomination fees) या गोंडस नावाखाली लाखो रुपये उकळतो व पीएचडीचे स्वप्न बाळगणाऱ्यांची फसवणूक करतो, असे ‘स्प्राऊट्स’च्या एसआयटीला आढळून आलेले आहे.
बोगस पीएचडी विकणे, हा तर झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग
महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात सध्या अंकिता थामनकर (Ankita Thamankar) ही महिला University of Macaria, South Western American University and British National University of Queen Mary या विद्यापीठांचे एजण्ट म्हणून काम बघते. या तीनही विद्यापीठांचे जगातील कोणत्याही देशांमध्ये रजिस्ट्रेशन नाही. ही सर्व विद्यापीठे संपूर्णतः बोगस आहेत.
अंकिता थामनकर हीने या विद्यापीठांच्या नावाखाली बोगस पीएचडी विकण्याचा जणू सपाटाच लावलेला आहे. या गोरखधंद्यातून तिने आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची माया गोळा केलेली आहे, याची सखोल चौकशी करण्याची गरज आहे.
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
सहकार्य:*उन्मेष गुजराथी*
*स्प्राऊट्स ब्रँड स्टोरी*
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
*सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र* मुंबई, दिनांक १३: छत्रपती...
भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरमुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व...
भारतीय वार्ता : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राजघराण्यातील वर्तमानातील युवराज्ञी संयोगिता राजे संभाजी...