Home / महाराष्ट्र / कोकण / मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

महाराष्ट्र    |    कोकण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रत्नागिरी जिल्ह्यासाठी मंजूर केलेल्या ७५० कोटी रुपयांच्या कामांचा भूमीपूजन आणि लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते  रत्नागिरी जिल्ह्यासाठी मंजूर केलेल्या ७५० कोटी रुपयांच्या कामांचा भूमीपूजन आणि लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

भारतीय वार्ता 

 

जगदीश का. काशिकर,

कायदा (लॉ) / सुरक्षा /  सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

 

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यासाठी मंजूर केलेल्या ७५० कोटी रुपयांच्या कामांचा भूमीपूजन आणि लोकार्पण सोहळा शुकवारी/काल मोठ्या उत्साहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमासोबत आयोजित करण्यात आलेल्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या अतिविराट सभेला त्यांनी संबोधित केले.

 

कोकणाला निसर्गाने भरभरून सौंदर्य दिले असून वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी कोकणी माणसावर मनापासून प्रेम केलं तसेच कोकणी माणसाने देखील शिवसेनेला भरभरून दिले आहे. कोकणी माणूस साधा भोळा असला तरीही तत्वाचा पक्का आहे, त्यामुळे कोणी त्याच्याशी खोटे बोलण्याचा प्रयत्न केला तर तो त्यांच्या कपाळी नारळ हाणल्याशिवाय राहत नाही.

 

काही जण आमच्यावर खोके दिल्याचा आरोप करतात मात्र आम्ही रत्नागिरीच्या विकासासाठी ७५० खोके देणारे सरकार असल्याचे मत याप्रसंगी मोठ्या संख्येने जमलेल्या रत्नागिरीकर नागरिकांना संबोधित करताना  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

 

राज्यातील युती सरकारने गेल्या सहा महिन्यांत राज्यातील शेतकरी, कष्टकरी, विध्यार्थी, शिक्षक तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या भल्यासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. कोकणी माणसाला त्यांच्याच मातीत हक्काचा रोजगार देण्यासाठी बारसू येथे ग्रीन रिफायनरीचा प्रकल्प आणणार असल्याचे स्पष्ट करित कोणावरही जबरदस्ती करणार नसून स्थानिकांच्या संमतीनेच हा प्रकल्प राबविण्यात येईल, असेही याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.

 

कोकणातील काजू पिकासाठी काजू बोर्डाची स्थापना केली असून आंबा बोर्ड स्थापन करण्याला देखील तत्वतः मान्यता दिलेली आहे. तसेच कोकणच्या विकासासाठी एमएमआरडीए च्या धर्तीवर कोकण क्षेत्रविकास नियोजन प्राधिकरण स्थापन करणार असल्याचे यासमयी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.

 

याप्रसंगी लांजा नगरपालिकेतील सर्व नगरसेवकांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.

 

यासमयी राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार शहाजीबापू पाटील, आमदार योगेश कदम, आमदार सदा सरवणकर, माजी आमदार सदानंद चव्हाण, किरण सामंत तसेच बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि सहकारी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* 26 December, 2024

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी. 26 December, 2024

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी.

वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...

कोकणतील बातम्या

महिलांनी शैक्षणिक प्रवाहात यावे-प्रवीण काकडे

रत्नागिरी:महिलांनी शैक्षणिक क्षेत्रात येऊन आपल्या कुटुंबाची प्रगती करावी असे प्रतिपादन प्रवीण काकडे अध्यक्ष अहिल्यादेवी...

*जितके पॅनिक व्हाल तितके सायबर फ्रॉड मध्ये अडकत जाल - अॅड. चैतन्य भंडारी*

भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरकायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र....

*ऑनलाईन गेम चा सापळा धोका वेळीच ओळखा - अॅड. चैतन्य एम. भंडारी*

भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरकायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र....