Home / महाराष्ट्र / पश्चिम-महाराष्ट्र / बनावट औषध कंपन्यांनी...

महाराष्ट्र    |    पश्चिम-महाराष्ट्र

बनावट औषध कंपन्यांनी बुडवला सरकारचा कोट्यवधी रुपयांचा महसूल

बनावट औषध कंपन्यांनी बुडवला सरकारचा कोट्यवधी रुपयांचा महसूल

भारतीय वार्ता 

 

स्प्राऊट्स Exclusive

 

अवैधरित्या औषध बनविणाऱ्या कंपन्यांच्या खरेदी- विक्री यांच्यामध्ये ताळमेळ नसल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाला आढळून आले आहे, यामुळे सरकारचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे, अशी धक्कादायक माहिती 'स्प्राऊट्स'च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमच्या हाती लागलेली आहे.

 

महाराष्ट्र राज्याच्या पुण्यातील वाकड येथे एस. रेमिडीस प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे. या कंपनीचे मालक प्रवीण अग्रवाल व पवनकुमार गोयल यांनी अन्न व प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांशी आर्थिक संबंध जोपासले व अवैधरित्या औषधे बनवायला सुरुवात केली. या माध्यमातून त्यांनी कोट्यवधी रुपयांची काळी माया गोळा केली, अशी धक्कादायक बातमी 'स्प्राऊट्स'मध्ये प्रसिद्ध करण्यात आली. यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड खळबळ माजली. मात्र तरीही या कंपनीचे उत्पादन अद्यापही चालूच असल्याची माहिती 'स्प्राऊट्स'कडे आहे.

 

बनावट औषधे बनवल्यानंतर त्यांची कंपनीच्या व इंडिया मार्ट सारख्या वेबसाइटवरून विक्री केली जात आहे. मात्र ही विक्री व खरेदी यामध्ये ताळमेळ आढळून येत नाही. यामुळे जीएसटी लायबिलिटी व इनपुट टॅक्स क्रेडिट (सेट ऑफ ) यांच्यामुळे गोधळ उडालेला आहे. यामुळे सरकारचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे, अशी माहिती स्प्राऊट्सच्या हाती लागलेली आहे.

 

'एस रेमिडिस'च्या कारखान्यावर अन्न व प्रशासन विभागाने धाड टाकली. या धाडीमध्ये त्यांना बनावट औषधे आढळून आली. विशेष म्हणजे औषधे बनविताना सक्षम अथवा तज्ज्ञ व्यक्ती उपस्थित नव्हती, अशीही नोंद अन्न व प्रशासन विभागाने यावेळी केली आहे.

 

जगदीश का. काशिकर,

कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

 

सहकार्य:*उन्मेष गुजराथी*

*स्प्राऊट्स ब्रँड स्टोरी*

ताज्या बातम्या

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

पश्चिम-महाराष्ट्रतील बातम्या

*राज्यात १९ फेब्रुवारीला शिवजयंती उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात साजरी होणार*

*सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र* मुंबई, दिनांक १३: छत्रपती...

*सुप्रसिद्ध मेडीसन पीआर मिडीया एजन्सी बाबत जगदिश काशिकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतरांना नोकरी वाचविण्याबाबत निवेदन व स्मरणपत्र* *कामगार आयुकत यांच्या पर्यत आपली समस्या पोहचवण्यासाठी व न्यायासाठी सुप्रसिद्ध समाजसेवक, वकील व वोचडोग फाऊंडेशन चे ट्रस्टी श्री गोडफ्रे पिमेंटा यांची घेतली कायदेशिर मदत* *दिल्ली कामगार मंत्री कार्यालयातुन या प्रकरणाबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आदेश महाराष्ट्र कामगार आयुकत यांना देण्यात आले आहेत*

भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरमुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व...

ब्राह्मण पुरोहिताची जागा बहुजन पुरोहितांना द्या! मराठा सेवा संघ संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर

भारतीय वार्ता : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राजघराण्यातील वर्तमानातील युवराज्ञी संयोगिता राजे संभाजी...