Home / महाराष्ट्र / फेक जैन 'मुनी' व बोगस...

महाराष्ट्र

फेक जैन 'मुनी' व बोगस पीएचडीधारकाने राजभवनात केला पुरस्कार सोहळा

फेक जैन 'मुनी' व बोगस पीएचडीधारकाने राजभवनात केला पुरस्कार सोहळा

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केला सत्कार स्प्राऊट्स ब्रँड स्टोरी

भारतीय वार्ता प्रतिनिधी : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरू आहेत. मात्र त्यांच्या प्रमुख उपस्थितीतच बोगस पीएचडीधारकाने अवार्ड सोहळा आयोजित केला. यापूर्वीही याच बोगस पीएचडीधारकाने राजभवनातच पुरस्कार सोहळा केला होता. राज्यपालांच्या या मुजोर व बेपर्वाईमुळेच अशा बोगस पीएचडीधारकांचा महाराष्ट्रात सुळसुळाट झालेला आहे. राजभवनात झालेल्या या कार्यक्रमाचा सूत्रधार लोकेश याचा पुराव्यानिशी भांडाफोड केला आहे, तो 'स्प्राऊट्स' या इंग्रजी दैनिकाच्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमने.  

 

६ नोव्हेंबर रोजी राजभवन येथे 'अहिंसा विश्व भारती' (Ahimsa Vishwa Bharti) या स्वयंसेवी संस्थेने 'अहिंसा इंटरनॅशनल अवॉर्ड सोहळा' आयोजित केला होता. या संस्थेचे ट्रस्टी आहेत लोकेश. लोकेश हे 'आचार्य डॉ. लोकेश मुनी (Acharya Dr Lokesh Muni) म्हणून स्वतःचा परिचय करून देतात. राजभवनाच्या पत्रकातही तसाच उल्लेख आहे.

 

लोकेश यांनी ऑनररी पीएचडी घेतलेली आहे. ही पीएचडी त्यांना Institute of Education Research and Development India Board of Alternative Medicines ने दिलेली आहे. हा 'बोर्ड' आहे, युनिव्हर्सिटी नाही, त्यामुळे या बोर्डला कोणत्याही स्वरुपात पीएचडी देण्याचा अधिकारच नाही.  त्यामुळेच या बोर्डाने दिलेली ऑनररी पीएचडी ही अवैध म्हणजे सपशेल बोगस आहे.

 

बोगस पीएचडीधारक लोकेश हे 'आचार्य डॉ. लोकेश मुनी' तर कधी 'संत आचार्य डॉ. लोकेश मुनी' असा स्वतःचा उल्लेख करतात. हा उल्लेख सपशेल चुकीचा व जैन धर्माचा अवमान करणारा आहे. वास्तविक लोकेश यांनी 'तेरापंथी' या संप्रदायाची दीक्षा घेतलेली होती. मात्र त्यांनी काही तत्वांचे उल्लंघन केल्यामुळे काही वर्षांपूर्वीच त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. आजमितीला त्यांना जैन धर्मात कोणीही गुरु नाही.

 

लोकेश हे महागड्या आलिशान गाड्या तर कधी विमानातून प्रवास करतात. जैन मुनींना गाडी व विमानात बसायला सक्त मनाई आहे. इतकेच नव्हे तर  चातुर्मासाच्या ४ महिन्यांत कुठेही जायला परवानगी नाही, त्यावेळी लोकेश हे मस्त परदेशात फिरत असतात.

 

'अहिंसा विश्व भरती' या ट्रस्टचे गौडबंगाल

 

लोकेश हे 'अहिंसा विश्व भारती' ( Ahimsa Vishwa Bharti ) या स्वयंसेवी संस्थेचे ट्रस्टी आहेत. या माध्यमातून ते कायम देणग्या गोळा करीत असतात. राजभवनात वारंवार इंटरनॅशनल अवॉर्ड सोहळे घेणे, व त्यासाठी  फक्त केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री  पीयूष गोयल, पृथ्वीराज कोठारी, संजय घोडावत यांसारख्या धनदांडग्यांनाच बोलावून पुरस्कार देणे, हा देणग्या मिळवण्याचा सरळ सोपा व अचूक मार्ग आहे.

 

कोणत्याही जैन मुनीला अनवाणी पायाने प्रवास करणे आजही बंधनकारक आहे. इतकेच नव्हे तर एअर कंडिशनमध्ये बसणेही वर्ज्य आहे. याउलट लोकेश आलिशान एसी गाड्या, विमानांतून परदेशवाऱ्या करतात. सोशल मीडियाही दररोज अपडेट करतात. इतकेच काय पण पैसा गोळा करण्यासाठी ट्रस्ट स्थापन करतात, हे वर्तन जैन मुनींना आखून दिलेल्या नियमांचे विरुद्ध आहे. इतकेच नव्हे तर कोणत्याही 'मुनी'ला पैशाला हात लावायलाचा अधिकारही, जैन समाजाने दिलेला नाही. मात्र सवंग प्रसिद्धी व त्यातून अवैधरित्या मिळणारा काळा पैसा याची चटक या भामट्याला लागलेली आहे, त्यामुळेच या ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी किती काळा पैसे गोळा केला, याची कायदेशीर चौकशी व्हायला हवी.

 

लोकेश यांनी नावामागे 'मुनी' असा उल्लेख त्वरित काढावा, अशी मागणीही जैन समाजातील वरिष्ठ मुनींनी 'स्प्राउट्स'शी बोलताना केली आहे. याबाबत प्रतिक्रियेसाठी लोकेश यांना संपर्क केला असता, तो होवू शकला नाही.  

 

'आचार्य' उपाधीही बनावट

तेरापंथी समाजात 'आचार्य' ही उपाधी फक्त एकाच व्यक्तीला असते. 'एक गुरु व एक विधान' हा येथे नियम आहे. या नियमानुसार ही उपाधी सध्या श्रीमहाश्रमण यांना देण्यात आलेली आहे. अन्य कोणत्याही व्यक्तीला ही उपाधी लावण्याचा अधिकार नाही.

 

लोकेश या बोगस माणसाने 'आचार्यश्री' ही उपाधी जपानच्या संस्थेने दिली असल्याचे सांगितले आहे. मात्र त्या संस्थाही अथेन्टिक नाहीत.  

 

राजभवन हे तर 'पुरस्कार वाटप केंद्र'

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे दररोज शेकडो जणांना पुरस्कार वाटत असतात. राजभवन ही सरकारी वास्तू आहे. खासगी पुरस्कार वाटप केंद्र नाही, मात्र राज्यपाल व त्यांचा बेकायदेशीर बसलेला महाभ्रष्ट सचिव उल्हास मुणगेकर हे या पवित्र वास्तूचा गैरवापर करीत आहेत. सवंग प्रसिद्धीच्या हव्यासापोटी त्यांनी आजपर्यंत अंडरवर्ल्डशी संबंधित गुंडांनाही पुरस्कार दिलेले आहेत. याबाबत 'स्प्राऊट्स'ने वारंवार लेखी तक्रार केली आहे. मात्र त्याची दखल राज्यपाल कोश्यारी यांनी अद्याप घेतलेली नाही, याउलट मुणगेकरसारख्या भामट्याला पुन्हा नव्याने मुदतवाढ दिली.    

 

जगदीश का. काशिकर,

कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

 

सहकार्य:उन्मेष गुजराथी

स्प्राऊट्स ब्रँड स्टोरी

ताज्या बातम्या

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...