Home / महाराष्ट्र / खानदेश / ओटीपी द्वारे रचलेला...

महाराष्ट्र    |    खानदेश

ओटीपी द्वारे रचलेला नवीन सापळा सायबरच्या या फ्रॉड पासून सावध व्हा.... ऍड. चैतन्य भंडारी यांचा सावधानतेचा ईशारा ....

ओटीपी द्वारे रचलेला नवीन सापळा  सायबरच्या या फ्रॉड पासून सावध व्हा....  ऍड. चैतन्य भंडारी यांचा सावधानतेचा ईशारा ....

 

 

जगदीश का. काशिकर,

कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

 

मुबंई: बँकिंग व्यवहार संदर्भात आपल्याला आलेला ओटीपी, आपला पिन नम्बर, आपला अकाउंट नंबर, कुणालाही अपरिचित लोकांना देऊ नका. हे बँकांनी सर्वाना सांगून सावध केलं आहे. लोकही त्याबाबत सावध झालेत. त्यामुळे आता फसण्याचे ते प्रमाण बरेच कमी झाले आहे. हि समाधानाची बाब आहे.

 

मात्र हीच गोष्ट असे फ्रॉड करणाऱ्या हॅकर मंडळींनी देखील ओळखून आता नवीन पद्धत आणली आहे. हा नवीन सापळा आहे. तो नीट समजून घ्या आणि सावध व्हा !

 

हा सापळा नेमका कसा आहे ?

 

तुमच्या दाराची बेल वाजते. तुम्ही दार उघडता. समोर एक स्मार्ट व बोलघेवडा डिलिव्हरी बॉय उभा असतो. तो म्हणतो, "तुमचं एक पार्सल आहे. कॅश ऑन डिलेव्हरी आहे. तर हे पार्सल घ्या आणि पैसे द्या"

 

तुम्ही तर कसलीच ऑर्डर केलेली नसते. तरी घरच्यांनी परस्पर केली असेल म्हणून घरच्यांना विचारता. घरचेही म्हणतात की त्यांनी काहीच ऑर्डर केली नाही. मग तुम्ही त्या डिलिव्हरी बॉय ला सांगता, "आम्ही ऑर्डर केली नाहीय. परत घेऊन जा"

त्यावर तो बॉय म्हणतो, "ओके, हरकत नाही. फक्त तुम्हाला ऑनलाईन कॅन्सलेशन करावं लागेल. त्यासाठी आमचा एक मेसेज येईल व त्यात ओटीपी असेल. तो सांगा मला. मी मग ऑर्डर कॅन्सल करतो. पण लवकर करा कारण हा ओटीपी दहा सेकंदच ऍक्टिव्ह राहणार आहे" (आणि एक लक्षात घ्या, हे डिलिव्हरी बॉय जे असतात न ते हॅकर मंडळींकडून चांगल्या प्रकारे ट्रेनिंग घेऊन आलेले असतात. संवाद कौशल्य इतकं खात्रीपूर्वक असत की तुम्ही जणू हिप्नोटाईज होता) आणि तुमच्या मोबाईलवर एक टेक्स्ट मेसेज येतो आणि शेवटी ओटीपी येतो.

 

तुम्ही नीट ऑब्जर्व करत असाल तर आठवून पहा अधिकृत ट्रॅन्जेक्शन करताना सुद्धा टेक्स्ट मेसेज विथ ओटीपी येतो तेव्हा टेक्स्ट मेसेज सेकंदभरच दिसतो आणि हाईड (शॉर्ट) होऊन फक्त ओटीपी तेव्हडा ठळक दिसतो.

 

तुम्ही जर त्या ओटीपी ला क्लिक केलं तरच तो टेक्स्ट मेसेज पुन्हा ओपन होऊन नीट वाचता येतो. पण ९९% लोक ते करत नाहीत. त्यात परत त्या डिलिव्हरी बॉय ची घाई सुरु झालेली असते. त्यामुळे तुम्ही लगेच त्याला ओटीपी देऊन मोकळे होता. कारण तुम्हाला तुम्ही ऑर्डर न केलेलं पार्सल परत कधी एकदा जाईल याची काळजी लागलेली असते. त्या नादात तुम्ही तो टेक्स्ट मेसेज नीट वाचत नाही. आणि तिथंच फसता. आणि मग समोरचा बॉय तुमचा ओटीपी त्याच्या मोबाईलवर घेतो आणि सांगतो की, "ऑर्डर कॅन्सल झाली आहे. थँक्स." असं म्हणत तो निघून जातो अन तुम्ही रिलॅक्स होता.

