Home / महाराष्ट्र / मराठवाडा / शिवस्पर्श प्रकाशन*...

महाराष्ट्र    |    मराठवाडा

शिवस्पर्श प्रकाशन* *शिवस्पर्श दिवाळी अंक २०२२* वर्ष १९ वे अंक २८ वा *या हृदयीचे त्या हृदयी: पत्र विशेषांक

शिवस्पर्श प्रकाशन*           *शिवस्पर्श दिवाळी अंक २०२२*  वर्ष १९ वे                                  अंक २८ वा        *या हृदयीचे त्या हृदयी: पत्र विशेषांक

भारतीय वार्ता :

 

    शिवस्पर्शने गेल्या १९ वर्षांची परंपरा राखत यावर्षी आपल्यासाठी घेऊन आलाय ‘पत्र विशेषांक.’ मोबाईल व इंटरनेटच्या जगात आज पत्र म्हणजे काय? असा प्रश्न मुलांना पडत आहे. पत्र हे संवादाचे, नवीन नाते निर्माण करण्याचे, नाते जपण्याचे, महत्वपूर्ण निरोप देण्याचे एक साधन होते. अगदी प्राचीन काळापासून ते गेल्या २० वर्षापर्यंतची अनेकांची पत्रमैत्री प्रसिध्द आहे. पण आजकाल पेपरलेस व पेनलेस जगात कोणीही कोणालाही पत्र लिहून आपले प्रश्न, भावना, समस्या मांडा अशा आमच्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यातील काही निवडक पत्र आम्ही संकलित करून आपल्यासाठी विचारांची मेजवानी घेऊन येत आहोत.

    देवाधिदेव शंकर, छ. शंभूराजे, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मातृभूमी, दंगलताई, मा. शिक्षणमंत्री पासून ते नाना पाटेकर, सुबोध भावे, अच्युत गोडबोले, पालक, आई, तरूणाई अशा विविध लोकांची पत्रे ही भावना, समस्या मांडणारी आहेत.

    या सोबतच पुरोगामीत्वाचे वैचारिक द्वंद्व, आम्ही भारताचे लोक की प्रजा?, धर्मांधता धर्मनिरपेक्षतेचा गळा घोटत आहे हे तीन विशेष अभ्यासपूर्ण लेख अनुक्रमे ॲड. शैलजा मोळक, डॅा.गीताली वि. मं., व डॅा. शमशुद्दीन तांबोळी यांनी लिहिले आहेत. तसेच प्रज्ञेश मोळक यांनी फ्लोरेन्स येथील छत्रपती राजाराम महाराजांच्या समाधीस्थळाविषयीचा माहितीपूर्ण लेख ‘आपला इतिहास : आपला अभिमान’ हा युरोप भ्रमंती करत असताना खास शिवस्पर्शच्या वाचकांसाठी पाठवला आहे.

       कल्पना धर्माधिकारी, सुतेजा दांडेकर, चंद्रकांत नवले, सुभाष कुलकर्णी, शामला जोशी व राजेंद्र वैद्य यांच्या कथा व विविध कवितांनी अंक सजला आहे. दिवाळी फराळासोबत दिवाळी अंकाची मजा लुटा. नातेवाईक व मित्रांना भेट द्या..????

 

संपादक: ॲड. शैलजा मोळक

पृष्ठे : १०० पाने

किंमत : १५०/- पोस्टेजसह

मागवण्यासाठी संपर्क : 9823627244

ताज्या बातम्या

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक. 19 December, 2024

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक.

वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना  न्याय. 18 December, 2024

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना न्याय.

वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...

मराठवाडातील बातम्या

धनगर समाजाच्या मुलांच्या हातामध्ये एसटीचे प्रमाणपत्र द्या ,अन्यथा धनगर समाज हा राज्य सरकारच्या विरोधात विधानसभा निवडणुकीला गेल्याशिवाय राहणार नाय

बीड :दि 19/09/2024 रोजी बीड येथे महाराष्ट्रातील धनगर जमातीसाठी असलेल्या अनुसूचित जमातीच्या( ST) आरक्षणाची अंमलबजावणी शिंदे...

निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला.

निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला. भारतीय वार्ताजिल्हा...

*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* *शहरात विजांचा कडकडाटाचा*

*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* शहरात विजांचा कडकडाटाचा ✍️उत्तम माने लातूर लातूर:- शहरासह ग्रामीण...