वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
Reg No. MH-36-0010493
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
मुंबई: मुंबई शहर तसेच उपनगर सुंदर आणि सुशोभित करण्यासाठी साकारण्यात येणाऱ्या एकूण ५०० विकासकामांपैकी १८७ विविध विकासकांमांचा शुभारंभ सोहळा मा. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज (गुरवार) मोठ्या उत्साहात संपन्न झाला. येत्या काही वर्षांत स्वच्छ आणि सुंदर मुंबई शहर आपल्याला नक्की पहायला मिळेल असा विश्वास याप्रसंगी बोलताना त्यांनी व्यक्त केला. यासमयी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित होते.
प्रत्येकाच्या स्वप्नाला बळ देणारे शहर हे मुंबई महानगरीचे वैशिष्ट्य आहे. हेच शहर आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर व्हावे, यासाठी यात अनेक बदल करणे ही काळाची गरज बनली आहे. त्यानुसार टप्प्याटप्प्याने शॉर्ट टर्म, मिडीयम टर्म आणि लॉंग टर्म अशी अनेक कामे हातात घेण्याचे निश्चित करण्यात आल्याचे यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.
मुंबईच्या सौंदर्यीकरण तसेच सुशोभीकरणासाठी करण्यात येणाऱ्या एकूण ५०० विकासकामांपैकी पहिल्या टप्प्यात १८७ कामे करण्यात येणार असून त्यामाध्यमातून शहरात उत्तम दर्जेदार रस्ते, सगळीकडे स्वच्छता, स्वच्छ समुद्रकिनारे, स्वच्छ आणि चांगली शौचालये बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासोबत ५००० स्वच्छतादूत तैनात करून हे शहर सुंदर आणि स्वच्छ ठेवण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
मुंबईचे सुशोभीकरण करताना झोपडपट्ट्यांमधील रस्ते, दिवाबत्ती, चांगली शौचालये उभारून ती नियमितपणे स्वच्छ ठेवण्यात येणार असून त्या माध्यमातून हे शहर एक सुंदर व सुनियोजित शहर म्हणून नावारूपाला यावे यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
याप्रसंगी विधानसभेचे अध्यक्ष ऍड.राहूल नार्वेकर, शालेय शिक्षणमंत्री तथा मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर, पर्यटन, महिला आणि बालविकास मंत्री तसेच मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार आशिष शेलार, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त ईकबालसिंह चहल, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ.आशिष सिंह, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी.वेलारासु उपस्थित होते.
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...