Home / महाराष्ट्र / कोकण / कराड येथे बाळासाहेबांची...

महाराष्ट्र    |    कोकण

कराड येथे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या जाहीर मेळाव्यात मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी विराट जनसमुदायाला संबोधित केले

कराड येथे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या जाहीर मेळाव्यात मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी विराट जनसमुदायाला संबोधित केले

भारतीय वार्ता 

 

जगदीश का. काशिकर,

कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

 

कराड: राज्यात युती सरकार अस्तित्वात आल्यानंतर शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. सगळे निकष बाजूला सारून बळीराजाला मदत करण्याची भूमिका घेतली आहे. अजूनही शासनाकडे पंचनामे येत असून त्यांनाही मदत करण्याचा आमचा प्रयत्न असेल असे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी   याप्रसंगी बोलताना स्पष्ट केले.

 

कराड शहरातील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी तात्काळ निधी मंजूर केला, कराड शहरातील विकासकामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही  मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी दिली. विकासासाठी शिंदे सरकार ५० नव्हे तर १०० खोके द्यायलाही तयार आहे असे निक्षून सांगितले.

 

हे सरकार पडेल असे वारंवार सांगितले जाते, हिंमत असेल तर हे सरकार पाडून दाखवा असे जाहीर आव्हान यासमयी बोलताना दिले. हिंदुत्वाच्या विचारांशी सत्तेसाठी गद्दारी करणार नाही असेही यावेळी बोलताना स्पष्ट केले.

 

आजच्या या सभेत दलित पँथरचे अध्यक्ष सुखदेव सोनावणे यांनी आपल्या समर्थकांसह बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष आणि कराडचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सिंह यादव यांनीही आपल्या बारा नगरसेवकांच्या साथीने बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.

 

याप्रसंगी राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार शहाजीबापू पाटील, आमदार महेश शिंदे, खंडाळ्याचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम जाधव, साताऱ्याचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव, साताऱ्याचे युवासेना जिल्हाध्यक्ष रणजित भोसले, उपजिल्हाप्रमुख अक्षय मोहिते, सातारा शहराचे शहरप्रमुख निलेश मोरे, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच कराडकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* 26 December, 2024

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी. 26 December, 2024

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी.

वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...

कोकणतील बातम्या

महिलांनी शैक्षणिक प्रवाहात यावे-प्रवीण काकडे

रत्नागिरी:महिलांनी शैक्षणिक क्षेत्रात येऊन आपल्या कुटुंबाची प्रगती करावी असे प्रतिपादन प्रवीण काकडे अध्यक्ष अहिल्यादेवी...

*जितके पॅनिक व्हाल तितके सायबर फ्रॉड मध्ये अडकत जाल - अॅड. चैतन्य भंडारी*

भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरकायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र....

*ऑनलाईन गेम चा सापळा धोका वेळीच ओळखा - अॅड. चैतन्य एम. भंडारी*

भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरकायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र....