Home / महाराष्ट्र / पश्चिम-महाराष्ट्र / १० वर्षांनंतरही न्यायाच्या...

महाराष्ट्र    |    पश्चिम-महाराष्ट्र

१० वर्षांनंतरही न्यायाच्या प्रतीक्षेत चित्रपट कलावंत तक्रारदारालाच आरोपीला शोधण्यास पोलिसांनी सांगितले

१० वर्षांनंतरही न्यायाच्या प्रतीक्षेत चित्रपट कलावंत    तक्रारदारालाच आरोपीला शोधण्यास पोलिसांनी सांगितले

भारतीय वार्ता

 

स्प्राऊट्स Exclusive

 

मराठीतील नामवंत कलावंत मागील तब्बल १० वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. याबाबत न्यायालयाने पोलिसांना आरोपीला पकडण्याचे आदेश दिले. इतकेच नव्हे तर वॉरंटही काढले, मात्र पोलिस व आरोपी यांचे 'अर्थ'पूर्ण संबंध आहेत. त्यामुळेच आरोपी मोकाट फिरत आहेत व पोलीस मात्र तक्रारदार कलावंतालाच आरोपीला दाखवण्यास सांगत आहेत, अशी धक्कादायक माहिती 'स्प्राऊट्स'च्या हाती आलेली आहे.    

 

दिवंगत अभिनेते दादा कोंडके यांनी मराठी चित्रपटसृष्टीत नवा इतिहास रचला. त्यांच्या निधनानंतर डॉ. प्रमोद नलावडे यांनी त्यांचा वारसा पुढे नेला. ज्युनिअर दादा कोंडके म्हणून ते नावरूपाला आले. त्यांनी आतापर्यंत तब्बल २० हून अधिक चित्रपटात प्रमुख भूमिका केल्या आहेत.

 

नलावडे यांनी २०१० साली 'मी हायना तुमच्यासाठी' ( Mee Hayana Tumchyasathi ) या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटातील 'इलेक्ट्रॉनिक मीडिया'चे हक्क सत्यम व्हिडीओ एंटरटेनमेंट या कंपनीने घेतले. या कंपनीचे मालक नंदकुमार गणपत विचारे यांनी या हक्काचे मानधन म्हणून नलावडे यांना चार धनादेश दिले. यातील आगाऊ रकमेचा चेक पास झाला. उरलेले तिन्ही चेक खात्यात बॅलन्स रक्कम नसल्यामुळे बाऊन्स झाले.

 

यानंतर नलावडे यांनी २०१३ साली बांद्रा कोर्टात धाव घेतली. कोर्टाने आरोपी विचारे यांना अनेक वेळेला नोटीस बजावल्या. त्यानंतर अटक वॉरंटही बजावले. मात्र वर्सोवा पोलिस आरोपीला पकडण्यास टाळाटाळ करीत आहेत, असे स्पष्ट दिसून येते. नलावडे यांनी आरोपी विचारे याचे घर, ऑफिसचा पत्ता, बँक डिटेल्स व इतरही यासंबंधित इत्यंभूत माहितीही दिली. मात्र हा आरोपी त्या पत्यावर असूनदेखील पोलिसांना सापडत नाही, याबाबत नलावडे यांनी सखेद आश्चर्य व्यक्त केले.

 

वर्सोवा पोलिसांना हा आरोपी मिळत नाही, म्हणून नलावडे यांनी मुंबई पोलीस कमिशनर यांच्याकडेही १९ जुलै २०१७ साली लेखी तक्रार केली होती. मात्र त्याची अद्यापही दाखल घेतलेली नाही. आजमितीस नलावडे या ज्येष्ठ कलावंताचे वय ७४ वर्षे आहे. न्यायासाठी ते मागील १० वर्षांपासून झगडत आहेत. मात्र अद्यापही आरोपी मोकाट फिरत असल्याने ते अधिकच चिंताग्रस्त आहेत.

 

जगदीश का. काशिकर,

कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

 

सहकार्य:*उन्मेष गुजराथी*

*स्प्राऊट्स ब्रँड स्टोरी*

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

पश्चिम-महाराष्ट्रतील बातम्या

*राज्यात १९ फेब्रुवारीला शिवजयंती उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात साजरी होणार*

*सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र* मुंबई, दिनांक १३: छत्रपती...

*सुप्रसिद्ध मेडीसन पीआर मिडीया एजन्सी बाबत जगदिश काशिकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतरांना नोकरी वाचविण्याबाबत निवेदन व स्मरणपत्र* *कामगार आयुकत यांच्या पर्यत आपली समस्या पोहचवण्यासाठी व न्यायासाठी सुप्रसिद्ध समाजसेवक, वकील व वोचडोग फाऊंडेशन चे ट्रस्टी श्री गोडफ्रे पिमेंटा यांची घेतली कायदेशिर मदत* *दिल्ली कामगार मंत्री कार्यालयातुन या प्रकरणाबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आदेश महाराष्ट्र कामगार आयुकत यांना देण्यात आले आहेत*

भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरमुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व...

ब्राह्मण पुरोहिताची जागा बहुजन पुरोहितांना द्या! मराठा सेवा संघ संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर

भारतीय वार्ता : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राजघराण्यातील वर्तमानातील युवराज्ञी संयोगिता राजे संभाजी...