आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता "*
आश्विन अमावास्येला लक्ष्मीपुजन केले जाते.लक्ष्मी या शब्दाचे अनेक अर्थ आहेत.या संदर्भात धनसंपदा,वैभव,समृद्धी हा या शब्दाचा अर्थ आहे.धनत्रयोदशीच्या संदर्भात धनाविषयी जे म्हटले,तेच लक्ष्मीपुजनालाही लागू पडते.यामध्ये आणखी काही गोष्टींची भर घालणेही आवश्यक आहे.
लक्ष्मीपुजन हे मुळचे 'निर्ऋतिपूजन' होते.निऋती ही सिंधु संस्कृतीच्या काळातील एक अतिशय महान स्त्री होती.आज लक्ष्मी ज्या समृद्धीचे प्रतिक मानली जाते,त्या समृद्धीची खर्या अर्थाने निर्मिती करण्याचे महान कार्य प्राचीन काळात बहुजन समाजातील अतिशय श्रेष्ठ अशा निर्ऋती नावाच्या स्त्रीने केले होते.यज्ञयागासारख्या चाकोरीबद्ध कर्मकांडाचा अंगीकार करण्याऐवजी तिने समाजरचनेत सर्व प्रकारच्या नवनिर्मितीच्या संकल्पना कार्यान्वित करण्याचे कार्य केले होते.नवनिर्मितीच्या या कार्यामुळेच तिची पृथ्वीबरोबर तुलना केली जात असे.स्वाभाविकच,'निर्ऋति' या शब्दाचे 'आनंद देणारी', 'पृथ्वी', असेही अर्थ झाले होते.या निर्ऋतीचा बहुजनांची महान पूर्वज जी पार्वती तिच्याशीही निकटचा संबंध होता.नवनिर्मिति,समृद्धी,उज्ज्वल यश आणि आनंद यांचे प्रतीक असलेली ती बहुजनांच्या जीवनाला विधायक दिशा देणारी आहे.भारतीयांच्या आद्यमातांपैकी ती एक आहे.
निर्ऋतीचे आपल्या सांस्कृतिक जीवनातील हे अतिशय उदात्त स्थान पाहता आपण या दिवशी निर्ऋतीच्या गौरवाचा उत्सव साजरा करावा.
या दिवशी केरकचरा काढण्याचे साधन असलेल्या केरसुनीची पुजा केली जाते.ही पुजा करताना तिलाच लक्ष्मी मानले जाते.या प्रथेचा अर्थ आपण काळजीपूर्वक समजून घेतला पाहिजे.केरसूणी स्वच्छता निर्माण करते.जेथे स्वच्छता असते,तेथे आरोग्य,प्रसन्नता,मन:शांती,सौदर्य, आणि खरीखुरी समृद्धीही येते.हा स्वच्छतेचे महत्व मनावर बिंबविण्याचा संस्कार आहे.पण त्याबरोबरच आपल्याला स्वच्छता देणार्या एका निर्जीव साधनाचीही कृतज्ञतापूर्वक पूजा करणे,ही कृती आपल्याला एक फार महत्वाचा संदेश देणारी आहे.श्रमाचा द्वेष करता कामा नये.श्रमातून,कष्टातून मानवी जीवन स्वच्छ आणि सुखी होते.आता, निर्जीव साधनाचीही अशी पुजा करायची असेल,तर सर्व प्रकारच्या श्रमजीवी लोकांविषयी आणि त्यातही समाजातील ज्या व्यक्ती इतरांना स्वच्छ आणि प्रसन्न जीवन लाभावे म्हणून अस्वच्छता दूर करण्याचे श्रम करतात,त्यांच्याविषयी आत्मीयता आणि कृतज्ञता बाळगणे,हा अतिशय उदात्त संदेश या प्रथेतून घेता येतो.
आश्विन अमावास्येलाच भारताचे एक अतिशय महान सुपुत्र तीर्थंकर वर्धमान महावीर यांना निर्वाण प्राप्त झाले.त्यांचा उपदेश मानव जातीसाठी हितकारक आणि कल्याणकारक आहे.प्रकाश हे ज्ञानाचे प्रतीक असते आणि वर्धमान महावीरांनी जो ज्ञानाचा आणि मानवी मूल्यांचा उपदेश केला,तो सदैव प्रकाशमय राहणार आहे.त्यांचा हा उपदेश सर्व लोकांपर्यंत पोचावा आणि तो पोचविण्यासाठी आपलाही हातभार लागावा,ही भावना या दिवशी आपल्या मनात उत्कट स्वरूपात जपता येते.
.....जैन परंपरेमध्ये महावीरांच्या निर्वाणाचा निर्देश 'निर्वाणकल्याणक" या शब्दाने केला जातो. त्यांचा जन्म,त्यांची ज्ञानप्राप्ति इ.घटना जशा लोकांचे,प्राणीमात्रांचे कल्याण साधणार्या मानल्या जातात,तसेच त्यांचे निर्वाणही कल्याणकारक मानले जाते आणि म्हणूनच त्याचा निर्देश 'निर्वाणकल्याणक' या शब्दाने केला जातो.
