वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
डोंबिवली: डोंबिवली शहरातील शिवसेना मध्यवर्ती शाखेचे नूतनीकरण झाल्यानंतर आज मा. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी या शाखेला भेट दिली. यावेळी या शाखेची पाहणी करून उपस्थित डोंबिवलीकर नागरिकांशी संवाद साधला.
डोंबिवलीच्या मध्यवर्ती शाखेला मोठा इतिहास आहे. वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचा पदस्पर्श या शाखेला झालेला आहे. त्यामुळे आज राज्याचा मुख्यमंत्री म्हणून या शाखेला भेट देताना एक वेगळंच समाधान वाटत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
डोंबिवली शहरातील नागरिकांना उत्तम रस्ते मिळावेत यासाठी आज ४४५ कोटी रुपयांची रस्ते कामांचे भूमिपूजन केले असल्याचे यावेळी बोलताना स्पष्ट केले. तसेच शहरातील वाहतूक कोंडी कमी करून एक सुनियोजित शहर बनावे यासाठी हे सरकार शक्य ते सारे प्रयत्न करेल असे निक्षून सांगितले.
याप्रसंगी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र फाटक, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक आणि प्रवक्ते नरेश म्हस्के, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे, कल्याण उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, युवासेना राज्य कार्यकारिणी सदस्य दीपेश म्हात्रे, युवासेना ठाणे ग्रामीण प्रमुख प्रभूदास नाईक तसेच कल्याण डोंबिवली येथील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
*सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र* मुंबई, दिनांक १३: छत्रपती...
भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरमुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व...
भारतीय वार्ता : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राजघराण्यातील वर्तमानातील युवराज्ञी संयोगिता राजे संभाजी...