Home / महाराष्ट्र / पश्चिम-महाराष्ट्र / 'अब कि बार ८०-९० नाही...

महाराष्ट्र    |    पश्चिम-महाराष्ट्र

'अब कि बार ८०-९० नाही तर शंभर पार' भाईंदरमध्ये आ. प्रविण दरेकरांनी दिला नारा

'अब कि बार ८०-९० नाही तर शंभर पार'  भाईंदरमध्ये आ. प्रविण दरेकरांनी दिला नारा

 

 

जगदीश का. काशिकर,

कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

 

मीरा-भाईंदर - भाईंदर पूर्व येथील भाजप महिला मोर्चा मंडळाच्या जनसंपर्क कार्यालयाचे विधान परिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांच्या शुभ हस्ते उदघाटन नुकतेच पार पडले. यावेळी आमदार दरेकर यांनी मीरा-भाईंदरमध्ये 'अब कि बार ८०-९० नाही तर शंभर पार', असा नारा दिला. तसेच दरेकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधकांवरही यावेळी जोरदार हल्लाबोल चढवला. या कार्यक्रमाला भाजप महाराष्ट्र सचिव अॅड. अखिलेश चौबे, आमदार गीता जैन, ठाणे विभाग संघटन मंत्री हेमंत म्हात्रे, जिल्हाध्यक्ष  अॅड. रवी व्यास, महिला जिल्हा अध्यक्षा रीना मेहता, मंडळ अध्यक्षा शिखा भटेवडा आदी उपस्थित होते.

 

यावेळी बोलताना दरेकर म्हणाले की, गुजरातमध्ये भारतीय जनता पार्टीने १८२ पैकी १५० हुन अधिक जागा जिंकल्या. मीरा-भाईंदर तर भाजपचा बालेकिल्ला आहे. गुजरातमध्ये मी प्रचारासाठी गेलो होतो. सुरतच्या लिम्बायत विधानसभा क्षेत्राची जबाबदारी माझ्यावर होती. तेव्हा प्रचारावेळी समोर कोणी प्रतिस्पर्धीच दिसत नव्हता. राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी आमची आमदारांची बैठक घेतली तेव्हा ते म्हणाले तुम्हाला वाटत असेल समोर कुणीच प्रतिस्पर्धी नाही. जेव्हा समोर प्रतिस्पर्धी नसतो तेव्हा आपण ताकदीने काम करत नाही. तुम्ही समजा कोणीतरी ताकदवान प्रतिस्पर्धी समोर आहे. आपली लढाई आहे ती लढायची आहे. अशीच परिस्थिती येथेही आहे. मीरा-भाईंदरमधील विकास भारतीय जनता पार्टीच करू शकते आणि तो करूनही दाखवला आहे. या शहराला विकास कुणी दाखवला असेल तर तो देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना.  ते मुख्यमंत्री असताना जेवढा विकास मीरा-भाईंदरचा झाला तेवढा याआधी कधीही झाला नाही. विकास, निधी, पैसा, प्रोजेक्ट जे काही आले ते देवेंद्रजींच्या व्हिजनमुळे. आज एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत व देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत. नगरविकास खाते शिंदे यांच्याकडे आहे तर अर्थमंत्री खाते देवेंद्रजींकडे आहे. मुख्यमंत्री आपले, नगरविकास खाते आपले , पैसे देणारे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. मग विकास कोण करणार? आपणच ना? महानगरपालिका आपली आहे. येणाऱ्या निवडणुकीत महापालिकाही आपलीच राहील. तेव्हा भारतीय जनता पक्षाचा लोकांसोबतचा जो संपर्क आहे तो कमी नाही झाला पाहिजे. आपली मेहनत कामी येणार असा विश्वासही दरेकर यांनी उपस्थितांना दिला.

 

ते पुढे म्हणाले की, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी २४ तास काम करून देशाच्या विकासाचा विचार करत आहेत. माझा देश जागितक स्तरावर प्रगती कशी करेल, देशाचे नाव कसे मोठे होईल, याचा २४ तास विचार करणारे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. देवेंद्र फडणवीसही २४ तास काम करतात. आम्ही जेव्हा काम करुन थकतो त्यावेळेस या दोन लोकांना डोळ्यांसमोर आणतो. त्यांना राज्याला, देशाला बदलायचे आहे. त्यामुळे ते काम करतात तर आपल्यालाही काम करायचे आहे. कोण काय बनणार हे महत्वाचे नाही तर सत्तेच्या माध्यमातून या शहराला बदलायचे आहे. या देशात जेव्हा सोनिया गांधी यांच्या काँग्रेसची सत्ता होती त्यावेळेस देशाची हालत काय होती. आज देश ज्या गतीने प्रगती करतोय ते पाहिले तर ५० ते ६० वर्षात जे  झाले नाही ते मोदीजींनी ७ ते ८ वर्षात करुन दाखवले आहे. पंतप्रधान मोदीजी एकट्याने हे करु शकत नाहीत. तर ते आपलेही काम आहे. नगरसेवकांनी तेथील लोकांच्या सोयी-सुविधांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. लोकांच्या सुख-दुःखात सहभागी झाले पाहिजे. तरच अपण भाजपाचे कार्यकर्ते म्हणवून घेऊ, असेही दरेकर म्हणाले.

