आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता :आदरणीय_स्मृतीशेष_केशव_सिताराम_ठाकरे (प्रबोधनकार ठाकरे)* यांचा जन्म दिवस १७ सप्टेंबर १८८५ ला झाला होता म्हणुन १७ सप्टेंबर २०२२ हा संपूर्ण भारतभर "लोक प्रबोधन दिन" म्हणून यावर्षी पासून साजरा करण्यात येणार आहे असे *संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष #ॲड_मनोज_आखरे* यांनी जाहिर आवाहनाद्वारे सांगितले.
प्रबोधनकार ठाकरे यांनी १६ ऑक्टोंबर १९२१ रोजी "प्रबोधन" या पाक्षीकाचे प्रकाशन सुरू केले. त्यातुन त्यांनी आपल्या प्रखर सत्यवादी लेखणीतून महाराष्ट्राची वैचारीक मशागत केली. त्यांना प्रबोधनकार म्हणुन ओळख प्राप्त झाली. विषमतेच्या विरोधात सत्यशोधक बाण्याने निर्भिडपणे लोकांच्या बाजुने उभे राहणारे सन्माननिय केशव सिताराम ठाकरे हे खरे प्रबोधनकार होते.
त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीने तथागत गौतम बौध्द ते जिजाऊ-शिवराय-फुले-शाहू-आंबेडकर, संविधान या क्रांतिविचांराचा जागर व्हावा म्हणुन प्रबोधनकारांचा जन्मदिवस महाराष्ट्रभर *#लोकप्रबोधन दिन* म्हणुन भव्य प्रमाणात साजरा करण्यात येत आहे.
प्रबोधनकारांनी धार्मिक अंधश्रध्दा, अनिष्ट रूढी-परंपरा पुरोहितशाही भांडवलशाही या विरूध्द आयुष्यभर संघर्ष केला. शिक्षण, प्रबोधन, शेतकरी, कामगार इत्यादी प्रश्नांसाठी आंदोलने केली. त्यांचे हे कार्य अतुलनिय आहे महाराष्ट्राचे हित व लोकहित यात त्यांनी कधीही तडजोड केली नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात त्यांनी अत्यंत हिरीरीने भाग घेतला. छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्राची अस्मिता ही त्यांची प्रेरणा होती सतत भ्रमंती प्रबोधन, लेखन, भाषण, आंदोलने कृतिशील विचार व आचरण यातुन त्यांचे वेगळपण लक्षात येते.
प्रबोधनकारांनी सत्यशोधक परंपरा चालवत मांडलेला विचार व संघर्ष अजून संपलेला नाही. शेतकरी, बेरोजगार, युवक-युवती, कामगार, आदिवासी, शोषित यांचे प्रश्न कायम आहेत. वर्तमानात लोकशाहीच्या नावावर हुकुमशाही लादल्या जात आहे. म्हणुन भारताचे संविधान व लोकशाही अबाधित राहण्यासाठी लोकप्रबोधनाची अत्यंत गरज आहे. म्हणुन १७ सप्टेंबर हा प्रबोधनकारांचा जन्मदिवस हा लोकप्रबोधन दिन म्हणुन सर्वत्र उत्साहाने आयोजित केला जाणार आहे. प्रबोधनकारांच्या विचारांचा हा जागर अविरत राहिला पाहिजे यासाठीच हा अट्टाहास.असल्याचे ॲड_मनोज_आखरे #संभाजी_ब्रिगेड_अध्यक्ष यांनी सांगितले आहे.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र* मुंबई, दिनांक १३: छत्रपती...
भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरमुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व...
भारतीय वार्ता : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राजघराण्यातील वर्तमानातील युवराज्ञी संयोगिता राजे संभाजी...