Home / महाराष्ट्र / पश्चिम-महाराष्ट्र / आसाम राज्याचे मुख्यमंत्री...

महाराष्ट्र    |    पश्चिम-महाराष्ट्र

आसाम राज्याचे मुख्यमंत्री डॉ.हिमंता बिस्वा सरमा यांनी आज गुवाहाटी येथे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली

आसाम राज्याचे मुख्यमंत्री डॉ.हिमंता बिस्वा सरमा यांनी आज गुवाहाटी येथे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली

भारतीय वार्ता :मुबंई 

 

जगदीश का. काशिकर,

कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

 

आसाम राज्याचे मुख्यमंत्री डॉ.हिमंता बिस्वा सरमा यांनी आज गुवाहाटी येथे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी त्यांच्यासह आसाम सरकारच्या मंत्रिमंडळातील त्यांचे सहा सहकारी मंत्रीदेखील उपस्थित होते.

 

आसाम आणि महाराष्ट्र राज्यातील उद्योग, व्यापार, दळणवळण, पर्यटन आणि परस्पर संबंध वृद्धिंगत व्हावेत तसेच महाराष्ट्रात आसाम भवन आणि आसाममध्ये महाराष्ट्र भवन उभारून दोन्ही राज्ये सांस्कृतिकदृष्ट्या अधिक जवळ यावीत याबाबत देखील या बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली.

 

महाराष्ट्रातून आलेल्या सर्व मंत्री, आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांसाठी आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या वतीने खास प्रीतीभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात खंबीरपणे साथ दिल्याबद्दल आसामचे मुख्यमंत्री तसेच त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचा यासमयी खास श्री गणेश मूर्ती देऊन मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी सन्मान करून त्यांचे आभार व्यक्त केले.

 

राज्याचे बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादा भुसे, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, समन्वयक आशिष कुलकर्णी, आसाम मंत्रिमंडळातील मंत्री केशव महंत, मंत्री चंद्रमोहन पतवाडी, मंत्री उरखाऊ गोडा ब्रम्हा, मंत्री रंजित कुमार दास, मंत्री डॉ रनुज पेगो, आसाम सरकारचे शिक्षण सल्लागार नानी गोपाल महंता, मंत्री जयंता मलना बरुआ तसेच बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मंत्री, आमदार, खासदार, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन. 23 November, 2024

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.

...

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

पश्चिम-महाराष्ट्रतील बातम्या

*राज्यात १९ फेब्रुवारीला शिवजयंती उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात साजरी होणार*

*सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र* मुंबई, दिनांक १३: छत्रपती...

*सुप्रसिद्ध मेडीसन पीआर मिडीया एजन्सी बाबत जगदिश काशिकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतरांना नोकरी वाचविण्याबाबत निवेदन व स्मरणपत्र* *कामगार आयुकत यांच्या पर्यत आपली समस्या पोहचवण्यासाठी व न्यायासाठी सुप्रसिद्ध समाजसेवक, वकील व वोचडोग फाऊंडेशन चे ट्रस्टी श्री गोडफ्रे पिमेंटा यांची घेतली कायदेशिर मदत* *दिल्ली कामगार मंत्री कार्यालयातुन या प्रकरणाबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आदेश महाराष्ट्र कामगार आयुकत यांना देण्यात आले आहेत*

भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरमुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व...

ब्राह्मण पुरोहिताची जागा बहुजन पुरोहितांना द्या! मराठा सेवा संघ संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर

भारतीय वार्ता : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राजघराण्यातील वर्तमानातील युवराज्ञी संयोगिता राजे संभाजी...