वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
मुंबई: इंडिया टुडे वृत्तसमूहाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कॉनक्लेव्ह कार्यक्रमात मा. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे सहभागी होऊन राज्यात घडलेल्या सत्तांतरासहित प्रस्तावित विकासकामांबाबत आपले विचार मांडले.
युती सरकार हे जनसामान्यांचे सरकार असून लोकाभिमुख निर्णय घेणारे सरकार असल्याचे याप्रसंगी स्पष्ट केले. गेल्या तीन महिन्यांत राज्यातील शेतकरी, कष्टकरी जनतेला न्याय देणाऱ्या अनेक निर्णयांची माहिती या कार्यक्रमात बोलताना दिली.
राज्यात युती सरकार सत्तेत येताच पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी केले, शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषांच्या दुप्पट मदत दिली, राज्यात पायाभूत सुविधा निर्माण करणाऱ्या वेगवेगळ्या प्रकल्पांना गती दिली. लवकरच राज्यभरात ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करण्यात येणार असल्याचेदेखील याप्रसंगी नमूद केले.
राज्यातील युती सरकार हे केंद्र सरकारच्या सहकार्याने अतिशय भक्कमपणे पुढील वाटचाल करत असून मी आणि देवेंद्र फडणवीसजी एकत्रितपणे या राज्याला नवीन उंचीवर घेऊन जाण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. लोकांच्या हितासाठीच आम्ही आरे मध्येच मेट्रो कारशेड करण्याचा निर्णय घेतला असल्याचेही यावेळी अधोरेखित केले.
याप्रसंगी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, पायाभूत सुविधा प्रकल्पांचा वॉर रुमचे महासंचालक राधेश्याम मोपलवार, इंडीया टुडे ग्रुपचे अध्यक्ष अरुण पुरी, अभिनेता अभिषेक बच्चन, इंडिया टुडे ग्रुपचे सल्लागार संपादक राजदीप सरदेसाई, आज तक वृत्तवाहिनीचे मुंबई ब्युरो चीफ साहिल जोशी, राजकीय पत्रकार कमलेश सुतार, समन्वयक आशिष कुलकर्णी, भाजप प्रवक्त्या शायना एन.सी. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर आणि इंडिया टुडे वृत्तसमूहातील पत्रकार उपस्थित होते.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
*सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र* मुंबई, दिनांक १३: छत्रपती...
भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरमुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व...
भारतीय वार्ता : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राजघराण्यातील वर्तमानातील युवराज्ञी संयोगिता राजे संभाजी...