Home / महाराष्ट्र / पश्चिम-महाराष्ट्र / *बाळासाहेबांची शिवसेनेचे...

महाराष्ट्र    |    पश्चिम-महाराष्ट्र

*बाळासाहेबांची शिवसेनेचे प्रमुख नेते तथा महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथ शिंदे यांनी भंडारा येथे अभुतपूर्व जनसामान्य जनतेच्या विराट सभेला संबोधित केले*

*बाळासाहेबांची शिवसेनेचे प्रमुख नेते तथा महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथ शिंदे  यांनी भंडारा येथे अभुतपूर्व जनसामान्य जनतेच्या विराट सभेला संबोधित केले*

भारतीय वार्ता 

 

जगदीश का. काशिकर,

कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

 

भंडारा: खातरोल रेल्वे मैदान येथे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या संपन्न झालेल्या विराट सभेला मा. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी संबोधित केले. यावेळी भंडाऱ्यातील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी राज्यातील युती सरकार कटिबद्ध असल्याचे मा. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.

 

भंडारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यातील युती सरकार सकारात्मक असून जिल्ह्यातील विकास कामांसाठी आमच्या आमदाराला ५० नव्हे तर २०० खोके दिले असल्याचे याप्रसंगी निक्षून सांगितले. तसेच जिल्ह्यातील इतर प्रलंबित विकासकामे पूर्ण करण्यासाठी अजून १०९ कोटींची तरतूद प्रस्तावित असल्याचेही स्पष्ट केले. भंडारा जिल्ह्याला निसर्गाचे मोठे वरदान लाभले आहे त्या अनुषंगाने गोसिखुर्द येथे पर्यटनविषयक अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून आज त्याचा आढावा आपण स्वतः घेतल्याचे यासमयी बोलताना स्पष्ट केले.  जिल्ह्यातील काही विकासकामांचेही आज भूमिपूजन केले असून काहींचे लोकार्पण केले आहे. मात्र हा जिल्हा यापुढे दुर्लक्षित राहू नये यासाठी आपण स्वतः प्रयत्न करू अशी ग्वाही मा. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी  देऊन जनतेस आश्वस्त केले. याची सुरुवात म्हणून मुंबई नागपूर बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग भंडारा-गोंदिया-गडचिरोली पर्यंत वाढवण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच शहरातील नाट्यगृहासहित इतर सर्व मागण्याही हे सरकार नक्की पूर्ण करेल अशी ग्वाही दिली.

 

याप्रसंगी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार कृपाल तुमाने, खासदार सुनील मेंढे, भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार डॉ.परिणय फुके, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे विदर्भातील नेते किरण पांडव तसेच बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपचे सर्व स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन. 23 November, 2024

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.

...

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

पश्चिम-महाराष्ट्रतील बातम्या

*राज्यात १९ फेब्रुवारीला शिवजयंती उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात साजरी होणार*

*सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र* मुंबई, दिनांक १३: छत्रपती...

*सुप्रसिद्ध मेडीसन पीआर मिडीया एजन्सी बाबत जगदिश काशिकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतरांना नोकरी वाचविण्याबाबत निवेदन व स्मरणपत्र* *कामगार आयुकत यांच्या पर्यत आपली समस्या पोहचवण्यासाठी व न्यायासाठी सुप्रसिद्ध समाजसेवक, वकील व वोचडोग फाऊंडेशन चे ट्रस्टी श्री गोडफ्रे पिमेंटा यांची घेतली कायदेशिर मदत* *दिल्ली कामगार मंत्री कार्यालयातुन या प्रकरणाबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आदेश महाराष्ट्र कामगार आयुकत यांना देण्यात आले आहेत*

भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरमुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व...

ब्राह्मण पुरोहिताची जागा बहुजन पुरोहितांना द्या! मराठा सेवा संघ संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर

भारतीय वार्ता : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राजघराण्यातील वर्तमानातील युवराज्ञी संयोगिता राजे संभाजी...