निर्वाणकल्याणकाची संकल्पना आपल्याला जीनव आणि मृत्यू यांच्याविषयी एक आगळा आणि प्रसन्न दृष्टीकोण देणारी आहे.अनेकांतवादाच्या दृष्टीनेच पहायचे,तर जैन परंपरेत ज्याला एका दृष्टीने निर्वाण म्हटले जाते,तो दुसर्या दृष्टीने देहाचा अंत असतो,मृत्यू असतो.पण परिपूर्ण जीवन जगून झाल्यानंतरच्या मृत्युकडे विघातक म्हणून न पाहता,त्याला विनाशक न मानता,त्याला कल्याणक मानणे हे मृत्यूलाही अवीट सौदर्य देणेे आहे.म्हणूनच महावीरांच्या निर्वानानंतर लोकांनी दिपोत्सव साजरा केला आहे.या दिपोत्सवाची अनेक वर्णने आढळतात.नमुना म्हणून इथे काही वर्णनांचे स्वरूप पाहू या. जैन परंपरेतील 'हरिवंशपुराण' या ग्रंथात या प्रसंगाचे वर्णन पुढीलप्रमाणे केल्याचे उल्लेख आढळतात :
ज्वलत्प्रदीपालिकया प्रवृद्धया सुरासुरै: दीपितया प्रदीप्तया।
तदा स्म पावानगरी समन्तत: प्रदीपिताकाशतला प्रकाशते।।
हरिवंशपुराण ६६।१९।।
अर्थ : त्या वेळी (महावीरांचे निर्वाण झाले,त्या वेळी) सुर आणि असूर यांनी प्रदीपांच्या (मोठमोठ्या दिव्यांच्या) मालिका प्रज्वलित केल्या.त्या खुप मोठ्या झाल्या,त्या दिपित झाल्या (झळाळू लागल्या) प्रदीप्त झाल्या (अतिशय प्रकाशित झाल्या).त्यामुळे,जिच्यावरचे आकाश सर्व बाजूंनी प्रदीपित झाले होते,अशा पावानगरीत सर्व आसमंत प्रकाशित झाला.
जैन साहित्यात महावीरांच्या निर्वाणाचे वर्णन पुढीलप्रमाणे करण्यात आल्याचे आढळते,".....घरोघर दीप पाजळले गेले.रस्तोरस्ती दीप तेजाळले गेले.जिकडे तिकडे दीपच दीप दिसू लागले.दीपांची रांगच रांग प्रकाशू लागली.दीपांच्या पंक्ति जागोजागी चमकू लागल्या.ते पाहून लोक नाचू लागले.भक्त गाऊ लागले.'नम: श्री वर्धमानाय' चा जयघोष दाही दिशांतून घुमू लागला.या अविस्मरणीय आनंदाला नाव देण्यात आले 'दीपावली'.त्या दिवसाला नाव मिळालं 'दिवाळी', आनंदाची दिवाळी,ज्ञानाची दिवाळी,मोक्षसुखाची दिवाळी,भ.महावीरांच्या निर्वाणाची दिवाळी.अमावस्या असून देखील त्या वेळी जगभर पसरलेल्या उद्द्योताचे प्रतीक-स्मृतिचिन्ह म्हणून आजतागायत सामान्य जनता या दिवशी दिव्याच्या ज्योती उजाळून हा आगळा आनंदमहोत्सवी सण अखंड साजरा करीत आली आहे.अखंड साजरा करीत राहणार आहे."
मृत्यूकडे पाहण्याची ही दृष्टी अतिशय सुखद आहे.एका दृष्टीने हे महावीरांनी उपदेशिलेल्या अनेकान्तवादाचे मधुर फळ आहे. मृत्यू हा जीवनाचा शेवट नसून ती जीवनाची परिपूर्णता आहे,परिपक्वता आहे.खरे तर मृत्यू हिच मृत्यूवरची मात आहे,मृत्यूचा पराभव आहे,मृत्यूच्या पलिकडे जाणे आहे.म्हणून हा क्षण दु:खाचा नसून आनंदाचा आहे.बाहेर अमावस्येचा अंधार पसरल्यासारखे दिसत असले,तरी ती प्रत्यक्षात निर्वाणाच्या प्रकाशाची पौर्णिमा आहे. तो मानवी अस्तित्वाचा परमोच्च बिंदू आहे, विकासाची सर्वोच्च अवस्था आहे,आनंदाची परम सीमा आहे!
दिवाळीचे हे प्रकाशमय आणि आनंददायक स्वरूप भारतीय संस्कृतीला एक असाधारण तेज देणारे आहे.
विजयादशमी आणि बलिप्रतिपदा या दोन्ही दिवशी बळीराजाचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करून आपल्यासाठी उमदी प्रेरणा घेण्याचे विधायक,भावात्मक आणि आपल्या सर्जनशिलतेची अभिव्यक्ति करणारे उपक्रम आयोजित करावेत.या काळात आपली मने बळीराजाच्या आणि बळीराजासारख्या आपल्या प्रेरणास्थानांच्या विचारांनीच भरलेली आणि भारावलेली असावीत.आपल्या मनामध्ये अशावेळी नको त्या व्यक्तींच्या थोड्याशा स्मरणालाही वाव असू नये.आपली मने प्रसन्न राहावीत,यासाठी हे आवश्यक आहे.म्हणून या काळात कोणाच्या प्रतिमांचे दहन करणे वगैरेंसारखे नकारात्मक उपक्रम अजिबात करू नयेत.
*शिवधर्म गाथा*
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र* मुंबई, दिनांक १३: छत्रपती...
भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरमुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व...
भारतीय वार्ता : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राजघराण्यातील वर्तमानातील युवराज्ञी संयोगिता राजे संभाजी...