Home / महाराष्ट्र / मराठवाडा / *शब्द सुमनांजली..!!*...

महाराष्ट्र    |    मराठवाडा

*शब्द सुमनांजली..!!*

*शब्द सुमनांजली..!!*

भारतीय वार्ता

 

         ‘आई हे एक नाव असतं

        ते एक गजबजलेलं गाव असतं’

 

असं प्रसिध्द कवी फ.मु.शिंदे म्हणतात. आई ही सतत घराच्या सागरकिनाऱ्यावर घट्ट पाय रोवून उभी असते. घर एक नाव (boat) असते. ती सतत विविध कारणांनी डगमगत असते. पण त्याला बीळ पडू नये व पाणी आत येऊन ती बुडू नये म्हणून ती सागरातील दगडधोंडे जशी काही सतत काढत असते. ती शांत, संयमी राहून आपले घर हे कधीही विखुरणार नाही, विस्कळीत होणार नाही यासाठी दक्ष असते. प्रसंगी बापलेकांमधला दुवाही ती होते..सून आली तर तिच्याही कलाने घ्यायचाही ती प्रयत्न करते. पतीची साथ दुर्दैवाने लवकर सुटली तर मात्र ती सैरभैर होते. पण मुलांकडे पाहून सावरते. मुलं मोठी करण्यासाठी वाट्टेल ते कष्ट उचलते.  आई कितीही कर्तृत्ववान असली तरी तिला जोडीदार हा सक्षम, समजूतदार व कर्तबगार हवा असतो. तरच ती आपले कर्तृत्व दाखवू शकते. बाईला नवरा हवा व तो चांगला हवा असे नेहमी म्हटले जाते. नाहीतर आयुष्याची अनेक गणिते चुकतात. हे वास्तव नाकारतां येणार नाही.

    माझ्या सासूबाई सरस्वती मोळक, सारे तिला सरसाबाई म्हणत. अतिशय हुशार व प्रामाणिक अशी स्त्री. अतिशय कष्टाने व नेटाने काहीही कळत नसलेल्या साध्या भोळ्या अशा पतीशी संसार केला. चार मुले झाली. त्यांचे शिक्षण व संगोपन एकटीने केले. नवरा होता म्हणून तिला ‘एकल पालक’ नाही म्हणता येणार पण परिस्थिती तशीच होती. काहीही व्यावहारिक समज नसलेल्या पतीबरोबर सुमारे ५८ वर्ष संसार झाला. वयाच्या ९ व्या वर्षी फसवून झालेले लग्न. नवरा २०/२२ वर्षाचा. घरची गरीबी. चार बहिणी व तीन भाऊ. चुलत्याने सारे माहीत असून लग्न लावून दिले. दाखवला एक मुलगा व बोहल्यावर दुसराच उभा असं त्या नेहमी आठवणीच्या खपल्या काढायच्या. अगदी परवा परवा पर्यंत. तेव्हा जाणवलं, बाईचे दुःख, खंत, इच्छा,आकांक्षा, अपेक्षा अगदी छोट्या असतात पण ती काही गोष्टी शेवटपर्यंत विसरू शकत नाही.

     लग्नानंतर दोन वर्षांनी संसार सुरू झाला. कळायचे वय नव्हतेच. सासू व मोठी जाऊ जसे सांगत तसे सरसा वागत होती. दोन वर्षाला एक अशी तीन मुले व एक मुलगी झाली. हातातोंडाची गाठ पडणे मुश्कील होते. दादा दुसऱ्यांची गुरं वळायला जात होते व आई दुसऱ्याच्या शेतात काबाडकष्ट करत होती. स्वत:चे असे काहीच

नव्हते. महिन्याला १५०- २००/- रू. मिळायचे. त्यात काय भागणार..?

      गावचे सरपंच व सरकारी शेतीच्या साहेबाच्या हातापाया पडून आईंनी दादांना  ‘शेतमजूर’ म्हणून नोकरी मिळवली. गावातील प्रतिष्ठितांनी व नातेवाईकांनीही काही मदत केली. आणि जरा बरं चालू लागलं. पगार घ्यायला मात्र आईच जात होती. दादांना व्यवहारज्ञान काहीही नव्हते. फक्त शेतातील सारी काम प्रामाणिकपणे करणे एवढेच त्यांना माहीत होते.

     चारही मुलं शिकत होती. १० वी पर्यंत कशीबशी शिकून धाकट्या दोघांनी शाळा सोडून दिली.  मोळक साहेब इंजिनिअर ते अतिरिक्त आयुक्त पदावर गेले. आईबापामुळे आपले चांगले झाले असे सतत मनाशी म्हणत आईबापाविषयी कृतज्ञ राहिले. भावांना सतत मदतीचा हात दिला. त्यांना आयुष्याच्या संध्याकाळी आपल्या घरी रहायला आणले. उर्वरित आयुष्य चांगले  व आनंदाने जावे यासाठी प्रयत्न केला.

