Home / महाराष्ट्र / महाराष्ट्र राज्याचे...

महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथ शिंदे कोकण महोत्सवाला उपस्थित राहून ठाणेकर नागरिकांशी संवाद साधला

महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथ शिंदे कोकण महोत्सवाला उपस्थित राहून ठाणेकर नागरिकांशी संवाद साधला

जगदीश का. काशिकर कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

 

ठाणे: ठाणे शहरातील लोकमान्य नगर  येथे माजी नगरसेवक हनुमंत जगदाळे यांच्या वतीने लोकमान्य नगर, शास्त्री नगर विभागातील नागरिकांच्या कौटुंबिक मेळाव्याला तसेच सावरकर नगर परिसरात माजी नगरसेवक दिलीप बारटक्के यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कोकण महोत्सवाला मा. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे उपस्थित राहून ठाणेकर नागरिकांशी संवाद साधला.

 

ठाणे शहराच्या प्रस्तावित क्लस्टर योजनेतून स्थानिक नागरिकांना त्यांच्या हक्काचे घर येणार असून कोणालाही त्यापासून वंचित ठेवले जाणार नाही, धोकादायक इमारतीत राहणाऱ्या नागरिकांच्या डोक्यावरील टांगती तलवार दूर करून त्यांना हक्काचे घरकुल देण्यासाठी हे सरकार कटिबद्ध असल्याचे यासमयी स्पष्ट केले.

 

राज्यात सत्तेत आल्यानंतर ७२ मोठे निर्णय घेतले असून बंद पडलेले अनेक प्रकल्प वॉर रूमच्या माध्यमातून गती देऊन प्रगतीपथावर नेले आहेत. तसेच राज्यातील शेतकरी, कष्टकरी सर्वसामान्य माणसाला समोर ठेवून लोकाभिमुख सरकार चालवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करित असल्याचे याप्रसंगी बोलताना नमूद केले. अवघ्या तीन महिन्यांत या सरकारने केलेले काम बघता पायाखालची वाळू सरकल्यानेच मध्यावधी निवडणुकांची भाकिते करून  संभ्रम माजविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही मत यावेळी व्यक्त केले.

 

लोकमान्य नगर, शास्त्री नगर आणि सावरकर नगरवासीयांना भेडसावणाऱ्या वाहतूक कोंडी आणि पार्किंगच्या प्रश्नावर ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून लवकरच तोडगा काढला जाईल अशी ग्वाही नागरिकांना दिली.

 

याप्रसंगी माजी नगरसेवक हनुमंत जगदाळे, माजी नगरसेवक दिलीप बारटक्के, माजी नगरसेवक राम रेपाळे, माजी नगरसेवक योगेश जानकर, विभागप्रमुख एकनाथ भोईर, अमित लोटलीकर, विराज महामुणकर आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...