Home / महाराष्ट्र / पश्चिम-महाराष्ट्र / *संजय राऊतांना प्रसिद्धी...

महाराष्ट्र    |    पश्चिम-महाराष्ट्र

*संजय राऊतांना प्रसिद्धी आणि नेतृत्वाचा हव्यास* *भाजपा आमदार प्रविण दरेकरांची घणाघाती टीका

*संजय राऊतांना प्रसिद्धी आणि नेतृत्वाचा हव्यास*  *भाजपा आमदार प्रविण दरेकरांची घणाघाती टीका

भारतीय वार्ता *

 

जगदीश का. काशिकर,

कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

 

मुंबई- महाविकास आघाडीच्या शनिवार 17 डिसेंबरला निघणाऱ्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लोकशाही मार्गाने करण्यात येणाऱ्या आंदोलनात सरकार आडकाठी आणू शकत नाही. मोर्चाला परवानगी द्यावीच लागेल. कारण या देशात अजूनही लोकशाही आहे. हुकूमशाही नाही, असे विधान केले होते. त्याला भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी चोख प्रत्यूत्तर दिले आहे. संजय राऊत यांना प्रसिद्धी आणि नेतृत्वाचा हव्यास झाला आहे, अशी घणाघाती टीका दरेकर यांनी राऊतांवर केली.

 

आमदार प्रविण दरेकर म्हणाले की, संजय राऊत हे अशा प्रकारे बडबड व राजकीय आक्रमक विधाने केल्यावाचून स्वस्थ राहू शकत नाहीत. त्यांना प्रसिद्धी व नेतृत्वाचा हव्यास झाला आहे. मोचार्ला परवानगी देणे हा राज्य सरकारचा भाग नसून पोलीस यंत्रणा त्या ठीकाणी असणार्या परिस्थितीवर व सर्व गोष्टींचा विचार करून परवानगी देत असते. जर त्यात अडचणी आल्या, काही वाद-विवाद निमार्ण झाले तर सरकार त्यात लक्ष घालते. पोलीस मुद्दामहून परवानगी अडवतील असे वाटत नाही. पोलीस त्यांच्या स्तरावर निर्णय घेत असतात. त्यांचे सरकार असताना अनेकदा परवानग्या नाकारल्या गेल्या आहेत. जागा बदलल्या गेल्या आहेत. मोर्चे अडवले गेले आहेत. राजकारण करण्यापलीकडे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री किंवा सरकारवर टीका करायला राऊत यांना आता कुठलीच जागा नाही. चांगले काम होतेय म्हणून अशा प्रकारची वक्तव्ये त्यांना करावी लागत आहेत, असा टोलाही दरेकर यांनी लगावला. तसेच अजित पवार यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत राज्यपालांना हटवले तरी मोर्चा काढणारच अशा प्रकारचे वक्तव्य केले होते. मग यांचा नेमका रोल काहीच नाही आहे. त्यामुळे काहीतरी निमित्त काढून त्याचे राजकारण करायचे व महाराष्ट्रातील जनतेला विकासाबाबत जे काही चित्र निर्माण झालेय त्यापासून भरकटविण्याचा नियोजनबद्ध असा महाविकास आघाडीचा कार्यक्रम असल्याची टीकाही दरेकर यांनी केली.

 

महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्नी काल केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीबाबत बोलताना दरेकर म्हणाले कि, बॅकफूटला कोण आणि फ्रंटफूटला कोण यापेक्षा कर्नाटकचा सीमावाद महाराष्ट्राचा मिटला पाहिजे अशा प्रकारची भूमिका आहे. बॅकफूट आणि फ्रंटफूट अशा प्रकारचा वाद-विवाद निर्माण करण्यापेक्षा दोन्ही राज्यांचा प्रश्न निकाली निघाला पाहिजे हि भूमिका असली पाहिजे. 'दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा', महाराष्ट्र नेहमी अग्रेसर राहिलेला आहे. त्यामुळे याही विषयात महाराष्ट्राची भूमिका अग्रगण्य असेल, असेही दरेकर म्हणाले.

 

भाजप नेते किरीट सोमय्या याना क्लीन चिट मिळाल्याप्रकरणी अजित पवार यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना दरेकर म्हणाले कि, महाविकास आघाडीच्या काळामध्ये किती जणांना क्लीन चिट जाहीर झाली याची यादी जाहीर करावी. अजित पवारांची महाराष्ट्र सहकारी बँकेची क्लीन चिट कुणी दिली. अँटी करप्शन ब्यूरोनेच दिली ना? सरकारनेच दिली ना? असा सवाल करत दरेकर म्हणाले कि, ती एक प्रक्रिया असते. त्यामध्ये काही तथ्य सापडले नाही तर क्लीन चिट दिली जाते. माझीही मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेच्याबाबतीत सी समरी जाहीर झाली होती. सी समरी जाहीर झाल्यानंतर केस पुन्हा उघडली गेली. चौकशी झाली, कोर्टात गेले. तेथे कोर्टाने क्लीन चिट दिली. केवळ राजकीय उद्देशाने होतेय असे समजणे ही राजकीय भूमिका आहे. वस्तुस्थितीला धरून अजित पवार यांचे हे वक्तव्य नसल्याचेही दरेकर म्हणाले.      

 

 

*चौकट*

*सुषमा अंधारे अंधारात*

*चाचपडताना दिसताहेत*

 

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी श्रीकृष्णाचा अपमान केलेला व्हिडिओ व्हायरल झाल्याने महानुभाव पंथहि आक्रमक झाला आहे. यावर बोलताना दरेकर म्हणाले कि, सुषमा अंधारे अंधारात चाचपडताना दिसताहेत. काहीतरी बेताल वक्तव्ये करून राजकीय, धार्मिक तेढ निर्माण करायची. टोकाची टीका मत्सराने, द्वेषाने करायची आणि आपण चर्चेत राहायचे त्यापलीकडे सुषमा अंधारे यांनी रचनात्मक, विकासात्मक भूमिका मांडल्याचे आठवत नसल्याचेही दरेकर म्हणाले.

ताज्या बातम्या

संविधान दिनानिमित्त वणी येथे जाहीर व्याख्यान. 24 November, 2024

संविधान दिनानिमित्त वणी येथे जाहीर व्याख्यान.

वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन. 23 November, 2024

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.

...

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

पश्चिम-महाराष्ट्रतील बातम्या

*राज्यात १९ फेब्रुवारीला शिवजयंती उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात साजरी होणार*

*सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र* मुंबई, दिनांक १३: छत्रपती...

*सुप्रसिद्ध मेडीसन पीआर मिडीया एजन्सी बाबत जगदिश काशिकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतरांना नोकरी वाचविण्याबाबत निवेदन व स्मरणपत्र* *कामगार आयुकत यांच्या पर्यत आपली समस्या पोहचवण्यासाठी व न्यायासाठी सुप्रसिद्ध समाजसेवक, वकील व वोचडोग फाऊंडेशन चे ट्रस्टी श्री गोडफ्रे पिमेंटा यांची घेतली कायदेशिर मदत* *दिल्ली कामगार मंत्री कार्यालयातुन या प्रकरणाबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आदेश महाराष्ट्र कामगार आयुकत यांना देण्यात आले आहेत*

भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरमुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व...

ब्राह्मण पुरोहिताची जागा बहुजन पुरोहितांना द्या! मराठा सेवा संघ संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर

भारतीय वार्ता : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राजघराण्यातील वर्तमानातील युवराज्ञी संयोगिता राजे संभाजी...