Home / महाराष्ट्र / कोकण / मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

महाराष्ट्र    |    कोकण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कांदिवली येथील ईतर पक्षाच्या पदधिकारी व कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कांदिवली येथील ईतर पक्षाच्या पदधिकारी व कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश

भारतीय वार्ता :

 

जगदीश का. काशिकर,

कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

 

मुंबई: मुंबईतील कांदिवली येथील शिवसेना, मनसे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी तसेच शिवसेनेच्या भारतीय चित्रपट कामगार सेनेचे कार्याध्यक्ष सुशांत शेलार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शनिवारी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.  

 

त्यासोबतच कांदिवली विभागातील महिला विभाग संघटक विशाखा मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीस मनिषा गांगण, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस रोहन राणे, मनसे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष प्रशांत शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला.

 

या सर्वांचे पक्षात मनापासून स्वागत करित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना भावी राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची भूमिका विशद करताना कांदिवली परिसराला भेडसावणारे प्रश्न नक्की सोडवण्यात येतील अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.

 

याप्रसंगी खासदार राहुल शेवाळे, माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या प्रवक्त्या सौ.शीतल म्हात्रे, महिला विभाग संघटक सौ.कला शिंदे, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या नेत्या आशा मामिडी तसेच पदाधिकारी आणि सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* 26 December, 2024

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी. 26 December, 2024

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी.

वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...

कोकणतील बातम्या

महिलांनी शैक्षणिक प्रवाहात यावे-प्रवीण काकडे

रत्नागिरी:महिलांनी शैक्षणिक क्षेत्रात येऊन आपल्या कुटुंबाची प्रगती करावी असे प्रतिपादन प्रवीण काकडे अध्यक्ष अहिल्यादेवी...

*जितके पॅनिक व्हाल तितके सायबर फ्रॉड मध्ये अडकत जाल - अॅड. चैतन्य भंडारी*

भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरकायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र....

*ऑनलाईन गेम चा सापळा धोका वेळीच ओळखा - अॅड. चैतन्य एम. भंडारी*

भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरकायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र....