Home / महाराष्ट्र / पश्चिम-महाराष्ट्र / जिजामाता रोगनिदान व...

महाराष्ट्र    |    पश्चिम-महाराष्ट्र

जिजामाता रोगनिदान व उपचार केंद्र आरोग्यदायी सर्व सुविधा युक्त केंद्र_मा.मधु नायर

जिजामाता रोगनिदान व उपचार केंद्र आरोग्यदायी सर्व सुविधा युक्त केंद्र_मा.मधु नायर

भारती वार्ता :                                                                जिजाऊ स्रुष्टी सिंदखेडराजा येथे जिजामाता हाॅस्पीटलचे उदघाटन समारंभ संपन्न झाला या समारंभाच्या अध्यक्षस्थानी मा.डाॅ राजेंद्रजी शिंगणे मा.पालकमंत्री तथा आमदार तर उदघाटक मा.मधु एस नायर चेअरमन कोचीन शिपयार्ड कं लिमीटेड कोचीन हे तर प्रमुख उपस्थितीत हा.संपतकुमार सहा.महाप्रबंधक , आम्रपाली साळवे संचालक,रेमिता नायर वैज्ञानिक कोचिन शिपयार्ड मा‌ मधुकरराव मेहेकरे अध्यक्ष जिजाऊ स्रुष्टी,मा.पुरुषोत्तम कडु प्रकल्प प्रमुख,मा.कामाजी पवार राष्ट्रीय अध्यक्ष मराठा सेवा संघ मा.सतिश तायडे नगराध्यक्ष ,मा.मनोजदादा आखरे प्रदेशाध्यक्ष संभाजी ब्रिगेड,सौरभ दादा खेडेकर सहसचिव जिजाऊ स्रुष्टी,मा.अरविंदजी गावंडे प्रकल्प संचालक,मा.ज्योतीताई शिखरे संचालिका जिजाऊ स्रुष्टी,मा.शिवाजीराजे जाधव संचालक जिजाऊ स्रुष्टी यांची उपस्थिती होती

उदघाटन समारंभाच्या प्रास्ताविकातून पुरुषोत्तम कडु यांनी प्रस्ताव तयार करण्यापासून मंजूर करणे व तो पुर्ण करेपर्यंतची माहिती विषद केली या कामी त्यांना मेहेकरे साहेब,इंजी.अंगद काळे, शंकरराव धोत्रे यांचे सहकार्य व मा.ना.नितीनजी गडकरी यांनी CSR फंड मिळवून दिला त्यांनाही धन्यवाद दिले

मा.मधूकरराव मेहेकरे यांनी हा प्रकल्प आता कार्यान्वित झालेला आहे याला पुढे नेण्यासाठी कोचिन शिपयार्ड कं लिमीटेड यांनी आणखी सहकार्य करण्याची गरज आहे अशी अपेक्षा व्यक्त केली

आपल्या उदघाटन पर मनोगतातून मा.मधु नायर यांनी आमची कंपनी भारताच्या एका दक्षिण टोकाला व जिजाऊ स्रुष्टी अंतर खुपचं लांब एवढ्या दुरवर CSR व एवढ्या मोठ्या प्रमाणात CSR दिलेली आपली एकमेव संस्था आहे परंतु मा.ना.गडकरी साहेब व संचालक मंडळ व रुपा राय मॅडम,मा.संपतकुमार यांनी वेळोवेळी जिजाऊ स्रुष्टी येथे भेट देऊन मराठा सेवा संघ , जिजाऊ स्रुष्टी संचालक मंडळ व संस्थापक अध्यक्ष मा.पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब यांच्या समवेत समन्वय साधला आम्ही दिलेल्या CSR चे योग्य प्रमाणात विनीयोग करुन या आरोग्य केंद्राची उभारणी करुन कार्यान्वित केला त्याबद्दल सर्वांचे हार्दिक अभिनंदन करतो यापुढेही मदत करत राहु अशाप्रकारे मनोगत व्यक्त केले

याप्रसंगी मा.ना.नितीनजी गडकरी यांनी पाठवलेला शुभेच्छा संदेश मा.डाॅ.मनोहर तुपकर यांनी वाचुन दाखवला

आपल्या अध्यक्षीय मनोगतातून मा.डाॅ राजेंद्र शिंगणे यांनी मराठा सेवा संघ व पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांच्या प्रत्येक उपक्रमात समाजाच्या उन्नतीसाठीचेच कार्यक्रम हाती घेतले जातात जिजाऊ स्रुष्टी निर्मीती असेल आज एवढे भव्यदिव्य सर्व सुविधा युक्त हाॅस्पिटल चे उदघाटन करताना या अतिशय आनंद होत आहे या हाॅस्पीटलचा लाभ सिंदखेडराजा सह ग्रामीण जनतेला निश्र्चितच होणार आहे यासाठी मराठा सेवा संघ, जिजाऊ स्रुष्टी कार्यकारी मंडळ यांना धन्यवाद देतो अभिनंदन करतो

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिजाऊ स्रुष्टी व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष सुभाषराव कोल्हे, रविंद्र चेके,संजय विखे,अॅड राजेंद्र ठोसरे,ज्योतीताई जाधव, किशोर आप्पा भोसले, योगेश पाटील,एस.पी.संबारे,अमर पाटील,विलास तेजनकर ,विनोद बोरे,सागर खांडेभराड, प्रा.प्रिया हराळे ई.परिश्रम घेतले या कार्यक्रमासाठी राज्यभरातील मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड पदाधिकारी हजर होते जिजाऊ वंदना ज्योतीताई जाधव, सुत्रसंचलन धनंजय पाटील यांनी तर आभार प्रदर्शन सुभाषराव कोल्हे यांनी केले.

ताज्या बातम्या

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन. 23 November, 2024

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.

...

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

पश्चिम-महाराष्ट्रतील बातम्या

*राज्यात १९ फेब्रुवारीला शिवजयंती उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात साजरी होणार*

*सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र* मुंबई, दिनांक १३: छत्रपती...

*सुप्रसिद्ध मेडीसन पीआर मिडीया एजन्सी बाबत जगदिश काशिकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतरांना नोकरी वाचविण्याबाबत निवेदन व स्मरणपत्र* *कामगार आयुकत यांच्या पर्यत आपली समस्या पोहचवण्यासाठी व न्यायासाठी सुप्रसिद्ध समाजसेवक, वकील व वोचडोग फाऊंडेशन चे ट्रस्टी श्री गोडफ्रे पिमेंटा यांची घेतली कायदेशिर मदत* *दिल्ली कामगार मंत्री कार्यालयातुन या प्रकरणाबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आदेश महाराष्ट्र कामगार आयुकत यांना देण्यात आले आहेत*

भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरमुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व...

ब्राह्मण पुरोहिताची जागा बहुजन पुरोहितांना द्या! मराठा सेवा संघ संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर

भारतीय वार्ता : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राजघराण्यातील वर्तमानातील युवराज्ञी संयोगिता राजे संभाजी...