Home / महाराष्ट्र / पश्चिम-महाराष्ट्र / *स्वातंत्र्यसैनिक कै.साथी...

महाराष्ट्र    |    पश्चिम-महाराष्ट्र

*स्वातंत्र्यसैनिक कै.साथी मनोहरपंत चिवटे आरोग्य पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार श्री.संदीप आचार्य यांना प्रदान* *मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण*

*स्वातंत्र्यसैनिक कै.साथी मनोहरपंत चिवटे आरोग्य पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार श्री.संदीप आचार्य यांना प्रदान*    *मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण*

भारतीय वार्ता 

 

जगदीश का. काशिकर

कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

 

पिंपरी चिंचवड: स्वातंत्र्यसैनिक कै. साथी मनोहरपंत चिवटे यांच्या स्मरणार्थ आरोग्य क्षेत्रात जनजागृती पर लिखाण करणाऱ्या पत्रकारांना देण्यात  येत असलेला यावर्षीचा मानाचा पुरस्कार दैनिक लोकसत्ता चे मुंबई प्रतिनिधी संदीप आचार्य यांना देण्यात आला.

 

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या शुभहस्ते शुभ हस्ते मराठी पत्रकार परिषदेच्या पिंपरी चिंचवड येथे आयोजित अधिवेशनात देण्यात आला. मानचिन्ह शाल श्रीफळ व 25000 रुपयांचा धनादेश या पुरस्काराचे स्वरूप होते.

 

यावेळी व्यासपीठावर खासदार श्रीरंग बारणे,आमदार महेश लांडगे,आमदार रोहित दादा पवार, आमदार आदिती तटकरे,  इलेक्ट्रॉनिक मीडियाचे अध्यक्ष विनोद जगदाळे, मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस एम देशमुख , पत्रकार रवी आंबेकर , समीर वावळणेकर आदीसह पत्रकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

 

संदीप आचार्य हे दैनिक लोकसत्ता मधून सातत्याने आरोग्य विषयक लेखन करून जनजागृती करत आहेत त्यांनी निर्माण केलेले आणि अनेक प्रकल्प आरोग्य खात्याने स्वीकारलेले आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचावी म्हणून त्यांनी केलेला रोड मॅप महाराष्ट्र शासनाने स्वीकारला आहे या सर्व त्यांच्या कामाची दखल घेऊन मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र राज्य यांनी त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे.

 

मराठी पत्रकार परिषदेचे जेष्ठ सदस्य श्री नरसिंह (अप्पा) चिवटे आणि करमाळा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री महेश चिवटे यांनी मराठी पत्रकार परिषदेला दिलेल्या निधीतून हा पुरस्कार दिला असल्याची माहिती अध्यक्ष श्री शरद पाबळे आणि श्री किरण नाईक यांनी दिली. यापुढे आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय पत्रकारिता करणाऱ्या एका पत्रकाराला दरवर्षी हा पुरस्कार दिला जाणार आहे.

 

या पुरस्कारानंतर बोलताना मुख्यमंत्री मा ना श्री एकनाथ शिंदे म्हणाले की संदीप आचार्य यांना गेली मी तीस-पस्तीस वर्षापासून ओळखत असून त्यांनी आरोग्य क्षेत्रात आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून जनजागृतीचे मोठे काम केले आहे. आज मराठी पत्रकार परिषदेने आरोग्य विषयावर लिखाण करणाऱ्यांना पुरस्कार देणे हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे.

 

यावेळी वैद्यकीय सहाय्यता मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीची माहिती विस्तृत दिली.

 

संदीप आचार्य

पुरस्कार प्राप्त पत्रकार,

 

आरोग्य क्षेत्रातील लिखाण अत्यंत महत्त्वाचे असून या लिखाणामुळे सर्वसामान्य अडचणीत असणाऱ्या रुग्णाला योग्य मार्गदर्शन सल्ला व मदत मिळते.

 

आजचा पुरस्कार खऱ्या अर्थाने रुग्णांसाठी जे संवेदनशील म्हणून ओळखले जातात अशा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते मला हा पुरस्कार मिळाला यामुळे या पुरस्काराचा माझा दृष्टीने मला वेगळा अभिमान आहे अशी प्रतिक्रिया दिली.

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

पश्चिम-महाराष्ट्रतील बातम्या

*राज्यात १९ फेब्रुवारीला शिवजयंती उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात साजरी होणार*

*सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र* मुंबई, दिनांक १३: छत्रपती...

*सुप्रसिद्ध मेडीसन पीआर मिडीया एजन्सी बाबत जगदिश काशिकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतरांना नोकरी वाचविण्याबाबत निवेदन व स्मरणपत्र* *कामगार आयुकत यांच्या पर्यत आपली समस्या पोहचवण्यासाठी व न्यायासाठी सुप्रसिद्ध समाजसेवक, वकील व वोचडोग फाऊंडेशन चे ट्रस्टी श्री गोडफ्रे पिमेंटा यांची घेतली कायदेशिर मदत* *दिल्ली कामगार मंत्री कार्यालयातुन या प्रकरणाबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आदेश महाराष्ट्र कामगार आयुकत यांना देण्यात आले आहेत*

भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरमुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व...

ब्राह्मण पुरोहिताची जागा बहुजन पुरोहितांना द्या! मराठा सेवा संघ संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर

भारतीय वार्ता : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राजघराण्यातील वर्तमानातील युवराज्ञी संयोगिता राजे संभाजी...