आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
"भारतीय वार्ता
( बदलापूर प्रतिनिधी)
संविधानाची माहिती सर्वाना व्हावी,त्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी म्हाडा वसाहत सेवा संस्था आयोजित 26 नोव्हेंबर हा भारतीय संविधान दिन सोहळा म्हाडा वसाहत कॉलनी , गार्डन शेजारी , बदलापूर ( पूर्व) येथे सायंकाळी प्रमुख मार्गदर्शक सेवानिवृत्त केंद्र अधिकारी डॉ.त्र्यंबक दुनबळे आणि प्रमुख मार्गदर्शक वक्ते कवी लेखक कायद्याचे अभ्यासक नवनाथ रणखांबे यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .
कार्यक्रमाची प्रस्तावना करीत असताना उद्योजक सुभाष खैरनार म्हणाले " आम्ही भारतीय लोक, ! असं आपण म्हणतो तर आपले संविधान दिन साजरा करणे हे आपले कर्तव्य आहे. म्हणून आम्ही संविधान दिन आज साजरा करीत आहोत.
विचारवंत अभ्यासक यांचे उपस्थितांना मार्गदर्शन होने महत्त्वाचे आहे म्हणून बुद्धिजीवी वक्ते यांचे मार्गदर्शनाचे आयोजन आज केले आहे. आमची संस्था समाजामध्ये वैज्ञानिक आणि आधुनिक दृष्टीकोन निर्माण करण्यासाठी असे उपक्रम नेहमीच घेत असतो. कार्यक्रमात तरुणांना संधी देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. आम्ही वर्षेभर सगळे राष्ट्रीय सण आणि महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करीत असतो. डॉ . बाबासाहेबांचा जीवनपटाचा उपक्रम दर आठवड्याला वंदना सूत्र पठन करून घेतो."
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख मार्गदर्शक यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर संविधान प्रास्ताविकाचे सामूहिक वाचन करण्यात आले. प्रमुख वक्ते यांचा परिचय देऊन उद्योजक सुभाष खैरनार आणि गौतम बचुटे यांच्या हस्ते संविधान प्रास्ताविकाचा मोमेंटो आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
डॉ.त्र्यंबक दुनबळे यांनी भारतीय संविधानातील मूलभूत हक्क आणि कर्तव्य याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले . कवी लेखक कायद्याचे अभ्यासक नवनाथ रणखांबे यांनी संविधान दिन कधी पासून साजरा केला जातो ? संविधान दिन का साजरा केला पाहिजे ? याचे महत्त्व सांगून संविधान आणि संविधानावर आधारित कार्यप्रणालीवर मोलाचे मार्गदर्शन केले.
" भारताचा कारभार हा संविधानावर चालतो. डॉ. बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत संविधानातील उद्देशिकामध्ये आहे. संविधान मूल्ये ही क्रांतिकारी आहेत. संविधानामुळे भारतातील सर्व संस्थाने खालसा झाली. भारतातून राजेशाहीचा / हुकूमशाहीचा अंत झाला. भारत हा एक संघ झाला . भारतात लोकशाही आली. संविधान हे डोक्यावर घेऊन मिरवायचे नाही तर डोक्यात घेऊन मिरवायचे आहे." असे यावेळी नवनाथ रणखांबे यांनी मार्गदर्शन करताना आपले मत व्यक्त केले.
यावेळी बहुसंख्येने म्हाडा वसाहत - बदलापूर नागरिक उपस्थितत होते. उद्योजक सुभाष खैरनार , गौतम बचुटे, अशोक गोरे , संदीप कांबळे म्हाडा वसाहत सेवा संस्था यांनी या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष खैरनार यांनी केले तर आभार गौतम बचुटे यांनी मानले.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र* मुंबई, दिनांक १३: छत्रपती...
भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरमुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व...
भारतीय वार्ता : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राजघराण्यातील वर्तमानातील युवराज्ञी संयोगिता राजे संभाजी...