Home / महाराष्ट्र / कोकण / मुख्यमंत्री शिंदे यांचे...

महाराष्ट्र    |    कोकण

मुख्यमंत्री शिंदे यांचे वैद्यकीय सेवेतील कामाची पोच पावती म्हणून ते मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत - खासदार सुजय राधाकृष्ण विखे पाटील हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे डायलिसिस सेंटरचे करमाळ्यात उदघाटन फिरते दवाखाने सुरू करण्याची गरज

मुख्यमंत्री शिंदे यांचे वैद्यकीय सेवेतील कामाची पोच पावती म्हणून ते मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत - खासदार सुजय राधाकृष्ण विखे पाटील    हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे डायलिसिस सेंटरचे करमाळ्यात उदघाटन    फिरते दवाखाने सुरू करण्याची गरज

 

भारतीय वार्ता :मुबंई 

जगदीश का. काशीकर 

 

करमाळा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अत्यंत संवेदनशील माणूस असून गोरगरिबांना वैद्यकीय सेवेसाठी त्यांनी  त्यांच्या आयुष्यात लाखो लोकांना मदत केली आहे रुग्णांची आशीर्वाद व  पुण्याई त्यांच्या पाठीशी असल्यामुळे ते आज मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत असे मत खासदार सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले.

 

करमाळा येथील स्वातंत्र्य सैनिक मनोहर पंत चिवटे मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल व अपेक्स किडनी सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानाने सुरू झालेल्या डायलिसिस सेंटरच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.

 

यावेळी व्यासपीठावर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार शहाजी बापू पाटील, बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत, जिल्हा बँकेच्या संचालिका रश्मी बागल, पंचायत समितीचे माजी सभापती गहिनीनाथ ननवरे, जिल्हा परिषद चे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड, पृथ्वीराज पाटील, भाजपचे अध्यक्ष जगदीश अग्रवाल ईत्यादी उपस्थित होते.

 

या कार्यक्रमाला माजी आमदार जयवंतराव जगताप व आमदार संजय मामा शिंदे, अक्कलकोटचे आमदार सचिन कलशेट्टी यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

 

या कार्यक्रमास ऑनलाइन द्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री चंद्रकांत दादा पाटील, मंत्री दीपक केसरकर, मंत्री शंभूराजे देसाई यांनी शुभेच्छा दिल्या.

 

या डायलिसिस सेंटरला डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे डायलिसिस सेंटर असे नाव देण्यात आले होते यावर ऑनलाईन वर बोलताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी हे नाव बदलून या डायलिसिस सेंटरला हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे डायलिसिस सेंटर असे नाव द्यावे असा सूचना दिल्यानंतर तात्काळ या डायलिसिस सेंटर चे नाव बदलण्यात आले.

 

यावेळी बोलताना सुजय विखे म्हणाले की आरोग्याची शासकीय यंत्रणा जवळपास कोमात आहे यामुळे आता फिरते दवाखाने सुरू करून दररोज एका गावात शासकीय फिरता दवाखाना गेला पाहिजे तरच खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातल्या लोकांना आरोग्य सेवा मिळणार आहे. राज्यातील उपजिल्हा रुग्णालय केंद्र डॉक्टर नसल्यामुळे किंवा असलेले डॉक्टर दर्जेदार सेवा देत नसल्यामुळे रुग्णांना फायदेशीर ठरत नाही यामुळे ही रुग्णालय सुद्धा खाजगी हॉस्पिटलला चालवायला दिली तर खऱ्या अर्थाने रुग्णांना चांगली सेवा मिळू शकते.

 

यावेळी बोलताना खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी डायलिसिस सेंटर साठी अत्याधुनिक  ॲम्बुलन्स खासदार फंडातून देण्याची घोषणा केली.

 

यावेळी बोलताना आमदार शहाजी बापू पाटील म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजे हा निस्वार्थी माणूस असून अडचणीतल्या रुग्णांना मदत करण्याची दानत फक्त शिंदे कुटुंबात आहे.

 

यावेळी बोलताना प्राध्यापक शिवाजीराव सावंत म्हणाले करमाळ्यासारखे ग्रामीण भागात डायलिसिस सेंटर झाल्यामुळे रुग्णांची सोय होणार आहे.

 

यावेळी प्रास्ताविक भाषणात बोलताना मुख्यमंत्री वैद्यकीय मदत पक्षाचे मंगेश चिवटे म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाचे काम महाराष्ट्रातील 26 जिल्ह्यात सुरू असून 5000 सक्रिय कार्यकर्ते अहोरात्र रुग्णांच्या अडीअडचणी समजून त्यांना मदत करण्यासाठी त्यांना निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री शपथ घेतल्यानंतर तात्काळ गेली अडीच वर्षापासून बंद असलेला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष सुरू केला असून आता या माध्यमातून कट्ट्यावधी रुपयांचा निधी सर्वसामान्य अडचणीत असलेल्या रुग्णांना मिळत आहे ज्यांच्या हृदयाला छिद्र आहे असे एक ते दहा वयोगटातील तीन हजार सहाशे लहान मुलांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या तीन वर्षात मोफत शस्त्रक्रिया करून त्यांना नवीन जीवदान दिले आहे.

 

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील डायलिसिस सेंटरची सिओ दीपक पाटणे शशहर प्रमुख संजय शीलवंत उपोषण प्रमुख नागेश गुरव उपजिल्हाप्रमुख निखिल चांदगुडे विशाल गायकवाड युवा सेनेचे तालुकाप्रमुख राहुल कानगुडे वैद्यकीय मदत पक्षाचे रोहित वायबसे शिवम मोहिते राजेंद्र मिरगळ  जगताप आदींनी परिश्रम घेतले

ताज्या बातम्या

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* 26 December, 2024

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी. 26 December, 2024

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी.

वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...

कोकणतील बातम्या

महिलांनी शैक्षणिक प्रवाहात यावे-प्रवीण काकडे

रत्नागिरी:महिलांनी शैक्षणिक क्षेत्रात येऊन आपल्या कुटुंबाची प्रगती करावी असे प्रतिपादन प्रवीण काकडे अध्यक्ष अहिल्यादेवी...

*जितके पॅनिक व्हाल तितके सायबर फ्रॉड मध्ये अडकत जाल - अॅड. चैतन्य भंडारी*

भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरकायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र....

*ऑनलाईन गेम चा सापळा धोका वेळीच ओळखा - अॅड. चैतन्य एम. भंडारी*

भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरकायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र....