वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
Reg No. MH-36-0010493
✍???? नवनाथ दत्तात्रय रेपे
repe9nat@gmail.com
म्हणे ज्ञानदेवे रेडा बोलविला। कुलूप मुखाला आपणाच्या॥१॥
भिंत चालवता आली ज्ञानोबाला। बंदी स्वतःला फिरण्याची॥२॥
जेव्हा फाडताना सनातनी झोळी। सिद्धी नाही केली लधीमा का॥३॥
कैसा नाही केला तिथे चमत्कार। पुसे विश्वंभर ज्ञानदेवा॥४॥
वरील अभंग हा विद्रोही कवी विश्वंभर वराट यांचा असून ते याच अभंगातून ज्ञानदेवाला प्रश्न विचारत आहेत. असे प्रश्न केले की, तथाकथित हभपचा पोटसुळ कशाला उठला पाहीजे ? पण हेच लोक एकीकडे संत तुकाराम महाराजांचे नाव घेऊन कोट्यावधींची माया जमा करून मौजमजा करत आहेत. तर दुसरीकडे त्याच संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील एका एका अभंगावर लोक पीएचडीचे प्रबंध लिहून डाॅक्टरेट होत आहेत. पण दुःख याचं वाटतंय की, जेव्हा केव्हा संत तुकाराम महाराजांवरती काही बाडगे चिखलफेक करतात तेव्हा त्या घटनेचा निषेध करताना हे तथाकथित बाजारू किर्तनकार व डाॅक्टरेट झालेले लोक कुठेच का दिसत नाहीत ? पीएचडी ही काय फक्त बायकोला चांगली साडी घेऊन स्वतःला सुटाबुटात ठेवण्यासाठीच घ्यायची असते का ? दुसरीकडे त्याच तुकोबांचा केवळ चार चरणांचा अभंग घेऊन लोकांना विज्ञाननिष्ठ तुकोबाराय व त्यांची वाणी सांगून लोकांना प्रबोधीत करण्याऐवजी हे पट्टेबहाद्दर लोक राम - रामायण कृष्ण - महाभारत सांगून लोकांच्या मतीत माती घालण्याच काम हे फेट्यातील रेशिमबागेचे समर्थक करतात. ज्याला आजपर्यंत कोण पहायल नाही, देव पहायची वस्तू नाही ना देव काय बाजाराचा भाजीपाला नाही असं ज्याविषयी संतांनी सांगितले त्याचे देव्हारे हे तथाकथित स्वयंघोषीत किर्तनकार माजवून दिवसरात्र कोकलतात पण जेव्हा संत नामदेव व संत तुकाराम महाराज यांची बदनामी या मनुवादी विकृतींकडून होते तेव्हा मात्र हे सुपारी बहाद्दर शांत आणि निपचित पडतात. परंतू रेडा मंदीर मस्जिद भगवा हिरवा लव्ह जिहाद यांचा मुद्दा निघतो तेव्हा मात्र हेच बाजारबुनगे एखाद्या मोकाट वळूसारखे ताडकन जागे होऊन फाडकन तोंडातून अवैज्ञानिक अतार्कीक बोलून आपल अज्ञान दाखवतात. पण ते त्यांचं अज्ञान आमच्या लोकांना समजतही नाही कारण त्यांना तरी कुठे तेवढी तार्किक बुद्धी या पट्टेबहाद्दरांनी ठेवली आहे. यांना फक्त दगडात दिसणारा देव पाहीजे इथं माणसांना विचारतो तरी कोण ? या बांडगूळांना सांगावं वाटतं की, संत नामदेव व संत तुकाराम महाराज यांचे विचार हे केवळ पैसा कमावण्याच साधन नसून ते समाज प्रबोधनाच एक उत्तम तंत्र आहे. कारण तुकोबाच म्हणतात की,
"शेंदूर माखोनिया धोंडा ! पाया पडती पोरे रांडा !
देव दगडाचा केला ! गवंडी त्याचा बाप झाला !
देव सोन्याचा घडविला ! सोनार त्याचा बाप झाला !
सोडोनिया ख-या देवा ! करी म्हसोबाची सेवा !"
