Home / महाराष्ट्र / पश्चिम-महाराष्ट्र / मा. मुख्यमंत्री श्री...

महाराष्ट्र    |    पश्चिम-महाराष्ट्र

मा. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी विकासकामांबाबत आपले विचार मांडले !! युती सरकार हे जनसामान्यांचे सरकार !!

मा. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी विकासकामांबाबत आपले विचार मांडले !!    युती सरकार हे जनसामान्यांचे सरकार !!

भारतीय वार्ता 

 

जगदीश का. काशिकर,

कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

 

मुंबई: इंडिया टुडे वृत्तसमूहाच्या वतीने  आयोजित करण्यात आलेल्या कॉनक्लेव्ह कार्यक्रमात मा. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे सहभागी होऊन राज्यात घडलेल्या सत्तांतरासहित प्रस्तावित विकासकामांबाबत आपले विचार मांडले.  

 

युती सरकार हे जनसामान्यांचे सरकार असून लोकाभिमुख निर्णय घेणारे सरकार असल्याचे याप्रसंगी स्पष्ट केले. गेल्या तीन महिन्यांत राज्यातील शेतकरी, कष्टकरी जनतेला न्याय देणाऱ्या अनेक निर्णयांची माहिती या कार्यक्रमात बोलताना दिली.

 

राज्यात युती सरकार सत्तेत येताच पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी केले, शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषांच्या दुप्पट मदत दिली, राज्यात पायाभूत सुविधा निर्माण करणाऱ्या वेगवेगळ्या प्रकल्पांना गती दिली. लवकरच राज्यभरात ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करण्यात येणार असल्याचेदेखील याप्रसंगी नमूद केले.

 

राज्यातील युती सरकार हे केंद्र सरकारच्या सहकार्याने अतिशय भक्कमपणे पुढील वाटचाल करत असून मी आणि देवेंद्र फडणवीसजी एकत्रितपणे या राज्याला नवीन उंचीवर घेऊन जाण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. लोकांच्या हितासाठीच आम्ही आरे मध्येच मेट्रो कारशेड करण्याचा निर्णय घेतला असल्याचेही यावेळी अधोरेखित केले.

 

याप्रसंगी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, पायाभूत सुविधा प्रकल्पांचा वॉर रुमचे महासंचालक राधेश्याम मोपलवार, इंडीया टुडे ग्रुपचे अध्यक्ष अरुण पुरी, अभिनेता अभिषेक बच्चन, इंडिया टुडे ग्रुपचे सल्लागार संपादक राजदीप सरदेसाई, आज तक वृत्तवाहिनीचे मुंबई ब्युरो चीफ साहिल जोशी, राजकीय पत्रकार कमलेश सुतार, समन्वयक आशिष कुलकर्णी, भाजप प्रवक्त्या शायना एन.सी. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर आणि इंडिया टुडे वृत्तसमूहातील पत्रकार उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

पश्चिम-महाराष्ट्रतील बातम्या

*राज्यात १९ फेब्रुवारीला शिवजयंती उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात साजरी होणार*

*सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र* मुंबई, दिनांक १३: छत्रपती...

*सुप्रसिद्ध मेडीसन पीआर मिडीया एजन्सी बाबत जगदिश काशिकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतरांना नोकरी वाचविण्याबाबत निवेदन व स्मरणपत्र* *कामगार आयुकत यांच्या पर्यत आपली समस्या पोहचवण्यासाठी व न्यायासाठी सुप्रसिद्ध समाजसेवक, वकील व वोचडोग फाऊंडेशन चे ट्रस्टी श्री गोडफ्रे पिमेंटा यांची घेतली कायदेशिर मदत* *दिल्ली कामगार मंत्री कार्यालयातुन या प्रकरणाबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आदेश महाराष्ट्र कामगार आयुकत यांना देण्यात आले आहेत*

भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरमुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व...

ब्राह्मण पुरोहिताची जागा बहुजन पुरोहितांना द्या! मराठा सेवा संघ संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर

भारतीय वार्ता : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राजघराण्यातील वर्तमानातील युवराज्ञी संयोगिता राजे संभाजी...