Home / महाराष्ट्र / पश्चिम-महाराष्ट्र / देशाचे सरन्यायाधीश...

महाराष्ट्र    |    पश्चिम-महाराष्ट्र

देशाचे सरन्यायाधीश मा.श्री. उदय लळीत यांचा विशेष सत्कार सोहळ्याला मा. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे राजभवनात उपस्थित !

देशाचे सरन्यायाधीश मा.श्री. उदय लळीत यांचा विशेष सत्कार  सोहळ्याला मा. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे राजभवनात उपस्थित !

! भारतीय वार्ता :

 

जगदीश का. काशिकर,

कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

 

मुंबई: देशाचे सरन्यायाधीश मा.श्री. उदय लळीत यांचा विशेष सत्कार सोहळा आज राजभवन येथे पार पडला. या सोहळ्याला मा. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे उपस्थित राहून मा.श्री.उदय लळीत यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल त्यांचे विशेष कौतुक केले.

 

सरन्यायाधीश मा.श्री. उदय लळीत यांचा स्वभाव अतिशय मितभाषी असला तरीही त्यांनी कामातून आपले वेगळेपण सिध्द करून दाखवले आहे. आपल्या कार्यकाळात अनेक अवघड आणि क्लिष्ट प्रकरणे निकाली काढण्याचा त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला.

 

सर्वोच्च न्यायालयाचे कामकाजाचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करून ते लोकांना पाहता यावे यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. तसेच वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली प्रकरणे वेगाने निकाली निघावीत यासाठी सकाळी नऊ वाजल्यापासून कोर्टाचे कामकाज सुरू का करू नये असं वक्तव्य त्यांनी केल्याची आठवण देखील मा. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी याप्रसंगी करून दिली.

 

राज्य सरकार हे कायमच न्यायदान प्रक्रिया जलद व्हावी यासाठी सकारात्मक असून उच्च न्यायालयाकडून याबाबत येणाऱ्या मागण्या आम्ही तातडीने मंजूर करतो असेही यासमयी स्पष्ट केले. उच्च न्यायालयाला वांद्रे कुर्ला संकुल येथे हवी असलेली जागा देण्यासाठी देखील राज्यातील युती सरकार सकारात्मक असल्याचे यावेळी बोलताना नमूद केले.

 

याप्रसंगी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता, विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सरन्यायाधीश मा.श्री.उदय लळीत यांच्या पत्नी तसेच राजकीय आणि विधी क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

पश्चिम-महाराष्ट्रतील बातम्या

*राज्यात १९ फेब्रुवारीला शिवजयंती उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात साजरी होणार*

*सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र* मुंबई, दिनांक १३: छत्रपती...

*सुप्रसिद्ध मेडीसन पीआर मिडीया एजन्सी बाबत जगदिश काशिकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतरांना नोकरी वाचविण्याबाबत निवेदन व स्मरणपत्र* *कामगार आयुकत यांच्या पर्यत आपली समस्या पोहचवण्यासाठी व न्यायासाठी सुप्रसिद्ध समाजसेवक, वकील व वोचडोग फाऊंडेशन चे ट्रस्टी श्री गोडफ्रे पिमेंटा यांची घेतली कायदेशिर मदत* *दिल्ली कामगार मंत्री कार्यालयातुन या प्रकरणाबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आदेश महाराष्ट्र कामगार आयुकत यांना देण्यात आले आहेत*

भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरमुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व...

ब्राह्मण पुरोहिताची जागा बहुजन पुरोहितांना द्या! मराठा सेवा संघ संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर

भारतीय वार्ता : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राजघराण्यातील वर्तमानातील युवराज्ञी संयोगिता राजे संभाजी...