*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता :
*
महाराष्ट्राचा सन्माननीय ‘कर्तव्यम प्रेरणा पुरस्कार’मिळवणाऱ्या डॉ. अलका नाईक या प्राध्यापिका, प्रशासिका, पत्रकार, संपादिका, लेखिका, कवयित्री, समाजसेविका व कौन्सिलिंग सायकॅालॉजिस्ट आहेत . यांचे मूळ गाव जैतापूर असून त्यांचे प्राथमिक,माध्यमिक व कॉलेज शिक्षण मुंबई येथे झाले.त्यांनी अतिशय उच्च शिक्षण घेतले असून ट्रिपल पोस्ट ग्रॅज्युएशन एम ए, एम. कॉम, एम. एस,पी. एच. डी. अशा अनेक पदव्याही प्राप्त केल्या आहेत. M.P.S.C. पास होऊन सचिवालयात मिळालेली मानाची नोकरी सोडून त्यांनी शिक्षकी पेशात आपली कारकीर्द गाजवली. प्राचार्या आणि प्रशासिका म्हणूनही उत्तम कार्य केले. त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठासाठी १० वर्षे प्रशासिका, कॉर्डिनेटर मॉडरेटर ,कौन्सिलर इ. अनेक पदांवर कार्यरत राहून गौरवास्पद कार्य केले. तसेच त्या गरजूंना मोफत मार्गदर्शन व सल्लाही देतात. वृध्दाश्रम, असोसिएशन ऑफ ब्लाइंड, कॅन्सर पेशंट इ.साठी त्या कार्यरत आहेत. त्यांनी अनेक विविध पदे भूषविली आहेत. तसेच अनेक आंतरराष्ट्रीय सेमिनार्स वेबिनार यामध्ये संशोधन प्रसिद्ध केले आहे. कॅनडा टीव्हीवर तीन वेळा त्यांची संदेशपर मुलाखत झाली आहे, अनेक संस्थांच्या त्या सभासदही आहेत. त्यांना साहित्याची आवड असल्याने भारताबरोबरच नेपाळ, श्रीलंका,इंडोनेशिया, मलेशिया इत्यादी देशांमध्ये विश्व साहित्य संमेलनात सहभागी होऊन अनेक काव्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे. त्यांचा 'शब्दगंध 'हा कवितासंग्रह व 'मधुगंध ' हा चारोळी संग्रह प्रकाशित झाला आहे. अनेक मासिकांमध्ये लेख तसेच विविध कविता संग्रहांमधून त्यांच्या कविता प्रसिध्द होतात. त्यांनी कैलास मानसरोवर यात्राही पूर्ण केली आहे. शिक्षणाच्या प्रसारासाठी *सुवर्णपदक* प्राप्त राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार अमरावती, हिरकणी पुरस्कार, राष्ट्रीय श्रेष्ठ शिक्षक पुरस्कार-इंदोर...इ. ७५ हून अधिक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. केशदान, अवयवदान या चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग आहे.
सध्या सैनिक भारती ह्युमॅनिटी फाउंडेशन व महिला टॅक्सीचालक संघटना, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद ,पुणे व कोकण प्रदेश, तेजस्विनी व प्रितगंध फाउंडेशन, तेजस्विनी झेप महिला उद्योजिका संस्था पुणे, जैतापूर महिला प्रबोधिनी संस्था अशा अनेक संस्थांच्या त्या संस्थापक, सल्लागार व पदाधिकारी आहेत. या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी त्या सदैव कार्यरत आहेत.
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षापूर्व मार्गदर्शन आणि समुपदेशन केवळ मुंबईतच नाही तर संपूर्ण कोकणामध्ये दौरे करून सातत्याने करतात.
त्यांनी आजवर अनेक वाचनालयांसाठी पुस्तके भेट, चिपळूणच्या, महाडच्या पूरग्रस्तांना मदत केली आहे. त्यांना *बेस्ट ह्यूमेनिटेरियन अवॉर्ड*, *कोरोना योद्धा अवॉर्ड ने* सन्मानित करण्यात आले आहे. सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक, अशा सर्वच क्षेत्रात काम करणाऱ्या डॉ. अलका नाईक यांना *शब्द* चे सहावे मराठी विश्व साहित्य संमेलन *मालदीव* येथे त्यांना सांस्कृतिक कार्यक्रम *अध्यक्षा* म्हणून विशेष सन्मानित करण्यात आले होते. *अंकुरले काव्य* * हा बालकवींचा कवितासंग्रह विश्व साहित्य संमेलनात प्रकाशित करून त्यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांना खूपच प्रोत्साहित केले आहे.
एवढ्या पदव्या मिळवून नोकरी करण्यापेक्षा त्यांनी विविध क्षेत्रातील आवडीची कामे स्वीकारून त्यात घेतलेली भरारी ही उल्लेखनीय आहे. सतत पदरमोड करून सामाजिक घटकांसाठी काम करणे त्यांना विशेष आवडते. सतत काही ना काही करत राहाणे हा त्यांचा स्थायीभाव आहे. मुंबईस्थित डॅा. अलकाताई या पूर्ण महाराष्ट्रभर सामाजिक व साहित्यिक सेवा करत भ्रमंती करत असतात.
अशा या आधुनिक नवदुर्गेला आमचा मानाचा मुजरा..!!!
*ॲड. शैलजा मोळक*
लेखक, कवी, समुपदेशक, व्याख्याता
अध्यक्ष शिवस्फूर्ती प्रतिष्ठान व जिजाऊ ग्रंथालय पुणे
मो. 9823627244
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...
रत्नागिरी:महिलांनी शैक्षणिक क्षेत्रात येऊन आपल्या कुटुंबाची प्रगती करावी असे प्रतिपादन प्रवीण काकडे अध्यक्ष अहिल्यादेवी...
भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरकायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र....
भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरकायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र....