सुषमा अंधारे यांनी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या वेद व रेडा प्रकरणार भाष्य केले ते २००९ साली पण त्याची उकळी आली ती आता २०२२ च्या शेवटी मग प्रश्न पडतो की, २००९ पासून सुस्त पडलेले हे तथाकथित किर्तनकार शांत का बसले होते ? हे तथाकथित किर्तनकार नेहमी सुस्त पडलेले दिसतात कारण संत तुकाराम महाराज यांची जेव्हा जेव्हा बदनामी झालेली दिसते तेव्हा हे निषेध करताना कुठेच का दिसत नाहीत ? हिंदुत्ववाद्यांची माय केतकी चितळे ही मनोरुग्ण आहे ? कारण ही नेहमी आपल्या तोंडून विषाचे फुत्कार बाहेर सोडते. असंच एकदा तीने संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचे विडंबन काव्य तयार करून ते सोशल मीडियावर टाकले होते. या काव्यामुळे देहुतील तुकाराम महाराज संस्थानने केतकी विरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. (सरकारनामा १५ मे २०२२) संत तुकाराम महाराज यांचा गाथा वाचल्यास नक्कीच माथा ठिकाणावर येतो मात्र ज्या केतकी कडे माथाच नाही तीला गाथा काय घंटा कळणार आहे ? या केतकी चितळेंचा मडके शेटे आंधळे पाटील या तथाकथित बाजारू लोकांनी कधी निषेध केला आहे का ? जशी मडकेने सुषमा अंधारेंची तिरडी काढली तशी केतकी चितळेची तिरडी का काढली नाही ? म्हणजे हेच ते तथाकथित बाजारू लोक आहेत जे नामदेव तुकोबांच्या वारकरी संप्रदायात घुसखोरी करत आपला स्वार्थ साधत आहेत. म्हणून तर बहुजन मुक्ती पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांत होवाळ हे फेसबुकवर म्हणतात की, 'सगळेच वारकरी भागवत धर्माचे नसतात काही मोहन भागवत ने ठेवलेले सुद्धा असतात !' मग हे मोहन भागवताचे तथाकथित पोटभरू चेले वेदाच तत्वज्ञान हेपलून आम्हा बहुजनांपुढे नुसती उठाठेव करतात. त्या तथाकथित बाजारूना सांगावं वाटतं की,
संत बसवेश्वरांनी ज्या अनुभव मंडपाची स्थापना केली त्याचे अध्यक्ष अल्लमप्रभू म्हणतात की,
"वेद म्हणजे पढत गप्पा ! शास्त्र म्हणजे बाजाराची उठाठेव !
पुराण म्हणजे पुडाच्या गोष्टी ! तर्क म्हणजे ठगरांची टक्कर !"
रेशिमबागेच्या मस्तकातून निघालेला विचार आणि सदाशिव पेठेतून छापलेला विचार हा बहूजन महापुरुषांच्या इतिहासावर डांबर फासणारा असतो, पण ह्याचा निषेध करतो तरी कोण ? जे आजचे तथाकथित हभप सकाळी उठल्या पासून झोपेपर्यंत ज्ञानबा तुकाराम चा जप करतात त्यांना कुठे आणि कोणी संतांची बदनामी केली हे माहीतही होत नसेल कारण यांना सुपा-या ठरवण्याच्या नादात वेळ मिळतो तरी कुठे ? त्यामुळे तथाकथित लोकांना सांगाव वाटतं की, वारकरी सांप्रदाय म्हणजे केवळ सुपा-या घेण्यासाठीचा अड्डा नाहीतर तो एक विचारांचा महासागर आहे त्याला तुमच्या सारख्या घुसखोरांनी कलंकित केलं आहे. २०१८ मध्ये सर्व शिक्षा अभियानांतर्गत दिलेल्या 'संतांचे जीवन प्रसंग’ या पुस्तकात तुकाराम महाराजांबाबत गोपीनाथ तळवलकर यांनी लिहिले होते की, "तुकाराम महाराजांची बायको फार रागीट. तोंडाला कुत्रे बांधावे ना तसे, तिच्या तोंडून कायम नेहमी शिव्याच बाहेर यायच्या. ‘ते आमचं येडं’ असं आपल्या पतीला ती म्हणायची. पण मनाने फार प्रेमळ आणि पतिभक्त. काशी आणि महादू ही त्यांची मुले." (लोकसत्ता ऑ. १२ आक्टो.२०१८) गोपीनाथ तळवलकर या लेखकाने असा मजकूर छापून संत तुकाराम महाराज यांच्यावर चिखलफेक केली नाही का ? हा वारकरी संप्रदायाचा अवमान नाही का ? गोपीनाथ तळवलकर या मनोरूग्णांची तिरडी मडके महाराजाने काढली होती का ? यावेळी आंधळे शेटे पाटील व तमाम तथाकथित हभप साधा निषेध केल्याची बातमी तरी आहे का ? मग तुकोबांच नाव काय फक्त सुपा-या घेण्यासाठीच वापरायचे आहे का रे तथाकथित स्वयंघोषीत किर्तनकारांनो ? म्हणून तर येथे संत नामदेव महाराजांचा अभंग उपयोगी पडतो तो असा की,
पोटासाठी जरी करी हरिकथा ! जन रंजविता फिरतसे !
तेणे घात केला एकोत्तशत कुळांचा ! पाहुणा यमाचा श्रेष्ट थोर !
द्रव्यचिये आशे हरीकथा करी ! तया यमपुरी नित्य वास !