      दोन्ही मुलांचा संसार मात्र अर्धवट राहिला. दोघांचाही वयाच्या ३० व ५० व्या वर्षी अकाली मृत्यू झाला. दोन तरूण मुलांचा मृत्यू पहाणे आईला किती कठीण असते पण तिने ते पचवले. पतीचाही वयाच्या ८० व्या वर्षी वार्धक्याने मृत्यू झाला. पतीनिधनानंतर मात्र ती सैरभैर झाली. आता तिचे कामच संपले होते. आयुष्य त्याच्या मागे फिरत घालवले होते. आता काय करायचे तिला प्रश्न पडला. ती मुक्त व मोकळी झाली होती. बसचा पास काढून दिवसभर आळंदी- देहू-वाकड असा प्रवास करू लागली. देवाचे तिला तसे पहिल्यापासूनच वेड. पण कधी मनासारखे जगणे जमलेच नव्हते. आता ती देव देव करू लागली. तिचे शिक्षण त्यावेळचे चौथी. त्यामुळे थोडे फार लिहिता वाचता येत होतं.. देवाचा हरिपाठ, अभंग गात ती वेळ घालवू लागली.

    एकूण तिची चरित्रगाथा म्हणजे आयुष्याची एक विचित्र चित्तरकथा आहे.  तिची कहाणी  'खिरपीट' नावाने प्रसिध्द केली आहे. व बापाचीही गोष्ट ‘बापाची बात’ लिहून प्रकाशित केली आहे. आई ती आईच असते. पण काहीही झाले तरी आईने चुकायचे नसते. मुलांच्या चुकांवर कधीही पांघरूण घालायचे नसते व त्यांच्यावर आंधळेपणाने प्रेमही करायचे नसते.

     जसजसे वय होत गेले तसतसे शरीर थकत गेले. रोज देवपूजा करत, देवाचा धावा ती करत असे पण तिचे मन मात्र आजही गेलेल्या त्या वाईट दिवसांच्या, पतीच्या व मुलांच्या बऱ्या वाईट आठवणींमधे गुंतलेले होते. ती सुस्थितीत असूनही आयुष्यात घडलेल्या भरपूर वाईट गोष्टींमुळे ती जीवनाचा आनंद घेऊ शकली नाही. ‘पेला अर्धा भरलेला आहे की अर्धा सरलेला आहे.. जीवन कसे जगायचे कण्हत कण्हत की गाणं म्हणत’ हे तिला समजण्याच्या पलीकडे होते. तरूणवयात असलेला समजूतदारपणा वयामानाने लोप पावला. पण आई ही आईच असते. ‘आईसारखे दुसरे दैवत नाही. ती श्रमदेवता आहे. तिच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करायला हव्यात’ असे मानून कर्तव्यभावनेतून आम्ही सारं काही करत होतो.

   पण जन्म व मृत्यू आपल्या कोणाच्याच हाती नसतो. दोन महिन्याच्या आजारपणात सोमवार दि. १४ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ८.०० वा. त्यांची प्राणज्योत मालवली. आमचं गजबजलेलं गाव आता शांत झालंय. आता केवळ आठवणी. एक पिढी संपत चाललीय. पाया पडायचे पाय आता उरले नाहीत…. ????????

विनम्र अभिवादन ..!! भावपूर्ण श्रध्दांजली..!!! ????????????????

 

 

*ॲड. शैलजा मोळक*

9823627244

ताज्या बातम्या

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक. 19 December, 2024

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक.

वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना  न्याय. 18 December, 2024

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना न्याय.

वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...

मराठवाडातील बातम्या

धनगर समाजाच्या मुलांच्या हातामध्ये एसटीचे प्रमाणपत्र द्या ,अन्यथा धनगर समाज हा राज्य सरकारच्या विरोधात विधानसभा निवडणुकीला गेल्याशिवाय राहणार नाय

बीड :दि 19/09/2024 रोजी बीड येथे महाराष्ट्रातील धनगर जमातीसाठी असलेल्या अनुसूचित जमातीच्या( ST) आरक्षणाची अंमलबजावणी शिंदे...

निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला.

निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला. भारतीय वार्ताजिल्हा...

*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* *शहरात विजांचा कडकडाटाचा*

*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* शहरात विजांचा कडकडाटाचा ✍️उत्तम माने लातूर लातूर:- शहरासह ग्रामीण...