Home / महाराष्ट्र / कोकण / लोकांसमोर जाण्यासाठी...

महाराष्ट्र    |    कोकण

लोकांसमोर जाण्यासाठी थोर पुरुषांचा आसरा घेताहेत* *आ. प्रवीण दरेकरांचे महाविकास आघाडीवर टीकास्त्र*

लोकांसमोर जाण्यासाठी थोर पुरुषांचा आसरा घेताहेत*  *आ. प्रवीण दरेकरांचे महाविकास आघाडीवर टीकास्त्र*

*

 

जगदीश का. काशिकर,

कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

 

मुंबई - डॉ. बाबासाहेब आंबेडकर व देवदेवतांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत आणि उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षातर्फे आज मुंबईतील ६ लोकसभा मतदार संघांमध्ये 'माफी मांगो' आंदोलन करण्यात आले. मुंबईतील नरिमन पॉईंट येथील भाजप प्रदेश कार्यालयाजवळील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ भाजप विधानपरिषद गटनेते आमदार प्रवीण दरेकर आणि पर्यंटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. लोकांसमोर जाण्यासाठी महाविकास आघाडी जाणूनबुजून थोर पुरुषांचा आसरा घेत आहेत, असा हल्लाबोल दरेकर यांनी केला. तसेच तुम्ही जसे कराल त्याला जशास तसे उत्तर देऊ, असा इशाराही दरेकर यांनी दिला.                        

 

या माफी मांगो आंदोलनात भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांच्यासह राज्याचे पर्यटन मंत्री व मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार प्रीतम मुंडे, खासदार राम सातपुते आणि मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्ते सहभागी झाले होते. 'ज्ञानेश्वर माऊली का अपमान नही सहेगा हिंदुस्थान', 'देवी देवताओ का अपमान नही सहेगा हिंदुस्थान', संत वारकरी का अपमान नही सहेगा हिंदुस्थान, संजय राऊत हायहाय, जनाब सेना मुर्दाबाद, अशा प्रकारचे फलक कार्यकर्त्यानी हाती घेतले होते. यावेळी उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले, सुषमा अंधारे हायहाय, जो हमसे टकरायेगा मिट्टीमे मिल जायेगा, धिक्कार असो , धिक्कार असो अशा जोरदार घोषणाही देण्यात आल्या. तसेच पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या वैयक्तिक टिकेचाही भाजपकडून निषेध करण्यात आला. मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद, अशा घोषणा देत दरेकर आणि लोढा यांनी पाकिस्तानचा झेंडा फाडत, बिलावल भुट्टो यांची प्रतिमा होळी करून जाळत आपला संताप व्यक्त केला.

 

यावेळी बोलताना दरेकर म्हणाले कि, संजय राऊत यांनी आवाहन केले होते सरकारने रस्त्यावर उतरावे. पर्यटन मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा इकडे आले आहेत. सरकार रस्त्यावर उतरले आहे ते तुमची नौटंकी लोकांसमोर आणण्यासाठी. जे काही लोकांसमोर खोटे चित्र उभे करताय त्याविरोधात हे आंदोलन आहे. सुषमा अंधारे यांनी संतांचा अपमान करायचा, छगन भुजबळ यांनी सरस्वतीचा अपमान करायचा, जे ज्ञानी संपादक विश्वव्यापी संजय राऊत यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला हे माहित नाही.. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी बोलताहेत बाबासाहेबांचा जन्म ९१,९२, ९३ कि ९४ साली झाला. याना लाज कशी वाटत नाही. मोर्चात सहभागी झालेल्या लोकांनी ह्यांना जोड्याने मारले पाहिजे, असा संतापही दरेकर यांनी यावेळी व्यक्त केला.

 

ते पुढे म्हणाले कि, हे सरकार जनतेचे आहे. जनतेसाठी रस्त्यावर उतरले आहे. महाविकास आघाडीच्या आरोपांत काही तथ्य नाही. लोकांना भरकटवण्याचा प्रयत्न सुरु आहे. तो आम्ही चालू देणार नाही. हे सांगण्यासाठी आणि महाविकास आघाडीचा मुखवटा फाडण्यासाठी आजचे 'माफी मांगो' आंदोलन आहे. महाविकास आघाडीच्या मोर्चाला कुणीही भीक घालत नाही. आमचे राज्याचे नेतृत्व शिंदे आणि फडणवीस हे भक्कम आहेत. महाविकास आघाडीत एकवाक्यता नाही. लोकांसमोर जाण्यासाठी जाणूनबुजून थोर पुरुषांचा आसरा घेत आहेत. थोर पुरुषांचा सन्मान आम्ही करू. तुम्ही जसे कराल त्याला जशास तसे उत्तर देऊ, असा इशाराही यावेळी दरेकर यांनी दिला.

ताज्या बातम्या

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

कोकणतील बातम्या

महिलांनी शैक्षणिक प्रवाहात यावे-प्रवीण काकडे

रत्नागिरी:महिलांनी शैक्षणिक क्षेत्रात येऊन आपल्या कुटुंबाची प्रगती करावी असे प्रतिपादन प्रवीण काकडे अध्यक्ष अहिल्यादेवी...

*जितके पॅनिक व्हाल तितके सायबर फ्रॉड मध्ये अडकत जाल - अॅड. चैतन्य भंडारी*

भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरकायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र....

*ऑनलाईन गेम चा सापळा धोका वेळीच ओळखा - अॅड. चैतन्य एम. भंडारी*

भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरकायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र....