वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
' भारतीय वार्ता =(मुंबई )
सध्या देवेंद्र फडणवीस 'मेघदूत' मध्ये राहतात. याच बंगल्यामध्ये मागील बुधवारी पत्रकारांसाठी दिवाळीच्या निमित्ताने गेटटुगेदर ठेवण्यात आले होते. खरंतर 'गेटटुगेदर', 'स्नेहमिलन' अशी ही फक्त गोंडस नावं असतात. प्रत्यक्षात या कार्यक्रमाला गिफ्ट घेण्यासाठी बोलावले जाते. त्यामुळे साहजिकच या कार्यक्रमासाठी अक्षरश: झुंबड उडते.
यावर्षीही अशीच झुंबड उडालेली होती. पॉलिटिकल बिट सांभाळणारे कथित ज्येष्ठ पत्रकार व काही संपादक हे या कार्यक्रमाला हजर होते. 'लोकसत्ता'चे मुख्य संपादक गिरीश कुबेर यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. तेथे भरपेट जेवण केले. त्यानंतर एखाद्या लाचार पत्रकारासारखे ते निमूट लाईनीत उभे राहिले. ५० हजार रुपयांचे रिलायन्सचे गिफ्ट व्हॉउचर्स त्यांनी घेतले. त्यांच्या जोडीला असे १५० हून अधिक पत्रकार यावेळी उपस्थित होते. सर्वांना ही 'दिवाळी' मिळाली. यावेळी गिरीशजी 'कुबेर' झाले व पत्रकारिता दरिद्री झाली.
फडणवीस हे त्यांच्या उपद्रवमूल्य क्षमतेमुळे प्रसिद्ध आहेत. मात्र मीडियात सवंग प्रसिद्धीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाच बोलबाला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस सध्या थोडे साईडलाईनला पडल्यासारखे वाटतात. त्यामुळे पत्रकारांची नाराजी दूर व्हावी व गिफ्ट देण्यामध्ये आपलीही एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा काकणभर अधिक दानत आहे, हे दाखविण्यासाठी फडणवीस यांनीही अशी मोठ्या रकमेची व्हॉउचर्स वाटली आणि ऐन दिवाळीत एक नवा विकृत पायंडा जन्माला घातला.
फडणवीस यांच्याप्रमाणेच मग शिंदे यांनीही तात्काळ त्याच दिवशी संध्याकाळी सर्व संपादक मंडळींना 'वर्षा'वर बोलावले. त्यावेळी ओल्गा टेलिस ( Olga Tellis ), सुचेता दलाल यांच्यासारखी असंख्य संपादक मंडळी उपस्थित होती. याठिकाणी काय 'दिवाळी' देण्यात आली, याची माहिती स्प्राऊट्सच्या टीमच्या हाती आलेली आहे. पण पुरावा नसल्यामुळे या गोष्टी उघड करता येत नाही.
ठाण्यात शिंदे यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही पत्रकारांना मोठी 'दिवाळी ' दिली. साध्या पत्रकारांना डिजिटल घड्याळ तर ठाण्यातील संपादकांना याहूनही महागडी गिफ्ट्स दिली.
ठाण्यापेक्षा मंत्रालयातील पत्रकारांचा रुबाब अधिक आहे. त्यामुळे त्यांना शिंदे 'साहेब' हे देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा अधिक महागडी भेट देतील, असे वाटले होते. विशेषत: साहेब आयफोन देणार आहेत, अशी बातमीही पसरली. त्यामुळे 'वर्षा'वर पुन्हा पत्रकार व संपादकांची झुंबड उडालेली होती.
'स्नेहमिलना'चा हा कार्यक्रम होण्याअगोदर 'स्प्राऊट्स'मध्ये यासंबंधी पोलखोल करणारी बातमी प्रसिद्ध करण्यात आली. सोशल मीडियावरून ती प्रचंड व्हायरलही झाली. ऍड असीम सरोदेसारख्या असंख्य वकील व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांनी याविरोधात लोकायुक्तांकडे तक्रार करण्याची तयारीही दर्शवली. त्यामुळे आधीच '५० खोके'ने बदनाम झालेल्या शिंदे यांनी नामुष्की टळावी म्हणून 'वर्षा'वर आलेल्या पत्रकारांना फक्त जेवायला घातले, ड्रायफ्रूटसचे पॅकेट्स वाटले व मोकळे केले.
उद्धव ठाकरे यांनी प्रथमच दिली 'दिवाळी भेट'
'दिवाळी'च्या कथित स्नेहमिलनासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही त्यांच्या आयुष्यात प्रथमच काही ज्येष्ठ पत्रकारांना 'मातोश्री'वर बोलावले. यात कुमार केतकर, निखिल वागळे यांच्यासारखेच पत्रकार उपस्थित होते. या सर्व भंपक संपादकांची कारकीर्द शिवसेना, भाजप व संघ यांना शिव्या घालण्यात गेली. किंबहुना त्यांना शिव्या देऊनच हे मोठे झाले आहेत. ही सर्व पत्रकार मंडळी सध्या 'आऊटडेटेड' झालेली आहेत. यांना मागील ८ ते १० वर्षांपासून कोणताही साधा जॉबही मिळवता येत नाही. स्वतःचे साधे युट्युब चॅनेल काढण्याची धमकही या मंडळींमध्ये नाही. अशी मंडळी उद्धव यांच्याकडे 'दिवाळी'साठी आलेली होती.
केतकर आजमितीला काँग्रेसचे खासदार आहेत. तेथेही ते मौनीबाबा म्हणून कुप्रसिद्ध आहेत. या सर्व ज्येष्ठ व बेरोजगार पत्रकारांना ठाकरे यांनी भलेमोठे 'गिफ्ट' दिले, अशी खात्रीलायक माहिती 'स्प्राऊट्स'च्या हाती आलेली आहे, मात्र ठोस पुरावा नसल्यामुळे याविषयी 'स्प्राऊट्स'च्या वाचकांना माहिती देता येत नाही.
पराग शहा आणि HMV
भाजपचे मुंबईतील आमदार पराग शाह यांनी मंगळवारी ट्विट केले. त्यात त्यांनी पत्रकारांचा उल्लेख HMV ( his masters voice ) म्हणजेच कुत्रा असा केला. यावर त्यांना सर्वांनीच ट्रोल केले. त्यानंतर मात्र त्यांनी स्वतःच 'शेपूट' घातले व ते ट्विट डिलीट केले. मात्र या ट्विटचा कुठल्याही पत्रकार संघटनेने जाब विचारला नाही, की निषेध दर्शवला नाही, ही दुर्दैवाची बाब आहे.
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
सहकार्य:*उन्मेष गुजराथी*
*स्प्राऊट्स ब्रँड स्टोरी*
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
*सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र* मुंबई, दिनांक १३: छत्रपती...
भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरमुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व...
भारतीय वार्ता : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राजघराण्यातील वर्तमानातील युवराज्ञी संयोगिता राजे संभाजी...