Home / महाराष्ट्र / पश्चिम-महाराष्ट्र / मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

महाराष्ट्र    |    पश्चिम-महाराष्ट्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय भाऊसाहेब चौधरी तसेच नाशिक ग्रामीण जिल्हाप्रमुख सुनील पाटील यांच बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय भाऊसाहेब चौधरी तसेच नाशिक ग्रामीण जिल्हाप्रमुख सुनील पाटील यांच बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश

भारतीय वार्ता 

 

जगदीश का. काशिकर,

कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

 

नाशिक: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाशिक जिल्ह्याचे संपर्कप्रमुख आणि खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय भाऊसाहेब चौधरी तसेच नाशिक ग्रामीण जिल्हाप्रमुख सुनील पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.

 

महाविकास आघाडीच्या गेल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात नाशिक जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी बाळगलेल्या अपेक्षा पूर्ण होऊ न शकल्याने आपण बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करत असल्याचे मत याप्रसंगी भाऊसाहेब चौधरी यांनी व्यक्त केले. यासमयी त्यांचे बाळासाहेबांची शिवसेना पक्षात सहर्ष स्वागत करित त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या.

 

कोणावर टीका करण्यापेक्षा ज्या पध्दतीने ते यापूर्वी पक्षवाढीसाठी कार्यरत होते तसेच यापुढे देखील कार्यरत राहतील असा विश्वास याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

 

यासमयी राज्याचे बंदरे आणि खनिकर्म मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, आमदार सुहास कांदे, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सचिव संजय मोरे, कल्याण ग्रामीण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे तसेच बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

पश्चिम-महाराष्ट्रतील बातम्या

*राज्यात १९ फेब्रुवारीला शिवजयंती उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात साजरी होणार*

*सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र* मुंबई, दिनांक १३: छत्रपती...

*सुप्रसिद्ध मेडीसन पीआर मिडीया एजन्सी बाबत जगदिश काशिकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतरांना नोकरी वाचविण्याबाबत निवेदन व स्मरणपत्र* *कामगार आयुकत यांच्या पर्यत आपली समस्या पोहचवण्यासाठी व न्यायासाठी सुप्रसिद्ध समाजसेवक, वकील व वोचडोग फाऊंडेशन चे ट्रस्टी श्री गोडफ्रे पिमेंटा यांची घेतली कायदेशिर मदत* *दिल्ली कामगार मंत्री कार्यालयातुन या प्रकरणाबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आदेश महाराष्ट्र कामगार आयुकत यांना देण्यात आले आहेत*

भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरमुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व...

ब्राह्मण पुरोहिताची जागा बहुजन पुरोहितांना द्या! मराठा सेवा संघ संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर

भारतीय वार्ता : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राजघराण्यातील वर्तमानातील युवराज्ञी संयोगिता राजे संभाजी...