वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता: मुंबई( जगदीश काशीकर )
कर्नाटक राज्याचे भाजपचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिवाळीच्या निमित्ताने पत्रकारांना प्रत्येकी १ लाख रुपये दिले, मात्र तेथील पत्रकारांनी ते पैसे परत केले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा 'प्लॅन' सपशेल फेल गेला. मात्र महाराष्ट्रात फडणवीस यांचा मास्टरप्लॅन यशस्वी झाला, अशी धक्कादायक माहिती 'स्प्राऊट्स'च्या हाती आलेली आहे.
शिवसेनेतून तब्बल ४० आमदार एकाच वेळी फुटले. यापैकी प्रत्येक आमदाराला '५० खोके' म्हणजेच ५० कोटी रुपये देण्यात आले व या सर्वांनी मिळून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले. हे सर्व करण्यामागे देवेंद्र फडणवीस यांचा सिंहाचा वाटा होता. या कार्यात त्यांना नरेंद्र मोदी व अमित शहा यांची मोलाची साथ मिळाली, असा विरोधी पक्षाचा आजही आरोप आहे.
या प्रकरणात स्वतःकडे सहानुभूती घेण्यात उद्धव ठाकरे यशस्वी झाले. मात्र देवेंद्र फडणवीस खलनायक ठरले. एकनाथ शिंदे व त्यांच्याबरोबर गेलेले आमदार यांना आजही त्यांच्या मतदारसंघात उजळ माथ्याने फिरता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. एकंदरीतच या '५० खोके' प्रकरणात फडणवीस, शिंदे व 'त्या' ४० आमदारांची प्रतिमा मोठ्या प्रमाणात मलीन झाली.
आपली गेलेली पत परत येवू शकत नाही, मात्र ही पत, इमेज आणखी बिघडवणाऱ्या पत्रकारांना आपण पुरते बदनाम करु शकतो, या हेतूने कधीही रुपयाची जाहिरात न देणाऱ्या फडणवीस यांनी संपूर्ण मीडियालाच बदनाम करण्याचा डाव आखला, अशी विश्वसनीय माहिती 'स्प्राऊट्स'च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमला मिळालेली आहे.
पहाटेचा शपथविधी सोडला, तर एरवी कधीही फडणवीस यांचे प्लॅन फेल जात नाही. याच आत्मविश्वासाने फडणवीस यांनी सुनियोजित कार्यक्रम आखला. 'मेघदूत' या सरकारी निवासस्थानी मागील बुधवारी 'लष्करे- ए- देवेंद्र' म्हणजेच देवेंद्र यांच्या मर्जीतील व इतरही मोजक्याच अशा जवळपास १५० राजकीय बिट कव्हर करणाऱ्या पत्रकारांना 'दिवाळी'साठी बोलावले. त्याचबरोबर लोकसत्ता दैनिकाच्या गिरीश कुबेर यांच्यासारख्या निवडक संपादकांनाही आमंत्रण दिले.
सर्वप्रथम त्यांना भरपेट जेवण देवून खुश केले व त्यानंतर त्यांना जाणीवपूर्वक अपमान होईल, अशा पद्धतीने निमूट लाईनीत उभे केले व त्यानंतर त्यांना ताटकळत ठेवण्यात आले व मग त्यांना रिलायन्स कंपनीची प्रत्येकी ५० हजार रुपयांची गिफ्ट व्हाउचर्स दिली. ( फडणवीस हीच गिफ्ट व्हाउचर्स घरपोच देवू शकले असते, पण त्यांचा उद्देश हा पत्रकारांना त्यांच्या बंगल्यावर बोलावून बदनाम करण्याचा होता, हे स्पष्ट दिसून येते )
फार पूर्वी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे पुढारीही त्यांच्या मर्जीतल्या पत्रकारांना बोलावून 'दिवाळी' देत असत. काँग्रेसचे पुढारी बाळासाहेब थोरात तर त्याच्या खास, मोजक्याच पत्रकारांना फार पूर्वी म्हणजे सन २०१३ पूर्वी चक्क सोन्याचे नाणे गिफ्ट म्हणून देत असत. ते गिफ्ट पत्रकारांच्या घरी पोहोचविण्यात येई. त्याचा गाजावाजाही नसे. ही दानत फडणवीस यांच्याकडे नाही. त्यांच्याकडे आहे, ती फक्त उपद्रवमूल्य क्षमता.
यामुळेच फडणवीस यांनी राजकीय वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांचा 'करेक्ट' कार्यक्रम केला. यानिमित्ताने महाराष्ट्रातील पत्रकारांचे नावही डागाळले गेले. इतके होवूनही फडणवीस समाधानी नव्हते. त्यांनी कधी एक अवाक्षरही न बोलणाऱ्या आमदार पराग शहा यांना पुढे केले. त्यांना पत्रकारांना 'HMV' ( His Masters Voice ) अर्थात 'कुत्रा' म्हणावयास सांगितले. त्यानंतर ठरल्याप्रमाणे पत्रकार चिडले. पाकीट घेतले फक्त १५० लाचार पत्रकारांनी मात्र त्यानिमित्ताने महाराष्ट्रातील मीडिया पूर्णपणे बदनाम झाला होता.
वास्तविक पत्रकार संघटनांकडून '५० हजार रुपयांच्या व्हाउचर्स वाटप प्रकरणा'ची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी करायला हवी होती किंवा लोकायुक्तांकडे तक्रार देण्यात यायला हवी होती.
फडणवीस यांना तर सोडा पण किमान शहा यांना माफी मागायला लावायला भाग पाडण्याची जबाबदारी पत्रकार संघटनांचीही होती. मात्र केवळ या ट्विटला मुंबईतील पत्रकार संघटनांनी पत्रक काढून पोकळ निषेध व्यक्त केला, हाही केवळ दिखावा होता. फडणवीस यांना तर सोडा पण पराग शहा यांना जाब विचारण्याची हिंमत त्यांच्यामध्ये नव्हती, कारण फडणवीस यांच्या '५० हजार रुपयांच्या' यादीत या पत्रकारांचीच नावे होती. त्यामुळे फडणवीस तर सोडा, शहा यांनी अद्याप माफीही मागितली नाही, व मागण्याची सूतराम शक्यताही नाही.
एकंदरीतच फडणवीस यांचा मास्टर प्लॅन यशस्वी झाला आणि यानिमित्ताने दिवसरात्र इमानेइतबारे काम करणारे ८० टक्के प्रामाणिक पत्रकारही 'त्या' १५० पत्रकारांमुळे नाहक बदनाम झाले.
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
सहकार्य:*उन्मेष गुजराथी*
*स्प्राऊट्स ब्रँड स्टोरी*
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
*सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र* मुंबई, दिनांक १३: छत्रपती...
भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरमुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व...
भारतीय वार्ता : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राजघराण्यातील वर्तमानातील युवराज्ञी संयोगिता राजे संभाजी...