Home / महाराष्ट्र / पश्चिम-महाराष्ट्र / केसरी टूर्सला ग्राहक...

महाराष्ट्र    |    पश्चिम-महाराष्ट्र

केसरी टूर्सला ग्राहक न्यायालयाचा दणका सहली साठी भरलेले 55 हजार शुल्क व्याज व नुकसान भरपाई सहित देण्याचे आदेश

केसरी टूर्सला ग्राहक न्यायालयाचा दणका    सहली साठी भरलेले 55 हजार  शुल्क व्याज व  नुकसान भरपाई सहित देण्याचे आदेश

भारतीय वार्ता 

 

स्प्राऊट्स ब्रँड स्टोरी

 

आजीचे निधन झाल्याने सहलीसाठी पैसे भरलेले असताना सहल रद्द करून पुढच्या सहलीसाठी ते पैसे उपयोगात आणायची विनंती ग्राहकाने करूनही न जुमानणाऱ्या ' केसरी टूर्स ' या  ट्रॅव्हल कंपनीने ग्राहकाला नुकसान भरपाई द्यावी, असा आदेश पुणे जिल्हा ग्राहक न्यायालयाने  दिला आहे. यासंदर्भात ग्राहक मंगेश ससाणे यांनी  वकिलांमार्फत ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल केली होती.

 

ग्राहकाने सहलीसाठी भरलेले 55 हजार  रुपये, ९ टक्के  व्याज व २० हजार  नुकसान भरपाई सहित देण्याचे आदेश ग्राहक न्यायालयाने केसरी टूर्स या ट्रॅव्हल कंपनीला दिले आहेत.

 

मंगेश ससाणे यांनी हनिमून साठी 55 हजार रुपये केसरी ट्रॅव्हल्स कडे जमा करून शिमला, कुलू, मनालीची सहल बुक केली होती. मात्र सहली पूर्वी आठ दिवस आधी त्यांच्या आजीचे निधन झाल्याने त्यांनी सहल कंपनीला त्याविषयी कळवले आणि बुकिंग ची रक्कम पुढील  ट्रीप साठी उपयोगात आणण्याची विनंती केली. मात्र, त्यानंतर सहल कंपनीने त्यांना पुढील कोणत्याही सहलीत बाबत कळवले नाही व सहलीत समाविष्ट पण न केल्याने आणि पैसेही परत न दिल्याने ससाणे यांनी ग्राहक न्यायालयात धाव घेतली.

 

या खटल्याचा निकाल लागून केसरी ट्रॅव्हल्स या सहल कंपनीला त्यांचे ग्राहक ससाणे यांना व्याजासहित नुकसान भरपाई देण्याचा आदेश पुणे जिल्हा ग्राहक मंचांनी दिला. हा आदेश अध्यक्ष उमेश जवळीकर, सदस्य क्षितिजा कुलकर्णी, सदस्य संगीता देशमुख यांच्या मंचाने दिला. ससाणे यांच्या वतीने अॅड. स्मिता माने, अॅड. प्रियांका मानकर  यांनी काम पाहिले. मंगेश ससाणे यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली.

 

जगदीश का. काशिकर,

कायदा (लॉ) / सुरक्षा सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

 

सहकार्य:*उन्मेष गुजराथी*

*स्प्राऊट्स ब्रँड स्टोरी*

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

पश्चिम-महाराष्ट्रतील बातम्या

*राज्यात १९ फेब्रुवारीला शिवजयंती उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात साजरी होणार*

*सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र* मुंबई, दिनांक १३: छत्रपती...

*सुप्रसिद्ध मेडीसन पीआर मिडीया एजन्सी बाबत जगदिश काशिकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतरांना नोकरी वाचविण्याबाबत निवेदन व स्मरणपत्र* *कामगार आयुकत यांच्या पर्यत आपली समस्या पोहचवण्यासाठी व न्यायासाठी सुप्रसिद्ध समाजसेवक, वकील व वोचडोग फाऊंडेशन चे ट्रस्टी श्री गोडफ्रे पिमेंटा यांची घेतली कायदेशिर मदत* *दिल्ली कामगार मंत्री कार्यालयातुन या प्रकरणाबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आदेश महाराष्ट्र कामगार आयुकत यांना देण्यात आले आहेत*

भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरमुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व...

ब्राह्मण पुरोहिताची जागा बहुजन पुरोहितांना द्या! मराठा सेवा संघ संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर

भारतीय वार्ता : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राजघराण्यातील वर्तमानातील युवराज्ञी संयोगिता राजे संभाजी...