नामा म्हणे ऐसे होत जे रे कोणी ! ते नर नयनी पाहू नये !
स्वतः ला किर्तनकार म्हणून घेणारे हे स्वंयघोषित राष्ट्रीय किर्तनकार तुकोबांची बदनामी होते तेव्हा कुठे असतात ? संत तुकाराम महाराजांनी आपल्या गाथेच्या माध्यमातून इथल्या ब्राम्हण व ब्राम्हणवाद्यांच्या पृष्ठभागात अशी काही मेख ठोकली आहे की ती जेसीबी लावून जरी काढण्याचा प्रयत्न केला तरी ब्राम्हण व ब्राम्हणवाद्यांचा पृष्ठभाग फाटेल पण मेख तशीच राहील म्हणून तर ते वारंवार तुकोबांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. पण मग प्रश्न पडतो की, त्या तुकोबांचे नाव घेऊन जनतेच्या खिस्यावर डल्ला मारणारे हे तथाकथित हभप बदनामी वेळी हजर नसतात तर मग कुठे महाप्रसादाची पंगत झोडत बसतात का ? रामदासी पाठ्यपुस्तकात पळपुट्या रामदास, कामलंपट ब्रम्हदेव, मायमा-या परशुराम यांचा समावेश करू पहाताहेत पण बदनामी अजिबातच होऊ देत नाहीत. मात्र आमच्या महापुरुषांच्या चारित्र्यावर चिखलफेक करण्याच काम ते नेहमी करतात तसच राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने २००४ साली घेतलेल्या इयत्ता १० वीच्या प्रश्नपत्रिकेत संत तुकाराम महाराज यांचेवर एक अवमानकारक उतारा दिला होता. त्यावेळी महाराष्ट्रात संभाजी ब्रिगेड व इतर संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. परंतू तेव्हा हे रेड्याचे देव्हारे माजवणारे स्वंयघोषित किर्तनकार कुठे होते ? अरे तथाकथित रेड्यांनो तुम्ही कितीही आमची तोंड दाबण्याचा प्रयत्न केला तरी आता आम्ही तार्किक प्रश्न विचारून साहीत्यात केलेली मनुवादी घुसळण वेगळी करण्यासाठी तार्किक प्रश्नांचा मारू करत आहोत. म्हणून विद्रोही साहित्यिक विश्वंभर वराट प्रश्न करतात की,
ज्ञाना रेड्यामुखी बोलविले वेद। बोलविला बुध्द कैसा नाही ॥१॥
म्हणुनीया रेडे रेडेच राहिले। दावणीला गेले ब्राह्मणाच्या ॥२॥
आता तरी जागा त्रिपिटीक गाथा। रेडियांचा माथा सुधारेल ॥३॥
म्हणे विश्वंभर ऐसे थोर ज्ञान। घेवू वदवून रेड्यामुखी ॥४॥
आम्हाला जे आमचे किर्तनकार वाटतात आणि दिसतात ते खरेच आमच्या वारकरी संप्रदायातील विचारांचा प्रचार आणि प्रसार करतात का ? कारण आज जिकडे तिकडे पाहील्यास अनेक किर्तनकार दिसतात पण त्यांनाच नामदेव तुकोबा ही संतांची जोडी समजली का ? जर यांना हे संत समजले असते तर यांनी दंतकथांचा आधार घेऊन किर्तनात आभाळ हेपललेच नसते. अनेक देवांची निर्मिती अशी झाली असे सांगतात पण आजपर्यंत एकाही देवाचा थांगपत्ता लागला नाही म्हणून महात्मा फुले हे थोतांड एका मिनटात गार करताना म्हणतात की,
कल्पनेचे देव कोरीले उदंड ! रचिले पाखंड हितासाठी !
किन्नर, गंधर्व ग्रंथी नाचविले ! अज्ञ फसविले ! कृती माने !
निर्लज्ज सोळवे, त्याचे अधिष्ठान ! भोवती निदान ! शूद्रादिक !
धातू दगडाच्या देवास भजून ! घंटी वाजवून स्वतः खाई !
*"नवनाथ दत्तात्रय रेपे लिखित"*
१. भट बोकड मोठा
२. डोळ्यात माणसांच्या फेकून धूळ गेला
ही पुस्तके घरपोच मिळतील
संपर्क - रुक्माई प्रकाशन, बीड
मो. ९७६२६३६६६२, ९७६४४०८७९४
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...
वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...
बीड :दि 19/09/2024 रोजी बीड येथे महाराष्ट्रातील धनगर जमातीसाठी असलेल्या अनुसूचित जमातीच्या( ST) आरक्षणाची अंमलबजावणी शिंदे...
निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला. भारतीय वार्ताजिल्हा...
*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* शहरात विजांचा कडकडाटाचा ✍️उत्तम माने लातूर लातूर:- शहरासह ग्रामीण...