मात्र थोड्याच वेळात तुमच्या बँकेतर्फे डेबीटेड चा मेसेज येतो आणि तुमच्या लक्षात येत की तुमचं अकाउंट पूर्ण रिकामं झालं आहे. तुमच्यावर आभाळच कोसळते.

 

हाच तो नवीन सापळा आहे.

 

आता यात काहीजणांना काही शंका पडू शकतात की माझ्या  बँकेचे डिटेल्स हॅकर ला कसे माहित ? कारण त्याशिवाय तर माझे खाते हॅकर रिकामं करू शकत नाही न ?

 

तर

 

१) मागे कधीतरी केवायसी च्या नावाखाली "मी बँकेतून केवायसी डिपार्टमेंट कडून बोलतोय" असं म्हणत आलेला कॉल व त्यातून त्याला तुम्ही दिलेली माहिती हि त्या हॅकर च्या हाती पडते. कारण बँक कधीच असा कॉल वर माहिती मागवत नसते.

 

२) एटीएम मध्ये पैसे काढायला गेल्यावर पैसे काढून झाल्यावर "रिसीट हवी की नको" हे ऑप्शन येते, तिथं "हवी आहे " म्हटलं तर रिसीट येते. अनेकजण ती रिसीट फक्त वाचतात आणि तिथेच टाकून देतात. वाईन शॉप मधेही कार्ड पेमेंट केले तर तो रिसीट देतो ती रिसीट अनेकजण तिथेच टाकून देतात. हॅकर ची लोक अशा ठिकाणच्या जवळच लक्ष ठेवून असतात.  ते ती रिसीट ताब्यात घेऊन त्यातून तुमचं खाते नंबर प्लस शिल्लक किती आहे हे सगळं माहित करून घेतात.

 

अशाच इतर काही मार्गाने तुमच्या बँकेचे डिटेल्स हॅकर लोक मिळवून तुम्हाला जाळ्यात ओढतात. आणि तुमचं खातं रिकामं करतात.

यावर उपाय काय ?

 

तर अशा कोणत्याही न मागवलेल्या पार्सल च्या वेळी त्या बॉय ने काहीही सांगू दे. त्याच्या हिप्नोटाईज प्रकारच्या बोलण्यात अडकू नका. त्याला सरळ सांगा. "मी काही ओटीपी देणार नाही निघून जा नाहीतर मी पोलिसांना बोलावेन"

 

तुम्ही हे बिनधास्त बोलू शकता कारण तुम्ही काही केलंच नाही तर घाबरता कशाला ?

 

मग पहा.... तो क्षणभरहि थांबणार नाही. पळून जाईल !

 

काळजी घ्या व हि माहिती तुमच्या घरच्यांनाही सांगून ठेवा, मित्रमंडळींना सांगा. जागे राहा. सावध व्हा !

ताज्या बातम्या

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* 26 December, 2024

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी. 26 December, 2024

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी.

वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा*    *पीडित कुटुंबीयांनी केली मागणी* 26 December, 2024

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी केली मागणी*

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी...

खानदेशतील बातम्या

*मणिपूर महिला अत्याचार प्रकरणातील दोषींवर कडक कायदेशीर कारवाई बाबत फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनॅलिस्ट असोसिएशनचे (फिरा) राष्ट्रपतींना निवेदन...*

*मणिपूर महिला अत्याचार प्रकरणातील दोषींवर कडक कायदेशीर कारवाई बाबत फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनॅलिस्ट असोसिएशनचे (फिरा)...

*बिटको महाविद्यालयातील प्रा डॉ सुदेश घोडेराव यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अभ्यासमंडळाच्या सदस्यपदी निवड*

*बिटको महाविद्यालयातील प्रा डॉ सुदेश घोडेराव यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अभ्यासमंडळाच्या...