 

यावेळी उध्दव ठाकरे यांनी सीमाप्रश्नावरून पंतप्रधान मोदींच्या समृध्दी महामार्ग उद्घाटनावर केलेल्या टीकेला प्रत्यूत्तर देत दरेकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तर पालक असल्याची भूमिका निभावत आहेत. तुम्ही बालक म्हणून बालिशपणा करत आहात. जो कर्नाटक - महाराष्ट्र सीमावाद प्रश्न आहे त्यावर बोलत आहात. मात्र मोदीजी या जगाला एकत्र करण्यासाठी निघाले अहेत. जी-२० परिषद काय अहे. संपूर्ण जगाला मुंबईत आणण्याचा प्रयत्न मोदीजी करत आहेत. 'वसुदैव कुटुंबकम' हे स्लोगन आहे. आमचे पंतप्रधान पूर्ण जगाला एक करु पाहताहेत. तुम्ही कर्नाटक-महाराष्ट्राचे काय सांगता. मोदीजीच हा विषय सोडवणार, असेही दरेकर यांनी सांगितले. तसेच राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व आहे. त्यामुळे विकासाची चिंता करण्याचे काम नाही. जेवढा निधी मीरा-भाईंदरसाठी लागेल तेवढा निधी दिला जाईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदींना आदर्श मानून आपण काम करतो. तेव्हा या कार्यालयात जो कुणी बसेल तो मोदींचा, फडणवीसांचा प्रतिनिधी असेल या भावनेतून काम करायचे आहे. येणारे दिवस आपले आहेत. आपापसातील मतभेद बाजूला ठेवून पक्ष वाढीवर भर द्या. लोकांची कामे करा. अब की बार ८०-९० नाही तर १०० पार अशा प्रकारे काम करायचे आहे, असेही दरेकर यांनी यावेळी सांगितले.

 

चौकट

 

...तर भाजपाही जशास तसे उत्तर देईल

राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील याच्यावर झालेल्या शाईफेक प्रकरणी आ. दरेकर यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. ते म्हणाले कि, चंद्रकांत दादांचा स्वभाव पूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. शांत-संयमी स्वभावाच्या दादांनी नेते, प्रदेशाध्यक्ष, मंत्री पदावर काम केले आहे. कधी बोलण्यातून चूक होते. तेव्हा दादांनी तात्काळ अहंकार न बाळगता माफी, दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यानंतरही शाई फेकण्याचे काम केले. आता पुन्हा जर असा प्रयत्न कराल तर भाजपाही जशास तास जवाब देईल. आमची सहनशीलता, चांगलेपणाचा कोणी दुरुपयोग करेल तर भाजप सहन करणार नाही. व्याजासकट करार जवाब दिला जाईल, असा इशाराही दरेकर यांनी दिला.

ताज्या बातम्या

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

पश्चिम-महाराष्ट्रतील बातम्या

*राज्यात १९ फेब्रुवारीला शिवजयंती उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात साजरी होणार*

*सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र* मुंबई, दिनांक १३: छत्रपती...

*सुप्रसिद्ध मेडीसन पीआर मिडीया एजन्सी बाबत जगदिश काशिकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतरांना नोकरी वाचविण्याबाबत निवेदन व स्मरणपत्र* *कामगार आयुकत यांच्या पर्यत आपली समस्या पोहचवण्यासाठी व न्यायासाठी सुप्रसिद्ध समाजसेवक, वकील व वोचडोग फाऊंडेशन चे ट्रस्टी श्री गोडफ्रे पिमेंटा यांची घेतली कायदेशिर मदत* *दिल्ली कामगार मंत्री कार्यालयातुन या प्रकरणाबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आदेश महाराष्ट्र कामगार आयुकत यांना देण्यात आले आहेत*

भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरमुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व...

ब्राह्मण पुरोहिताची जागा बहुजन पुरोहितांना द्या! मराठा सेवा संघ संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर

भारतीय वार्ता : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राजघराण्यातील वर्तमानातील युवराज्ञी संयोगिता राजे संभाजी...