*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
Reg No. MH-36-0010493
*नवरात्रोत्सव* ५
..!
*शीतल शेखे*
आजच्या तरूणपिढीपुढे आदर्श नाहीत. त्यांना आचार, विचार, संस्कार नाहीत. त्यांना वाचनाची आवड नाही. असं बरंच काही आपण बोलतो. हे काही अंशी खरंही आहे. पण असे काही तरूण आहेत की ज्यांना आचार, विचार, संस्कारच नव्हे तर आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी अपार कष्ट व संघर्षाची तयारीही आहे. आज आपला देश तरूणांचा देश समजला जातो. विविध क्षेत्र पादाक्रांत करून आजची तरूणाई या स्पर्धेच्या युगात घोडदौड करत आहे. युवाशक्ती ही राष्ट्रीय संपत्ती असते. ती राष्ट्राला एक नवी दिशा देण्याचे काम करते. अनेक तरूण-तरूणी आज भावी पिढीसाठी विविध प्रेरणादायी उपक्रम राबवत आहेत. कित्येकजण सोशल मीडिया व तंत्रज्ञानाचा वापर करून आपली वैचारिक, बौध्दिक, सामाजिक, आर्थिक प्रगतीही साधत आहेत. यांना एक व्हीजन आहे व त्याबरोबरच यशस्वीततेकडे जाण्याची धडपड आहे.
अशीच आपली आजची नवदुर्गा आहे, सॅाफ्टवेअर इंजिनिअर असलेली शीतल इंद्रजीत शेखे. उस्मानाबाद जवळील एका खेड्यातील हे कुटुंब सुमारे २५ वर्षांपूर्वी नोकरीनिमित्ताने पुण्यात आले. वडील सिक्युरिटीमधे व आई गृहिणी. १ भाऊ व १ बहीण असे हे चौकोनी कुटुंब एका भाड्याच्या खोलीत रहात होते. शीतलने कुटुंबाचा असलेला गरीबीचा संघर्ष लहानपणापासून पाहिला होता. तेव्हापासून ‘आपण आयुष्यात काही करावं, आईवडीलांना सुख, समाधान, आनंद द्यावा. आणि आपले स्वतःचे घर असावे’ असे बीज शीतलच्या मनात पेरले गेले.
शीतलचे शिक्षण येरवडा येथे विद्यानिकेतन शाळेत झाले व महाविद्यालयीन शिक्षण कूस्त्रो वाडिया कॅालेजमधे झाले. नोकरी लागल्यानंतर तिने इतर तरूणींप्रमाणे चैन, हौसमौज, पार्ट्या यावर वेळ व पैसा खर्च न करता गाडी घेतली, गुंठाभर जागा घेऊन घर बांधले व आईवडीलांसाठी घर बांधायचे स्वप्न पाहिले व वयाच्या अवघ्या पंचविशीत तिने ते पूर्णत्वाला नेले. यासाठी तिचे कौतुक करावे तेवढे कमीच..!
हे सारं करत असताना बालपणापासूनची तिची वाचनाची आवड तिला अधिकाधिक प्रगल्भ करत गेली. आपले करियर सांभाळत ती महिला, शालेय विद्यार्थी व तरूणांसाठी करियर मार्गदर्शन, व्यक्तिमत्व विकास, वाहतूक नियमांबाबत जनजागृती, तरूणींसाठी सेल्फ डिफेन्स अशा विविध विषयावर मार्गदर्शन करते. वेश्या व्यवसायातील महिलांच्या मुलांसाठी आत्मविश्वास, समाजव्यवस्था, बालवयातील मुलींसाठी ‘Good Touch, Bad Touch’ या विषयीच्या सत्रांचे आयोजन करते. तसेच ‘जनकल्याण ब्लडबॅंकेसोबत भारतातील पहिले प्लेटलेटस् डोनेशन कॅम्पस्’ तिने राबवले आणि त्याचा भारतभर विस्तार केला. याचे १०० हून अधिक कार्यक्रम घेतले. शालेय विद्यार्थ्यांसाठी क्रांतीकारक, इतिहासपुरूष, प्रेरणादायी व्यक्तिमत्वांना ती गोष्टीरूपाने सांगण्याचा महत्वपूर्ण उपक्रम घेते.
‘लोकांशी संवाद साधणे, नाटक, वक्तृत्व, वाचन हे तिचे छंद तिच्या कामात सहजता आणतात. कोणतेही काम म्हटले की अडचणी या
असणारच तशा त्या समाजकार्यातही येतात. मात्र काम करण्याची जिद्द आणि आवड असेल तर आपण सर्व अडचणींवर मात करू शकतो. ‘ असे ती म्हणते.
शीतलच्या कामाची दखल राष्ट्रीय व राज्य पातळीवरही घेतली गेलीय. भारतीय राष्ट्रीय युवा परिषद पुणे विभागाची सचिव, एनजीओ फ्रेंड्स ॲकॅडमीची महाराष्ट्र राज्य समन्वयक म्हणून ती कार्यरत आहे. शीतलने आपल्या कर्तृत्वाने स्वतःचे अस वेगळे स्थान निर्माण केले आहे. आजच्या तरूण-तरूणींनी, आयटी क्षेत्रातील करियर करणाऱ्या चौकटीत जगणाऱ्या सर्वांनीच शीतलचा आदर्श घ्यावा असे मला वाटते.
अतिशय प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष, पुण्यात शिक्षण घेऊन आपले स्थान निर्माण करणाऱ्या, स्वतःघर घेऊन आईवडीलांना आनंद देणाऱ्या, आपले करियर सांभाळून सामाजिक भान जपत, आपल्या जाणीवा प्रगल्भ करणाऱ्या, सामान्यांच्या मुलां-मुलींसाठी धडपडणाऱ्या, महिलांना मार्गदर्शन करणाऱ्या शीतल शेखे या आधुनिक नवदुर्गेस मानाचा मुजरा.!!! ????????????
*ॲड. शैलजा मोळक*
लेखक, कवी, समुपदेशक, व्याख्याता
अध्यक्ष शिवस्फूर्ती प्रतिष्ठान व जिजाऊ ग्रंथालय पुणे
मो. 9823627244
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...
रत्नागिरी:महिलांनी शैक्षणिक क्षेत्रात येऊन आपल्या कुटुंबाची प्रगती करावी असे प्रतिपादन प्रवीण काकडे अध्यक्ष अहिल्यादेवी...
भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरकायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र....
भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरकायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र....